________________
-GCCC * विश्वासाचं नेटवर्किंग जयश्री चिपाडे - ... .. ... बालविवाह झाल्यामुळे आयुष्यात किती मोठी किंमत मोजावी लागते हे स्वत: अनुभवलेल्या जयश्री चिपाडे यांनी हे दुर्दैवाचे फेरे आता आणखी कुणाच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी कंबर कसली आहे. शिरुर तालुक्यात गावागावात असलेल्या त्यांच्या जनसंपर्कातून आता मुली आणि महिलांसोबत त्यांच विश्वासाचं नेटवर्क तयार झाले आहे. - ... ...... जयश्री चिपाडे यांचे हिवरशिंगा हे मूळ गाव, २००२ पासून त्या बचत गटांमध्ये काम करत आहेत. अनेक सरकारी योजनांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. गेली कित्येक वर्षे तालुक्यातील प्रत्येक गाव कामाच्या निमित्ताने पिंजून काढावं लागलं. त्यामुळे गावागवात लोक त्यांना ओळखतात, महिला आपुलकीने बोलतात, अडचणी सांगतात. शिरुर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे — लेक लाडकी अभियाना'च्या शिरुर तालुका प्रकल्पाशी जोडले गेले होते. त्यांना जयश्रीताईंचे काम माहित होतं. काम सुरु होताना कुमारवयीन मुलींसाठी काही ट्रेनर्स हवे होते. जयश्रीताई स्थानिक आणि मुलींच्या प्रश्नाची जाण असलेल्या असल्यानं डॉ. तांदळे यांनी त्यांना विचारलं. त्यांनीही आनंदाने होकार दिला. ज्या वयोगटात काम करायचं होतं. त्या सर्व नुकत्याच वयात आलेल्या किंवा येत असलेल्या मुली होत्या. कुटुंबात बहुतांश सदस्य अल्पशिक्षित, शेतकरी किंवा ऊसतोड कामगार. मुलींना या वयातले शारीरिक आणि मानसिक बदल समजावून सांगणं आणि या काळात आरोग्य, आहार यांची कशी काळजी घ्यायची. यासंदर्भातली प्रशिक्षण शिबिरं त्यांनी तालुक्यात घेतली. एवढंच नव्हे तर या दिवसातले मानसिक, भावनिक बदल कसे हाताळवेत, शिक्षण, भावी आयुष्यावर या काळाचा किती खोलवर परिणाम होत असतो, हेही मुलींनी समजून सांगितलं.
29