कॉलेजला जात नव्हतं. रोजच्या प्रवासात गप्पा व्हायच्या. कोर्स पूर्ण झाले की घरातले लोक शिकू देतील का, नाही दिलं तर घरी बसायचं का, लग्न करुन दिलं तर आपण काय करणार...' एकमेकींशी बोलून थोडी चिंता थोडी कमी व्हायची. सकाळी सात ते दहा कोर्स असायचे. तिथून परत आल्यावर जेवण केलं की शेतात. संध्याकाळपर्यंत काम करुन नंतर घरी. थकायला व्हायचं. पण पर्याय नव्हता. त्यातच स्वातीने अकरावीची परीक्षा दिली. त्यात पास ही झाली. पुढचं वर्ष बारावीचं होतं. अधून मधून कधीतरी कॉलेजला जावून तेही वर्ष निघालं. बारावी पास झाल्याच्या आनंदापेक्षा आता पुढे काय, हा ताण मोठा होता. लग्नासाठी स्वातीची अजिबात तयार नव्हती. पण हे घरात पटवून देणं अशक्य होतं. स्वातीला काय करावं कळेना. वडील घरात लग्नाची चर्चा करुन लागले होते. नेमक्या त्याच वेळी वर्षाताई शिरुरला आल्या होत्या.
स्वातीला मैत्रिणीने त्यांच्याविषयी सांगितलं. मुलींनी त्यांना भेटायचं ठरवलं. त्यावेळी वर्षाताई मुलींसाठी खूप कोर्सेस घेऊन आल्या होत्या. घरी खोटंच सांगून मुली शिरुरला पोहोचल्या. तिथे त्या दिवशी प्रवेश परीक्षा होती. वैद्यकीय सहायक, टायपिंग, ब्युटी पार्लर, ड्रायव्हिंग अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये रस असलेल्या मुली ती परीक्षा द्यायला आल्या होत्या.
अख्खा वर्ग भरला होता. स्वातीनेही परीक्षा दिली. ती उत्तीर्ण झाली आणि तिनं वैद्यकीय सहायकाचा कोर्स निवडला. आता परीक्षा मोठी होती ती घरात सांगण्याची वडिलांपेक्षा आईला समजावणे सोपे होते. तिला सांगितलं. आईने वडिलांना पटवून दिले आणि ते तयार झालेही. साताऱ्याला जायचा दिवस उजाडला. स्वाती आतापर्यंत घर सोडून बाहेर कधीच राहिली नव्हती. साताऱ्यात आल्यावर अनेक दिवस घराची आठवण यायची. रडू यायचं. पण वर्षाताई मुलींना समजावून सांगायच्या. मुलींच मन रमावं म्हणून त्या त्यांना सहलीला घेऊन गेल्या. व्यवहारज्ञान यावं म्हणून बँकेची कामं शिकवली. कोर्टाचं काम कसं चालंत ते दाखवलं.
अखेर कोर्स सुरु झाला. सगळ्याच मुली बारावी पास झालेल्या. पण प्रत्यक्षात ज्ञान म्हणला तर काही नव्हतं. मुली रडकुंडी येत होत्या. एक तर बऱ्याच संकल्पना इंग्रजीतून होत्या आणि सगळ्यांचा त्या विषयाचा पायाच कच्चा होता. शिकवलेलं बरंच डोक्यावरुन जात होतं आणि अगदी थोडं कळत होतं. तशाच प्रात्यक्षिकं सुरु झाली. स्वाती आणि इतर मुली सातारा सिव्हील हॉस्पिटलला जायच्या हा अनुभव मात्र त्यांना आवडू लागला. आधी कोणत्याच गोष्टी मुलींच्या हातात सोपवण्याच्या तिथल्या सिस्टर मंडळींची, सिनिअरची तयारी नव्हती. कारण मुली खूप अननुभवी होत्या. मुलींनी त्यांचा