पान:निवडक अंतर्नाद.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रेखाटन भ. मा. परसवाळे परदेशात गेलेल्या दोस्तांनो तुमची रोज आठवण यावी एवढी सलगी आता कुठे? तरी होतात तुमचे भास, अधे-मधे, इथे-तिथे da कोलाहल बाहेर असतो, आत तरी वेगळे काय? सायंकाळी परतून येते धूळमाखली शिणली गाय तसेच माझे मनदेखील तुमचे होते संध्येला स्वत:शीच राहे बोलत, स्वत:च थांबे सोबतीला तुम्ही तिथे, मी इथे : मी खरे तर इथे-तिथे माझ्यावाचून सांगा आता कुठली तुम्ही गाता गीते? खळखळणारे आपले वय खळखळ करत संपून गेले फाटे फुटले, रस्ते चुकले, आपला गाव शोधित गेले तुमचा मुक्काम पक्का तिथे, माझा डेरा पडला इथे तुमची रोज आठवण यावी एवढी सलगी आता कुठे? तरीही पश्चिमवारा येता, हृदयापाशी काही तुटे आणि तुमचे भास होतात असे क्षणात इथे-तिथे .... अधे मधे....इथे-तिथे! ७८ निवडक अंतर्नाद ( दिवाळी २००८) आशुतोष जावडेकर सुगंध जे नको तेच मी करत गेलो! मी तुझ्या अंतरी शिरत गेलो! काय कोणी कधी प्रेम केले? वेदनेलाच मी वरत गेलो! ते शहाणे सुखी लोक होते! मीच वेडापिसा ठरत गेलो! लाख नाकार तू शब्द माझे, मी तुझ्याही मनी जिरत गेलो! जन्म कोड्यापरी काढला मी! संपतानाच मी उरत गेलो! डोळियांनी मला 'बंद' केले... लेखणीतून मी झरत गेलो! ते तुझे धोरणी दार होते... मी जसाच्या तसा परत गेलो! सोबतीचा कुठे प्रश्न होता? हात माझाच मी धरत गेलो! पाय होते जरी बांधलेले, मी सुगंधापरी फिरत गेलो! (दिवाळी १९९६) सुरेश भट कविता - साठीनंतरची खूप वाचले पदव्या झाल्या सूर्य अजूनी ढळला नाही आयुष्याचा अर्थ खरोखर अजून मजला कळला नाही ॥ मी कोण कुठुनी आलो सार्थक झाले का जन्माचे? ह्या प्रश्नाचे उत्तर मजला पुस्तकात आढळले नाही ॥ मी उत्तर शोधीत बसलो अवती भवती येथे तेथे नाद आतला माझा मजला कळून कदाचित वळला नाही ॥ रंग मनाचे ढंग जनाचे समजायाला अवघड सारे मित्र कोण अन् शत्रू कुठला फरक ह्यातला कळला नाही ॥ (दिवाळी २०१७) विजय पांढरीपांडे