पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतांत चांगली पुस्तके देण्याची खबरदारी पालक व शिक्षक यांनी घेतली पाहिजे. उपदेश व उदाहरणे यांच्या योगाने मुलांचे वर्तनावर चांगला परिणाम घडतो, व त्या योगाने ती चांगली नीतिमान् होतात असा नित्याचा अनुभव आहे, म्हणून अशा त-हेची जितकी पुस्तके विद्याथ्र्यांच्या हातांत पडतील तितकें फार चांगले. नैतिकशिक्षण देणारी जितकी पुस्तकें निघतील तितकी आज आपणांस वच. अशा पुस्तकांच्या वाचनाने तरुणांचे शील उत्कृष्ट बनते. पाश्चात्य देशांत अशी शेकडो पुस्तकें नेहर्मी पाश्चात्य भाषेत बाहेर पडतात. अशा पुस्तकांची आपल्या मराठी भाषेत बरीच उणीव भासते ती अंशतः तरी दूर व्हावी म्हणून ही नीतिपर व बोधप्रद पुस्तक माला सुरू केलेली आहे. प्रत्येक पुस्तक सुमारे सव्वाशे पानांचे छापण्याचा विचार केलेला आहे. यापुढील पुस्तकें बाहेर पडणे केवळ लोकाश्रय व राजाश्रय यांवर अवलंबून आहे. यश देणार ईश्वर समर्थ आहे.' | सध्यां छपाईचे दर इतके भयंकर वाढले आहेत की, याच पुस्तकाएवढ्या, हजारों प्रति थोडक्या वेळांत खपणाच्या व कोच्या रोजनिशांचीही किंमत पधरा आणेपर्यंत ठेवणे भाग पडले आहे. त्या मानाने या पुस्तकाची बारा आणे किंमत म्हणजे केवळ जेमतेम खर्च भागण्यापुरतीच ठेविली आहे असे आढळून येईल. याचे कारण पुस्तककत्र्यावर लक्ष्मीची कृपा आहे हे नव्हे; तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती असली पुस्तकें पडावीत व त्यांचे इल उत्कृष्ट बनावे हाच ह्या लेखकाचा प्रधान हेतु आहे. हैं होय. मु० रहिमतपूर ता• कोरेगांव ) जे० सातारा रंगो रामचंद्र अट्रेकर. ता० १ फे० स० १९२१ )