पान:पद्य-गुच्छ.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रायगडावरील हिरकणी बुरुजाचा पोवाडा कंबरे पदर खोविला स्मरुनि देविला पाय रोविला हेरुनी पाउल वाटला बळ सगळ पायात उतरल पापणी मिटेना डोळा-जी जपुनिया टाकि पाऊल सावरुनि तोल पाहुनि खोल चहुकडे पसरल पाताळ लागतां तिची चाहूल दचकती पशुपक्ष्यांची बाळं - जी उगवताच दुसरा दिन म्हणति हिरकण पंख लावुन उतरली पर्वताखाली कीं वेशि बंद अन् उभी जागती रातपारि रखवाली-जी ग्येलि वार्ता किल्ल्यावर सकळ सत्वर उतरला नूर आबाजी सोनदेवाचा गड अभेद्य ऐशा फुशारकीन व्यर्थ शिणविली वाचा - जी शिवराय तोषला मनी म्हणे हिरकणी बोलवा झणी तीच या गडाची धनीन २५ द्या नाव तिच त्या बुरुजा माथा लववुन तिजला नमीन-जी आणिला अधम गडकरी तटाच्या वरी दाविली दरी लोटिला बांधुनी दोरांत मग भोजन मासाच झालं कोल्हचा कुतभ्यां दिन रात जी केलि बंद चोरटी वाट बुजविला फाट बसविल्या दाट शिळा त्या जागी जरि निजे बुद्धि शहाण्यांची, ममता आइची जगी या जागी-जी