पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ एलिया याचा शिष्य अलीशा. [प्रक० ७६ ला नाही. मग अलीशाने जो झगा एलियावरून पडला तो उचलून घेऊन यार्देनेच्या काठी उभे राहून तो पाण्यावर आपटून मटले : “एलि- याचा देव परमेश्वर कोठे आहे ?" तेव्हां पाणी दुभागले आणि अलीशा पार गेला.

  • ) भविष्यवाद्यांचे पुत्र हाणजे शिष्य, हे भविष्यवाद्यांच्या हुद्यासाठी देवाकडून बोला-

वलेले होते, आणि त्यांच्या निरनिराळ्या भक्तमंडळ्या असन वडील भविष्यवाद्यांच्या हाताखाली ते आपली काम करीत असत. +) रथ व स्वार हे लढाई संबंधी अमून देशाच्या रक्षणार्थ आहेत. एलिया तर मोठ्या शूर व लढाऊ सैन्यापेक्षा इस्राएलांचा फार मोठा संरक्षक होता. २. आणि अलीशा बेथेलास गेला तेव्हां लहान पोर गांवाबाहेर निघून त्याची थट्टा करून ह्मणाले: “अरे टकल्या वर जा, अरे टकल्या वर जा!” *) तेव्हां त्याने मुरडून परमेश्वराच्या नामाने यांस शापिले. मग दोन अखलींनी वनांतून येऊन त्यांतली ४२ पोरे फाडून टाकली. आणि एका भविष्यवाद्याच्या पुत्राची बायको इने अलीशाला ओरडून मटले: "माझा नवरा मेला, तर सावकार माझे दोन पुत्र त्याचे दास व्हावे ह्मणून घ्यायाला आला आहे.” तेव्हां अलीशाने तिला मटले: "घरांत तुजवळ काय आहे ?" ती ह्मणाली: "तुझ्या दासीला केवळ तेल भरलेली कुपी आहे.” तेव्हां त्याने तिला सांगितले: "चल तूं आपल्या शेजान्यांपासून रिकामी भांडी उसनी माग, थोडी मागू नको, आणि सर्व भांड्यांत ओतून भर." नंतर तिने भांडी भरल्यावर तेल राहिले. तेव्हां देवाच्या माणसाने झटले: “तेल विकून आपले कर्ज फेड मग शेषाने आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर.”

  • ) या मूर्तिपरायण वेथेलातील पारें देखील इतकी दुष्ट होती की, त्यांनी भविष्यवा-

द्याची निंदा केली. त्यांची थट्टा एलियाच्या आकाशात जाण्याची होती. - ३, नंतर अलीशा शूनेमास गेला. तेथे एक मोठी बायको होती. तो कधी तिकडून जाई तेव्हां अन्न खायाला तिकडे वळे. मग ती आप ल्या नवऱ्याला ह्मणालीः "हा देवाचा पवित्र माणूस आहे हे मला कळते आहे, आतां आपण लहान खोली करूं, तेथे त्यासाठी अंथरूण व मेज व बैठक व समई ठेवू, मग तो आमाकडे येतांना तिकडे वळेल. आणि एका दिवसीं तो फिरून येऊन तिला ह्मणालाः "खा आमची ही सर्व काळजी