पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७९] भविष्यवादी होशेहा, योएल, आमोस आणि ओबा. १८३ पवित्रशास्त्रांत भविष्यवादाांची जी पुस्तके आहेत त्यांचे दोन वर्ग आहेत. प्रथम वर्ग यशायापासून दानीएलापर्यंत ; आणि दुसरा वर्ग होशेहापासून मलाखीपर्यंत, आणि या प्रत्येक वर्गातील पुस्तकांची अनुक्रमणिका कालानुक्रमाने आहे. ह्मणून उदाहरणार्थ जरी योना भविष्यवादी यशाया याच्यापूर्वी होता तरी त्याचे पुस्तक यशायाच्या भविष्यवादानंतर येते. भविष्यवाद्यांचे अणखी दुसरे वर्गही दाखवितां येतात. .. १. बाबेलच्या पाडावप्रवासपणाच्या पूर्वीचे भविष्यवादी, झणजे हो- शेहा, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीखा व यशाया. देवाकडून इस्राएलावर जी शासने आली ती यांनी पाहिली नाहींत. २. बाबेलच्या पाडावप्रवासपणाच्या समयीं जे भविष्यवादी होते ते, ह्मणजे नहूम, हबकूक, सफन्या, इर्मया, येहज्केल व दानीएल. यांतून कोणी पाडावप्रवास होण्याच्या संधीत व कोणी तो झाल्यावर भविष्य भाषण केले. ३. बाबेलच्या पाडावप्रवासपणा नंतरचे भविष्यवादी ह्मणजे: हग्गई, जखर्या व मलाखी. यांनी पाडावप्रवासपणांतून आलेल्या लोकां- मध्ये काम केले. होशेहा जो भविष्यवादी त्याने परमेश्वराकडून इस्राएलाचा त्याग व शेव- टल्या काळी त्यांचा अंगीकार होणार याविषयीं भविष्यभाषण केले ते येणे- प्रमाणे. "इस्राएलाचे वंश बहुत दिवसपर्यंत राजाहीन, अधिपतिहीन यज्ञहीन व प्रतिष्ठापनाहीन, एफोद व तराफीम यांहीहीन राहातील *). त्यानंतर इस्राएलाचे वंश फिरतील आणि परमेश्वर त्यांचा देव याला ते शोधतील आणि पुढल्या दिवसांत ते परमेश्वराचे व त्याच्या चांगलेपणा- चे भय धरतील" (अ० ३,४ व ५ प्रक० १९६).-योएल याने इस्रा. एल लोकांवर देवाची जी शासने येणार होती त्यांविषयीं टोळांचा दृष्टांत देऊन भविष्य सांगितले, आणि पवित्र आत्म्याच्या आगमनाविषयीही याने भविष्यभाषण केलें: “त्या दिवसांनंतर मी आपला आत्मा सर्व मनष्यजातीवर घालीन, मग तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्य सांगती- ल" (अ० २,२८.२९).-तकोवाच्या मेढपाळांतला आमोस, ज्याला