Jump to content

पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किशोरवीयन मुलींचे गट आशाताईंच्या मदतीने आधीच तयार झालेले होते. त्या गावात आशाताईंना आधी निरोप द्यायचा आणि ठरलेल्या वेळी पोहोचायचे. गटातल्या मुली अगदी उत्साहाने यायच्या. त्यांचा प्रतिसाद जोरदार असायचा. जयश्रीताई हमखास सगळ्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्यांच्या तालुक्यात घडलेले काही प्रसंग सांगतात. या गावात एका घरातल्या दोन किशोरवयीन बहिणी होत्या. त्यांचे लग्न शाळकरी वयात लावून देण्यात आलं. लग्नाला वर्ष होण्याआधीच मुली गरोदर राहिल्या आणि बाळंतपणासाठी माहेरी आल्या. दुर्दैव असं की दोघींनाही त्यांच्या बाळाला पाजायला दधच आलं नाही. एवढीशी मुलं उपाशीपोटी रडत राहायची..शेवटी भरपूर पैसे खर्च करुन उपचार करावे लागले. हा पैसा आई-वडिलांनाच उभा करावा लागला. शेतीतलं, घरातलं काम सोडून रुग्णालयात हेलपाटे मारावे लागले.
  एका मुलीनं त्यांना सांगितलं होतं. आई-वडील ऊसतोडीला गेल्यावर शेजारी राहणारे एक आजोबा तिला जवळ घेऊन डोक्यावरुन हात फिरवत ' जेवलीस का ?, बरी आहेस का?' वगैरे चौकशी करायचे. ती विरोध करत नाही हे पाहून त्यांनी तिला शरीरभर स्पर्श करायला सुरुवात केली. आजोबाच असल्याने मुलीला काही बोलता येईना. अखेर ते घरी आलेकी ती तिच्या आजीजवळ जावून बसू लागली. त्यानंतर ते याचेच बंद झाले. दुसरा अनुभवही भयंकर होता. एका गावात एका घराच्या कामावर गवंडी होता. तो मधूनच समोरच्या घरात पाणी मागायला जायचा. तिथे राहणारी छोटी मुलगी पाणी द्यायची. तो तिच्याशी गोड बोलायचा, स्पर्श करायचा. एक दिवस त्याने तिला समोरच्या मक्याच्या शेतात बोलावले. ती गेली, कुणी तरी पाहिलं आणि इतरांना सावध केलं. सगळ्यांनी जोरदार आरडाओरडा केल्यावर तो गवंडी पळून गेला तो आजतागायत परत आलेला नाही. एक भयंकर घटना होता होता वाचली. या घटना ऐकल्या की मुली अस्वस्थ होतात. आसपासचं उदाहरण ऐकलं की मुलींना ते अधिक जवळचं वाटतं आणि पटलंही, असा जयश्रीताईंचा अनुभव आहे. जयश्रीताईंनी तालुक्यातल्या ३६ गावात प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुलींना आता या बाबत शहाणपण येतंय. जयश्रीताईंना शेजारच्या पाटोदा तालुक्यात एका सर्वेक्षणासाठी जावं लागलं होतं. पानभर प्रश्न होते. त्यांची मुलींनी दिलेली उत्तरं तपासताना ध्यानात आलं की शिरुर तालुक्यातल्या मुलींना अधिक माहिती आहे. त्या स्वत:च्या शरीराविषयी, स्वत:चया अधिकारांविषयी अधिक जागरुक आहेत. गेली दोन वर्षे अभिमान, प्रशिणि कार्यक्रम यातून ते साध्य होऊ शकलं आहे. या त्यांच्या प्रवासात जयश्रीताई स्वतःही सक्षम झाल्या आहेत. मुलींमध्ये त्या स्वत:चे