पान:पद्य-गुच्छ.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पैसाफंडाष्टक १० पैसाफंडाष्टक निमेषक्रमें आक्रमी सूर्य राशी अनुल्लंघ्य तो अंबुधी विदुराशी अणू विश्वपिंडास आधार जैसा तुम्ही राष्ट्रकार्थी गणा तेवि पैसा असोनि स्वयें आकृतीने लहान कृतीतें करी सर्व थोरासमान कधी द्यावया त्या कुणा कष्ट नाहीं अनिर्वाच्य त्याचें परी मूल्य कांहीं महाराज पैसा असे सिद्ध योगी सदा अष्टसिद्धी- सपर्येसि भोगी धरो सूक्ष्म वा स्थूल रूपा विशाला तरी तीच दावी जगीं नित्य लीला कदर्यासि अल्पव्ययें कर्णकीर्ति धनाढया उदारासि संतोषपूर्ति नकार प्रिया नीच पैशून्यकंदा पहा लाभवी हा पुरी लोकनिंदा जशी कस्तुरी विस्तरी गंधभारा रजांशें भरोनी उरे त्या अगारा तसा एक पैसा दिल्या भक्तिनें तो दिगती यशामोद बाहोनि नेतो दुधाचा स्तना लागतां स्निग्धहस्त सुखे देत पीयूष धेनू समस्त १३