पान:पद्य-गुच्छ.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्री-विषयक सुभाषित - गुच्छ म्हणे तिला तो निर्धन म्हणुनी आहेर माझा करिसी भिक्षापात्र प्रसिद्ध पोकळ तुंबा अंकों धरिसी चंचल माझे प्रेम म्हणोनी राग मजवरी धरिसी शतविध पावे स्फुरण निमेषीं तार करीं आदरिसी गजरा पुष्पांचा प्रिय तुजला प्रहरमात्रिं जो सुकला अष्टौप्रहर स्थिर प्रेम मम दूर लोटिसी मजला कठोर मी बोललों शब्द जरि दिवसांतुनि एखादा केशाकर्षककंकताहुनी अधिक तयाचि न बाधा अर्धोदयपर्व आदरी जन होन पूर्ण व्यापरिस दयितामुख पूर्णचंद्रविवाहुनी कटाक्षचि सरस सुशिक्षित स्त्री वरिली की ती अधिक दक्ष गृहकर्मी परि अमुच्या जोडयाहुनि रक्षी जोडा आपुला चर्मी स्वर्गामधले देव विलासी खचितच मनुजाहून गगनांगण हो रात्रिं तयांच्या उभी कलावंतीण उत्तरध्रुवगृहिं अष्टदिशां ती उषा नाचते खाशी सूर्य भोगितो एक वत्सरी सगळया बारा राशी प्रेमाचा पति लाभल्याविना पतिप्रेम पत्नीला कोण शिकवि ? गुरुमुखावांचुनी विद्या नच कोणाला संसार सुखद्वार उभें तें प्रेम-विजागिरिवरती नेह लेपनें मृदु न केलि तरि करकर करिल सदा ती प्रेमा म्हणती अंध बधिर परि ही न तयाची निंदा दिसति न ऐकूं येति सतीला पतिचे दुर्गूण कदा प्रेम असे तें अमर म्हणोनी म्हणती स्वर्ग गृहाला प्रेमी स्त्री परि पंच महाभूतांचा संचय गमला स्पर्श लागतां हाता नाजुक पृथ्वीगुण ती वाटे आपतत्त्व तें गालावरच्या अश्रुद्वारें प्रगटे ६१