पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ अहाबाचे घराणे, [प्रक० ७५ २. अहाबाच्या दिवसांत यहूदावर नीतिमान् जो यहोशाफाट तो राजा होता, त्याने इस्राएलाच्या राजासी सल्ला करून आपला पुत्र यहोराम याला अहाबाची कन्या अथल्या*) बायको करून दिली. आणि अहाबाचे ४०० जे खोटे भविष्यवादी त्यांकडून फसून यहोशाफाट इस्राएलाचा राजा यासुद्धा अरामी यांसी लढाई करायास गेला. त्या वेळेस अहाबाने आपला वेष पालटला. कांकी अरामी राजाने “इस्राएलाच्या राजासी मात्र लढा" असी आज्ञा आपल्या लोकांस दिली होती. परंतु कोणी सहज धनुष्य ओढून अहाब राजाला मारिले, आणि तो मेला. आणि त्यांनी त्याचा रथ धुतला, तेव्हां कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले. यहोशाफाट तर आपल्या घरी सुखरूप परत आला, आणि त्याने आपल्या देशांत नगरोनगरी न्यायाधीश ठेवून त्यांस मटले: “तुमच्या ठायीं पर- मेश्वराचे भय असावे; परमेश्वराजवळ अन्याय किंवा पक्षपात किंवा लांच घेणे नाही. तर जपन कार्य करा"

  • ) यहोरामाला अहाबाची कन्या अथल्या बायको करून देण्याचा यहोशाफाटचा हेत

चांगला होता, कारण तेणेकरून यदा व इस्राएल या दोन राज्यांमध्ये जे मनस्य होते ते नाहीसे होईल असें त्याला वाटले होते; परंतु अहावाच्या कुळावर देवाचा शाप असल्यामुळे ह्या लग्नसंबंधाने आपल्या घरावर संकट येणार आहे हे त्याने ध्यानात आणले नाही. ३. अहाबाच्या ठिकाणी त्याचा पुत्र अहाज्याराजा झाला, आणि जे परमेश्वराच्या दिसण्यांत वाईट ते त्याने केले, आणि तो दुखणाईत झाला. तेव्हां "मी या दुखण्यांतून जगेन काय?" हे विचारायास त्याने एक्रोनाचा देव बालजबूब (पालष्टयांच्या देशांतील एक देव) याकडे पाठविले. तेव्हां एलिया त्याच्या दूतांस भेटायास जाऊन ह्मणाला : “इस्राएलांत देव नाहीं मणून तुह्मी एक्रोनाचा देव बालजबूब याला विचारायास जातां की नाही?" याकरितां परमेश्वर ह्मणतो: “अहाज्या आपल्या पलंगावरून उतरणार नाहीं, तो मरेल.” मग टूतांनी परत येऊन राजाला गोष्ट सांगितली. मग त्याने त्यांस मटलेः "तो कोणत्या प्रकारचा मनुष्य?" ते ह्मणालेः "तो केसाळ मनुष्य व त्याच्या कंबरेस कातड्याचा पटका बांधलेला होता." मग तो बोललाः “एलिया तिश्वीच आहे." मग त्याने पन्नासांचा सरदार त्याला धरायाला पाठविला. तो जाऊन एलियालाह्मणालाः "हे देवाच्या मा- णसा, राजाने सांगितले, खाली ये"*). एलियाह्मणालाः "मी देवाचा माणूस