पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ एलीया याचा शिष्य अलीशा.-चालू. प्रक० ७. तुझे अंग यथापूर्व होईल." तेव्हां नामान रागे भरून बोललाः "तो बाहेर येऊन आपला देव परमेश्वर याचे नाम घेऊन आपला हात लावून कोड्याला बरें करील असे मला वाटले होते, दमसेकाच्या नद्या इखा- एलाच्या सर्व जलांपेक्षा चांगल्या नाहीत काय?" असें तो रागे भरून निघाला. पुढे त्याचे चाकर त्याला ह्मणाले: “माइया बापा, भविष्यवाद्या- ने तुला मोठी गोष्ट सांगितली असती तर त्वा केली नसती काय? तर त्याने तुला स्नान करून शुद्ध हो झटले तर करावे की नाहीं." तेव्हां त्याने यानंत सात वेळां बुटकुळी मारली आणि त्याचे अंग लहान मुलाच्या अंगासारखे शुद्ध झाले, २. नंतर तो देवाच्या माणसाकडे परत येऊन बोललाः "आतां पाहा, इस्राएल वेगळा करून सर्व पृथ्वींत देव नाही असे मला कळले, तर आतां आपल्या दासापासून भेट घे." अलीशा ह्मणालाः “परमेश्वर जिवंत, मी काही घेणार नाही." तेव्हां नामान ह्मणाला: "खचरांच्या जोडीच्या ओझेभर माती आपल्या दासाला न मिळावी काय? कांकी या- पुढे तुझा दास दुसऱ्या देवांस यज्ञ करणार नाही, परमेश्वराला मात्र करी- ल" *), अलीशा ह्मणालाः "सुखरूप जा!"-आणि तो थोडीसी वाट चालून गेला, तेव्हां गेहजीने त्याच्या मागे धावून नामानास पटले: "मा- झ्या धन्याने मला पाठवून सांगितले आहे की, "भविष्यवाद्यांच्या पत्रांतले दोघे तरणे मजकडे आतांच आले आहेत, त्यांस एक तालांत रूपे व वस्त्रांचे दोन जोड दे !" नामान ह्मणालाः “मान्य होऊन दोन तालांत घे." मग गेहजी जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला, तेव्हां त्याने त्याला मटले: "गेहजी, कोठून आलास?' तो बोललाः "तुझा दास कोठें- ही गेला नव्हता.” मग अलीशा त्याला ह्मणालाः "तो माणूस तला भेटायास आपल्या रथावरून मुरडला, तेव्हां माझें मन गेले नव्हते काय? रूपे आणि वस्त्रे घेण्याचा समय आहे काय? तर नामानाचा कोड तुला सर्वकाळ लगटून राहील.” तेव्हां तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुदून निघाला.

  • ) यहोनाच्या देशातन मानी नेऊन दमसेकांत यहावासाठी वेदी बधावी शसी

नामानाची इच्छा होती.