पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९३ निंदा म्हणजे काय--ज्यांत जो अवगुण नसेल तो सांगणे. ९४ धन असन दारिद्य कोठे--कृपणाच्या येथे. ९५ सत्ता असून विवेक कोठे--सद्गुणाच्या येथें, ९६ काम असून विश्रांती कोठे--व्यवस्थेनें वागणारास.. ९७ ज्योतिषी कोण-परिणामाचा अगोदर विचार करून कार्य करणे. ९८ वैद्य कोण--संकटनिवारणार्थ उराय जाणनारा. ९९ दूत कोण--दोन्हीपक्षास अनहितापासून बचावणारा. १०० मंथन कशाचे करावें--ज्ञानाचे.