पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७६] एलिया याचा शिष्य अलीशा. आहे तर आकाशांतून अग्नि पडून तुला व तुझ्या पन्नासांस खाऊन टाका." मग ते तसेच झाले. अणखी पन्नासांचा सरदार राजाने पाठविला. त्या- लाही तसेच झाले, नंतर तिसरा सरदार येऊन एलियापुढे गुडघे टेकून ह्मणाला : "हे देवाच्या माणसा, आतां माझा जीव तुला मोलवान वाटो!" तेव्हां एलिया त्याच्या संगतीं राजाकडे जाऊन, "तूं खचीत मरसील" असे त्याने त्याला सांगितले. नंतर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे अहा- ज्या मेला व त्याचा पुत्र योराम त्याच्या ठिकाणी राजा झाला.

  • ) या सरदाराच्या भाषणांत निर्भत्सना आणि निंदा होती. एलियाला तो देवाचा

माणूस झणवितो आणि जसा एखाद्या अपराध्याला करितात त्याप्रमाणे त्याने त्याला हकुम केला. प्रक० ७६. एलिया याचा शिष्य अलीशा. (२ राजे२-४.) १. आणि परमेश्वर एलियाला वावटळीने आकाशांत घेणारा होता, तेव्हां एलियाने अलीशाला सांगितले: "एथे राहा बरे, कां की परमेश्वराने मला यार्दनेस पाठविले आहे." परंतु अलीशा बोलला : “परमेश्वर जिवंत, मी तुला सोडणार नाही. मग ते उभयतां चालून यरिहोस आले. तेव्हां यरिहोंतले भविष्यवाद्यांचे पुत्र *) अलीशाकडे येऊन त्याला ह्मणाले: "परमेश्वर आज तुझ्या धन्याला तुझ्या मस्तकावरून घेणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?" तो बोलला : “मला ठाऊक आहे, उगेच राहा." मग ते दोघे यार्देनेवर आले आणि एलियाने आपला झगा घेऊन दुमडून पाण्यावर आपटला. तेव्हां ते इकडे तिकडे होऊन दुभागले आणि ते दोघे कोरड्यावरून पार गेले. नंतर एलियाने मटले: “मला तुझ्याजवळून घेतल्यापूर्वी म्या तुजसाठी काय करावे हे सांग." अलीशा बोललाः "तुझ्या आत्म्याचा दुप्पट वांटा मजवर असावा." हा बोललाः "त्वा अवघड गोष्ट मागितली, तुजपासून घेतला जाईन तेव्हां जर तुला दिसलो तर मला तसे होईल." आणि ते चालत असतां पाहा, अग्नीचा रथ व अग्नीचे मॉडे यांनी त्या दोघांस एकमेकांपासून वेगळे केले आणि एलीया वावट- होआकाशांत चढला, ते अलीशा पाहून मोठ्याने बोलला. "माझ्या बापा माया बापा! इस्राएलाचा रथ व त्याचे स्वार!"१) नंतर तो त्याला पुन्हा दिस-