पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक वाचालय खेड, (युगे.) 4 पहिले खंड. तारण होण्याची तयारी. “यहूद्यांतूनच तारण आहे." योह० ४,२२.. प्रथम भाग. मुळारंभाचा इतिहास. उत्पत्तीपासून अब्राहामापर्यंत. (उत्प० १–११.) प्रकरण १. उत्पत्ति. (उत्प० १.) (इसवी सनाच्या पूर्वी ४,००० वर्षे.) १. प्रारंभी देवाने *) आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी अस्ताव्यस्त व शून्य होती, आणि जलाशयाच्या पाठीवर काळोख होता. आणि देवाचा आत्मा पाण्याच्या पाठीवर हालत होता. मग देव बोलला. "उजेड होवो!" आणि उजेड झाला. आणि देवाने पाहिले की उजेड चांगला आहे ; आणि देवाने उजेड व काळोख यांस वेगवेगळे केले. मग देवाने उजेडाला दिवस मटले,आणि काळोखाला रात्र ह्मटलें ।); आणि सायंकाळ व सकाळ होऊन पहिला दिवस झाला. मग देव बोलला: "जलांच्यामध्ये अंतराळ होवो!" तसे देवाने अंतराळाखालची जी जले व अंतराळावरलीं जी जले ती वेगवेगळी केली), आणि तसे झाले IH