पान:पद्य-गुच्छ.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'डोंगरी' - महात्म्य वर्णन झोप न ये तरि जन्म जन्मिच्या कर्माची ती टीप करा मत्कुण दंशहि नरशोणितपी चावचावुनी करिति दशा अंश भाग त्यां करा धरा मग सक्तीनें शिबिराज यशा अळेपिळे घ्या वळा तळमळ योगासनविधि सर्व करा ठाव न सोडा शब्द न काढा खुशाल मग सुखशेज करा आस्तिकता ती येत नास्तिका अहृदयहि प्रेमी बनतो क्षणभर सद्गुरु रामकृष्ण वा आयवाय बाबा म्हणतो दो घटका रात्रीस होतसे ठायिंठाथिं नाकेबंदी फिरू न शके कोणिही होउ तो चोरसाव वा फटफंदी सवाल करितां जवाव द्यावा सांकेतिकशा शब्दाचा यमकिंकर तो हत्यार सांवरि अडखळली जरि लव वाचा शिपाईभाई पूर्व रात्रिं बहु सक्त हुपारी दाखवितो परि माध्यान्हीं डोळयावरती झांपड येउनि तो पडतो घंटानादें उठे खडवडे सजीव होतां जसें मढ़ें १९ अलका या ललकान्या देउनी आलबेलीचा मंत्र पढे कारागृह हैं ब्रह्मस्वतंत्रचि चौप्राकारांतरि वसलें जिवशिव सच्चित् प्रकृतिपुरुष गुण उपाधि त्यांतचि सांठवले एक नियंता यमस्वरूपी इतर सर्व त्याची लीला सुखदुःखादिक भोग मोक्ष वा देत असे तो मनुजाला स्वस्थानासी कधिं नच सोडी परी मनानें वावरतो दूतपाश पसरुनी करविं त्या सर्व कार्यभर आवरितो गरुडपुराणचि दुर्जे असे हैं जेल कायदा त्या म्हणती स्केलकोष्टकें मांडुनि करिती पापपुण्याची गणती उठबशा अंधारकोठडी दंड पाश फटके खोडे प्रायश्चित्त प्रकार येथिल वर्णावे तितके थोडे भलाबुरा हा भेद न येथें एक तत्त्व की शिरगणती धर्मजाति वा नीति सुजनता विवेक यांचा नच करिती न्यायदेवता अंध अशी ही त्रैलोक्यों विख्याति असे