पान:निवडक अंतर्नाद.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणालो होतो, मी दौऱ्यावर असताना तू माझा खोपा सांभाळीत असतेस की नाही? तू पटकन म्हणालीस, "काऽऽही नाटकी बोलत जाऊ नका!” हो आणि कितीदा तरी म्हणालीस, "तुम्ही थट्टेत बोलता की सिरीयस असतं हे कळतंच नाही..." मला तरी कुठं कळतं? नोकरीच्या गावाला हातानं करून खायचा माझा निर्णय सांगितल्यावर केवढी खुश झालीस तू! "हॉटेलचं खातच जाऊ नका. प्रकृती बिघडते. मी तुम्हाला शिकविते, काळजी करू नका." आणि पोळ्यांचा "क्लास' घेतलास. बोलत होतीस. पोळ्या करून दाखवीत होतीस – मी फक्त तुझ्याकडे पहात असल्याचे कळल्यावर मग मात्र कर्रऽऽकन् चिमटा घेतलास, तश्श्या ह्यताने! मी शिकलो. छान शिकलो. स्वैपाक करताना तुझी हालचाल आठवायचा नवा छंद लागला. तुझा तो अभिनय, ती हालचाल, ते पटकन् कपड्याला ह्यत पुसणं, तांदूळ निवडण्याची तुझी ती पद्धत, अशा कितीतरी लकबी नवीनच कळल्या मला! आतापर्यंत कसा काय गाफिल राहिलो होतो मी! अन् त्या दिवशी पोरं झोपल्यावर मला सांगत होतीस एका आवेगाने तुझ्या आईच्या प्रकृतीचा वृत्तांत. आईची प्रकृती फारच बिघडली होती. इथे येऊन तुझ्या अण्णांनी डॉक्टरकडे दाखवलं होतं. पोटाचं दुखणं. "आईच्या वेदना पाहवत नाहीत होऽऽ कालपासून मला सारखी आईच दिसते समोर, " - त्याच दिवशी दुपारी तुझी आई गेली होती परत कहाळ्याला तुझ्या माहेरी ! ऐकून मी अवाक् झालो होतो. घरात पाऊल पडल्यापासून मी जे जे बोललो होतो, हसलो होतो ते पुन्हा पुन्हा आठवून पाहिलं. तुझा चेहरा आठवला... हसला, मला अपराध्यासारखं वाटलं होतं. "मग मला आल्या आल्याच का सांगितलं नाहीस?" - तुझी आई उपचाराकरिता महिनाभर राहिली. त्यावेळेस तर तिचं सगळं करून तू पोरांचं, माझं, घरचं - ही सगळी कामं तर नेहमीपेक्षा तातडीने केलीस. "तुम्ही आधीच त्रासून गेलेले असता.. किती दगदग तुमची - त्यात आल्या आल्या कसं सांगावं?" पोरं गाढ झोपली होती. तू किती प्रौढ वाटत होतीस. विचारी डोळे.. त्यात काळजी, तो चेहरा ते वागणंचा अनोळखी होतं मला. क्वचित दिसणारं, इथे गावाला आलो आणि माझ्यावरच चिडलो. घरची काय स्थिती आहे, घरच्यांच्या अडचणी काही आहेत का, याची आधी चौकशी करायची सोडून काय खिदळत असतो आपण मूर्खासारखं! त्याच्या उलट मनातील वेदना, तापलेलं दूध झाकावं, तशी झाकून तू माझं स्वागत करतेस! विचारपूस करतेस, हसतेस, कौतुक करतेस! हे कसं काय? वेदना लपवून हसताना तुला काय वाटत असेल, कधी सांगितले नाहीस का? ९८ निवडक अंतर्नाद परत विचारलंस सुद्धा. हळवेपणाने, "आईमुळे तुमची, पोरांची आबाळ झाली का हो माझ्याकडून ?” “उतराई," तू म्हणालीस, शनिवारी संध्याकाळी घर गाठलं, की माझा धिंगाणा सुरू होतो पोरांबरोबर, तू पण वाट पहात असतेस. हलकं हसून मस्त चहा करून आणतेस. माझा पाऊस सुरूच असते शब्दांचा, “आई इथे महिनाभर होती नं, तिचं मीच केलं सगळं. आई- मुसळधार, तू हसतेस, बोलतेस. माझं तर लक्षच नसतं तुझ्याकडे अण्णांना वाईट वाटत असेल... त्यांनी मला साडी घेऊन दिली...” तेवढं. फक्त गप्पा, बोलणं, हसणं.... मला काय वाटलं म्हणून सांगू! त्या आठवड्यात ते तुझं वाक्य किती घर करून होतं मनात! असं का वाटलं तुला? असं बोललीसच कसं तू? का? उपचारानंतर आई गावाला गेली आणि त्या शनिवारी रात्री तू रडतच उठलीस. मध्यरात्रीनंतर... रडतच म्हणत होतीस... "मला नं, वाईट्ट स्वप्न पडलं... आई गेल्याचं.” रात्रीचा तो सन्नाटा... वॉचमनच्या शिट्टया, कुत्र्याचं ओरडणं.. मी तुला थोपटलं, समजूत घातली. तू झोपलीस. पुन्हा उठलीस, म्हणालीस "मला नं, मला एक शीर्षक सुचलंय." "कशाचं?” “गोष्टीचं! मला एक गोष्टच सुचलीय." माझ्या लिखाणाच्या चर्चेचा तुझ्यावर झालेला हा परिणाम ! "कोणतं?" मी म्हणालो, "काही घेऊन देणं आवश्यकच असतं का? पुष्कळदा तुझ्याबद्दल ते किती कौतुकाने बोलतात! तेवढंच...” "हो, " तू म्हणालीस. अन् चटकन् झोपूनपण गेलीस. इतक्या सहज... असं कसं? आणि आता माझं बोलणं, माझी थट्टा कमी झाली आहे. माझं हे वागणं माझ्या प्रकृतीशी जसं विसंगत, तसंच तुझी प्रकृती आताची... ऑपरेशन झाल्यानंतरची तू म्हणजे पंख काढून टाकलेली पक्षिणीच की नाही? अं? डॉक्टर म्हणतात, डिलीव्हरीनंतर केलेलं ऑपरेशन सोपं असतं; पण आता अशा "ऑड" वेळच्या ऑपरेशनमध्ये वीकनेस येणारच. दोनतीन महिने लागतील. पण, हे दोनतीन महिने जावेत केव्हा गं? ती लगबग, हालचाल, तेवळून गेलेलं... सुकलेलं; आणि आता तुझं ते सगळं संथ, सावकाश वागणं-बोलणं पाहिलं की.... ...मग करमत नाही नोकरीच्या गावाला. संसाराची आणि संसारासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीची ही अशी कशी विचित्र गाठ पडली आहे आपल्या नशिबात... माझी थट्टा उफाळून येतेच कधी. त्या वेळेस तुझं ते हसणं... हलक्या आवाजात हसणं... हलकेच पोटावर हात घेणं... मग मी आवरतो. "अहो, मी ही अशी आणि अशा अवस्थेत तुम्ही मला हसवता ! माझ्या प्रकृतीची काळजी कशी नाही तुम्हाला? अं?”