पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:Center'''पंख फुटलेल्या मुली'''  लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ७३ बालविवाह रोखले. योग्य प्रबोधन केल्यावर काही विवाह पालकांनी स्वत:च थांबवले. मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकली, गावापर्यंत एसटी बस नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न, पडलेल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा, शाळेची नवी इमारत असे शिक्षणासाठीचे प्रयत्न झाले. मुलींना आरोग्य प्रशिक्षण मिळालं. त्या स्वत:विषयी अधिक सजग झाल्या. या बदलात अॅड. वर्षा देशपांडे आणि त्यांचे कार्यकर्ते, या निमित्ताने अभियानाशी जोडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक, अभियानाची जबाबदारी वाहणारी स्थानिक माणसं, मुली, मुलींचे पालक असे एक कुटुंब तयार झाले आहे. या प्रवासात आलेला अनुभव शब्दबध्द करण्याचा हा छोटासा प्रयत्न.