पान:न्याय रत्न.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आभार. मेहेरबान नानामोरोजी इस्कायर डिपुटी माजिरेट जिल्हा खानदेश, ह्या विद्वान व विख्यांत गृहस्थाचे, विद्वत्तेची, व ज्ञानाची, आणि सद्गुणाची, लोकांत चांगल्या प्रकाराने सुकी प्रसृत आहे; तस्मात त्या बाबींत, मला, विशेष करून लिहून कळविण्याचे प्रयोजन आहे असे नाही; तथापि त्या थोर गृहस्थाने मायाळू अंतःकरणपूर्वक, व मोठ्या आनंदाने, अवघड असा जो न्यायाचा विषय, तो बहुत श्रम घेऊन, मला शिकविला, व तत्संबंधी बहुत प्रकारची उपयुक्त ममें ही मला सांगितली; त्या योगाने न्यायाचे बाबदीत यथामती नवे नवे ग्रंथ ही मला करता येऊ लागले; तस्मात अशा कृपाळ व विद्वान गुरुचे मजवर किती महत्वाचे उपकार आहेत, याचे अनमान, हा माझा ग्रंथ वाचणारे लोक, सहजच करू शकतील. मी तर त्यांचे ते अनपम्य उपकार फेडण्यास अगदी असमर्थ आहे ; या मुळे त्यांची विद्वत्ता आणि सद्गण व स्तय कृये यांचे मोम्या हर्षाने वारंवार निरूपण करण्यास, माझे अंतःकरण वरचदर प्रवाहित होते. ग्रंथकर्ता हा सामान्यबद्धीचा मनुष्य असतां, त्याचे हातून असली उपयोगी कृत्ये केवळ त्यांचे गुरुखाने घडली गेली; तस्मात त्यांचे शिकविणे किती महलाचे किंवा वजनदारीचे आहे हे लोकांस सहजच कळन येईल; तथापि या लिहिण्या वरून त्याचे विद्वः लेचे अनुमान होण्यास हा अल्प ग्रंथ अधारभूत होतो असे नाहीं-अस्नु. ह्या न्यायाच्या में यांत असल्या कृपाळ व विद्वान आणि सद्रूणरूपी गुरूस, व त्याचे अमोलीक विद्येस, सन्मान देणे हे ग्रंथकाचे ह्मणजे विद्यार्थ्यांचे कर्तव्यकर्म आहे; या साठी ह्या "न्यायरल" ग्रंथा। प्रारंभी मोम्या हर्षाने व परम आदरे करून त्यांस गुरुस्थांनी द्यावयास योग्य असा हा सन्मान दिला आहे, आणि या ग्रंथा बद्दलचे सर्वथैव महत्व किंवा भूषण, यदृच्छेने लोक मान्यतेन प में प्राप्त होईल ते सर्व परस्पर त्यांस अर्पण होवो, अशी ईश्वरास विनय पूर्वकप्रार्थना आहे ( सही ) ग्रंथकर्ता,