पान:पद्य-गुच्छ.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ पद्य – गुच्छ ३९ वरुण - कन्यका शिरी पौर्णिमायुक्त चंद्रमा इच्छा हो जलसंचारी हाती घेउनि एकेक वल्हें नौका लोटिलि कासारी शांत जळामधिं नाव चालली जशी गालिच्यावर राणी राजभक्तिनें दुभंग होउनि बाट देतसे तिज पाणी दूर चाललों तीर सोडुनी पाण्याविण कांहीं न दिसे प्रचंड कढईमधं यक्षानें रूपें वितळले जणुं भासे गोल किनारा वृक्षलतावृत चौकट जैशी चित्राला दोनच डोळे एकच दृष्टी याचा खेद मला झाला चौबाजूला नाव फिरवुनी शोभेचा आनंद जरी यथेष्ट घेईं तरी वाटले शंभर डोळे कां न शिरों निसर्गशोभेमध्ये समरस होउनि गेलें आनंदें एकांती सुख परिमित म्हणुनी सहचारेच्छा मनिं नांदे रात्रिचर पक्ष्याविण दूरहि शब्द करि न कोणी प्राणी मासे चंचळ येरझरति परि देवें दिधलि न त्यां वाणी कमळांच्या जाळयांतुनि फिरलों कळचा तोडिल्या सुंदरशा पार्ने खुडुनी करंड केला आंत वसविल्या त्या खाशा अर्पु कुणा उपहार वन्य हा मी न तयांचा अधिकारी सत्पात्र न लाभे दाना तरि तो धनिक मानसी खेद करी वहीं आडवी टेकुनि ठेविलिं विश्रांती मग त्यां द्याया छातीवरती हात ठेविले विश्रांतीसुख मज घ्याया शुभ्र चंद्रिका - दीप्त उदक तें पाहुनि झाला उल्हास परि स्पर्शसुख सेवायाची उद्भवली मग मनिं आस बसल्या बसल्या हळुच सोडिले नौकाकांठावरि पाय भक्ष्य म्हणोनी येउनि मासा चाटुनि पळुनी हळू जाय इतुक्यामध्ये मउ हस्तांचा स्पर्श तयां कोणी केला