पान:पद्य-गुच्छ.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० पद्य—गुच्छ ३२ स्त्री-विषयक सुभाषित - गुच्छ स्त्रीच्या देहीं त्रिवेणिसंगम सरिता तीन करीती मुखी सरस्वति नेत्री गंगायमुना नित्य वहाती शिरिं गंगावनं चंद्रसूर्य हे वसती करिती नित्य स्त्रीतें म्हणती संसारांतिल तीर्थ पवित्रहि सत्य तत्त्वज्ञाना शिकवी स्त्री मज स्याद्वाचि करि सिद्ध तिला कटि स्यात् न स्याद्वा कविवर्णन हैंहि प्रसिद्ध स्त्री शिकवी मज वेदांतातें घेउनि मायारूप अद्वैतांतुनि द्वैत भासवी परोपरीने खूप जायापति हा द्वन्द्व समासचि म्हणुनी भांडे मजसी व्याकरणाविण मजसि तंडण्या अन्य न कारण तिजसी वामांगावर स्वत्व तियेचें म्हणुनि अपर्णा पतिला दर्पण पाहुं न देत नटेशा ऐसें वाटे मजला मर्यादारक्षण हा स्त्रीचा गुण म्हणताती कोणी प्रेमा मर्यादा न ठेवणें हाचि गुणहि मी मानी अर्थालंकार प्रिय ललना शब्दालंकृत कविता त्याज्य उभय मज समान वाटति तुलना त्यांची करितां वृत्तदर्पणी प्रेम बसविती स्त्रीवृत्ताची नांवें गणमंत्री जरि कठिण जोडण्या यत्न करित मी भावें गंगा ओती प्रेमोदक जरि सगळे शंकरदेही तज्जिव्हेचा दाह शमविण्या घरी चंद्र शिरिं तोही अष्टांगें अर्पण करि पतिला देतहि पंचप्राण परि अर्ध न दे दृष्टी सन्मुख सती अशी ही कृपण शृंगारुनि बसली तहयिता वीणा घेउनि गाया सत्वर मत्सर अग्नि भडकवी कर्पूरासम काया