पान:निवडक अंतर्नाद.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, दामले तळमजल्यावरची जागा सोडून गेले त्याच्या पुढच्याच महिन्यात सेक्रेटरीच्या घराची रंगरंगोटी झाली होती. बेडरूमला एअरकंडीशनर बसवण्यात आला होता. अध्यक्षांची नवी मारुतीही अगदी अलीकडेच आली होती. ह्या साऱ्याचा अर्थ आता कोठे त्याच्यापर्यंत पोचत होता. प्रमोदचं लक्ष घड्याळाकडे गेलं. आठ वाजून गेले होते. आज ऑफिसला जायला उशीर होणार, तो दचकून ताडकन उठला आणि मग त्याच्या लक्षात आलं, जे चाललं होतं ते ऑफिसला वेळेवर जाण्यापेक्षा त्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं. प्रमोद मध्यमवर्गातनं अचानक श्रीमंत वर्गात उचलला गेला होता. ऑफिसची फिकीर त्याला आता राहिली नव्हती. तो पुन्हा आरामात कोचावर बसला. “आज रात्री सोसायटीची मीटिंग आहे. तुम्ही सहसा येत नाही, मला ठाऊक आहे. पण आज मात्र या आज थोडी वादावादी होण्याची शक्यता आहे. " "वादावादी? कशावर?" "त्याचं काय आहे, ते तळमजल्यावर जे रिनोव्हेशनचं काम चाललंय ना, ते सोसायटीतल्या काही जणांना पसंत नाही. त्यांचं ऑब्जेक्शन आहे त्यावर, " "ऑब्जेक्शन कशाबद्दल? आवाज होतो म्हणून?” प्रमोदला त्याच्या आईची तक्रार आठवली. "की, धूळ-धुरळा उडतो म्हणून?" "छे, हो! आवाजाचं काय एवढं? पण काहीजणांचं म्हणणं असं की रिनोव्हेशनमुळे इमारतीला धोका आहे” "इमारतीला कसला धोका आलाय रिनोव्हेशनमुळे? काहीतरीच!” "नाहीतर काय?” वाधवानी धूर्तपणे हसत म्हणाले, "खरं सांगू का देशमानेसाहेब? दामल्यांना त्यांच्या जागेचे भरपूर पैसे मिळाले म्हणून काहीजणांच्या पोटात दुखतंय झालं. त्यांचे ब्लॉक्स मागच्या अंगाला असल्यामुळं ते जाण्याची शक्यता कमी, ती खरी खंत आहे त्यांची, म्हणून ते काहीतरी ऑब्जेक्शन्स घेताहेत झालं. बरोबर आहे ना?" "बरोबर, अगदी बरोबर, " प्रमोदला पटलं. " तेव्हा देशमानेसाहेब, तुम्ही आजच्या मीटिंगला याच. आपले सेक्रेटरी, अध्यक्ष, खजिनदार सगळी मंडळी आहेत. पण काहीकाहीजणं नसती कुसपटं काढून वाद करण्यात पटाईत आहेत. त्यांची अर्थात मेजॉरिटी नाहीये. पण त्यांनी काही काड्या घालण्यापूर्वीच त्यांना आवर घातलेला बरा. नाही का?” "मी ओळखतो अशा लोकांना दुसऱ्या मजल्यावरचे माणके असणार आणि तिसऱ्या मजल्यावरचे तावडे." प्रमोद बोलून गेला. "अगदी बरोबर ओळखलंत देशमानेसाहेब यांना दुसऱ्यांचं काही चांगलं झालेलं बघवत नाही. " खरं तर या दोघांबद्दल प्रमोदचं मत मुळीच वाईट नव्हतं. ८८ निवडक अंतर्नाद कुणालाही मदत करण्यात माणके नेहमी पुढं असत, प्रमोदच्या कुटुंबालाही त्यांनी छोटीमोठी मदत केली होती. तावडे तर त्यांच्या भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जात. ग्राहक पंचायतीचं कामही ते बघत. लोकांच्या छोट्यामोठ्या कामासाठी संबंधितांना भेटणं, वर्तमानपत्रात पत्र लिहिणं अशा गोष्टी ते वयस्कर असूनही उत्साहानं करत. इतकं असून ते कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधलेले नव्हते, म्हणून प्रमोदला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटे पण आज परिस्थिती बदलली होती. काही कारणानं तळमजल्यावरचं सिद्धिविनायक ज्युवेलर्सचं काम बंद पडलं तर मग त्यांना प्रमोदच्या ब्लॉकमध्ये रस राहणार नव्हता. प्रमोद आणि माधुरीने उभारलेले भविष्याबद्दलचे सारे इमले मग हवेतच विरून गेले असते. अगदी दाराशी आलेली संधी वाया गेली असती. ह्या कल्पनेनं प्रमोदचा अगदी चडफडाट झाला. "मग तुम्ही रात्री येताय ना नक्की ?" “येतो, येतो. नक्की येतो." प्रमोद उठला. "बघा, नाहीतर त्यांना काय, इथं जमलं नाही तर समोरच्या बिल्डिंगमध्ये बोलणी चालली आहेतच त्यांची. तेव्हा -" खुंटी हलवून बळकट करत वाधवानींनी विचारलं. "काही काळजी करू नका, मी येईन. आता निघतो मी.” रात्री सोसायटीच्या मीटिंगमध्ये प्रमोदला पाहून सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटलं. “अरे वा! देशमाने, तुम्ही ? या या, " तावड्यांनी स्वागत केलं. "बरं झालं तुम्ही आलात ते." माणके म्हणाले, "आज महत्वाच्या विषयांवर बोलायचंय.” प्रमोद कसनुसा हसला. सुरुवातीला सोसायटीच्या वॉचमनचा पगार वाढलेली पाणीपट्टी, अशा सटरफटर विषयांवर थोडं बोलणं झाल्यावर तळमजल्यावरच्या रिनोव्हेशनचा प्रश्न निघाला. "दामल्यांच्या जागेत सध्या जी तोडफोड चालली आहे, ती थांबवायला हवी. त्याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. आपल्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं." माणकेंनी विषयाला तोंड फोडलं. "ऑब्जेक्शन कसं घेणार ?” सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले. "सिद्धिविनायक ज्युवेलर्स आता आपल्या सोसायटीचे मेंबर आहेत. त्यांनी रीतसर परवानगी घेऊनच रिनोव्हेशन सुरू केलंय." "रिनोव्हेशन ? सध्या तिथं जी तोडफोड चाललीय त्याला नोव्हेशन म्हणता ? चवक पाडापाडी चाललीय. आतल्या खोलीच्या भिंती उतरवून मोठा हॉल करताहेत ती लोकं. याला काय रिनोव्हेशन म्हणायचं? आणि जमिनीची पातळी खाली करून तळमजला यईप बांधताहेत. तुम्ही उद्या बघून या." "मला कल्पना आहे पण त्यानं काय असं बिघडणार आहे?