पान:पद्य-गुच्छ.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नमोस्तु ते माते ! ४ नमोस्तु ते माते ! • भारत जननी अससि सुगुणखनि तूं या जगि आर्या दे आशीर्वच अभयदान दे या मंगलकार्या जातां स्मृतिपथें मन मार्गे दिसलों पूर्व युगों ध्रुव तारा शिरिं उपा रम्यशा चमकति दिग्भागों अंतिम उत्तरदेशि रमसि तूं ऐशा हिमभागी अग्नि पेटवुन तेथ वैसले ऋषी जागजागी अनादि वेदां दिव्यज्ञानें जे झाले रचिते संचरप्रिय अवतरशी तूं गे मग दक्षिणदेशी तूं जेथ लागल्या तुर्क इराणी मिसर मार्ग-वेशी पांघरुनी वृकहरिणाजिनमय उष्ण वस्त्रकंथा वन्य तापसी शिष्यगणांत देति पाठसंथा विवेचनी उपनिषदां उपदेशिति वेदांतातें होय युगांतर फिरुनि एकदां जैं येशी खालीं वलांडुनि हिमाचला प्रवेशिसि पंचसिंधुपाली कृषी सुफल हिम सहच म्हणुनि उद्यमी आर्य शिरती विद्याभ्यास कलाकौशल्यी उपजे त्यांस रती अनार्य जिंकुनि वश वा करुनी आर्य करिति त्यति क्रमें आक्रमुनि अखिल रम्य भू भारत ज्या म्हणती विभव मिळविसी विविध तयाची कोण करी गणती सूर्यचंद्र नामांकित वसविति राजवंश सत्ता प्रजा प्रेमसुख शांति जयांची असे मुख्य मत्ता स्वर्णधूम आमोद कीर्तिचा व्यापिति गगनातें हिंदू तीच तूं भारत देवी आम्हां भरतजनां मुक्त कंठ सानंद हर्षमय करूं तुझ्या भजना दुःस्वप्ने पडुनी उठती जरि कुकल्पना लहरी तव प्रसादावीण कोण गे सांग तथा वारी तूंच अससि आधार आमुच्या सत्संकल्पात