प्रस्तावना. याचं लेखकाने लिहिलेले 'नीतिमार्ग प्रदीप पुस्तक पाहलें; याची जी प्रस्तावना आहे तीच या पुस्तकास लागू आहे. सबब तिचाच सारांश खाली दिला आहे. | * मनुष्य जन्मतः चांगला किंवा वाईट असत नाही. त्या वेळी ईश्वरानें मनुष्याच्या मनांत चांगला अगर वाईट यांपैकी कोणताही विचार ठेविलेला नसतो. परंतु मनुष्य जसजसा मोठा होत जातो, तसतसे चांगले व वाईट असे दोन्ही परस्परविरोधी विचार त्याच्या मनांत उत्पन्न होऊ लागतात, व क्रमाक्रमानें त्याच्याबरोबर वरच्यांपैकी एक विचार वाढत जाऊन दुसन्या विचारापेक्षा प्रबल होतो. या दोन विचारांपैकी आपल्या अर्भकांबरोबर कोणचा विचार वाढू द्यावा हा निर्णय आईबापांनी करावयाचा असतो. कोणत्याही आईबापाला आपले लेकरू वाईट निपजावे असे वाटत नसते, ही गोष्ट खरी आहे; तथापि पुष्कळ आईबाप आपल्या मुलांच्या वयाबरोबर कोणचा विचार वाढतो आहे, हे मुळीच पहात नाहींत. वाईट विचार जागच्या जाग खुडून टाकिले असता ते पुढे प्रबल होण्याची भीति नसते. ह्या विचारांची वाढ भोवतालच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. तेव्हां वाईट विचारांचे बीजारोपण मुलांच्या मनांत होऊ न देण्याकरितां आईबापांनी व शिक्षकांनी भोंवतालच्या परिस्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे व त्यांना भल्याच्या संगतीला ठेविले पाहिजे. कारण संगति व शिक्षण हीं जर्शी असतील त्याप्रमाणे मनुष्याच्या अंग चांगुलपणा अथवा वाईटपणा येतो. | संगति व शिक्षण यांशिवाय मनुष्य चांगला किंवा वाई होण्यास तिसरे कारण पुस्तकें होय. लहान मुलांनी वाईट पुस्तके वाचल्यास त्यांची मनें खात्रीनें बिघडतात. यासाठी मुलांच्या
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/4
Appearance