पान:निवडक अंतर्नाद.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या फोटूमदल्या बाईवानी, नुस्तीच ढिम्म बसून हानार हाय बगा उद्यापास्नऽऽ काटवटीत घेनार न्हाई पीठ का पानी फुकनार न्हाई चूल छाताड फुटल्यावानी त्या फोटूमदल्या बाईवानी नुस्तीच हिम्म बसून नार हाय बगा उद्यापास्नऽऽ जरा घराबाहेर पडावं, घसा घसा राबावं तर ते न्हाई, मजुरीला साखर कारखान्यात जावावं, तर ते न्हाई, नुस्त होसन्यापुरतं भायेर पडायचं आनी मला मारत घरात घुसायचं, गेला अस्तासा रामभाऊ दिवश्याच्या गुऱ्हाळावर पोरांनी बोटं चाटली आस्ती काकवीबरबर चव आली आस्ती भाकरीलाबी चार दिस तर तुमी मातुर हिथंच पिवून फिस् मी तरी एकटीनं कुठं कुठं फुरं पडायचं हे वझ्झं मी एकटीनंच व्हय वो वडायचं? त्या फोटूमदल्या बाईवानी ले वाटतंय मलाबी त्या फोटुमदल्या बाईवानी गंध- पावडर लावावी केसामंदी घानेरीची का हुईना फुलं टोचावी रुपायाभर कुंकू लावून, आंगभर पदर घिवून सखीच्या न्हाईतर ठकीच्या लगनाला मिरवत लांबलचक उखान्यामदी तुमचं नाव घेवावी, तोंडाची चवच घालीवलीया या संसारानी/ मानसाचं कसं नाव घ्यावं उखान्यानं? हात मार्ग घ्या! आता न्हाई मी झेलायची मार! गाडगी फुटली तर फुटू देत चार आनतीच बगा नाऱ्या कुंभाराकडनं एक चूल आनी चार गाडगी उदारीवर राबती गावाच्या बांधाबांधानं मजुरीवर रोजचा कामाचा पिट्टा पाडीन आनी पोरांस्नीच तेवडं जेवायला वाडीन, तुमी आनी तुमचं प्वाट पायजे तिकडं निगा पटत आसल तर बगा न्हाई तर त्या फोटुमदल्या बाईवानी नुस्तीच ढिम्म बसून हानार हाय बगा उद्यापास्नऽऽ लावलंय म्हनं सरकारनं बायकांचंबी कसलं आरकशान त्येच्याबरोबर तिला बी देतो आता शिकशान, उद्याच जावून गुरुजीच्या पाया पडती, शिकवनी का काय म्हंत्यात तेबी लावती, त्येला बालिस्टर आनी तिला डाक्टरीन करायला लावनार, पटत असाल तर बगा जरा सुदीनं वागाऽऽ न्हाईतर त्या फोटूमदल्या बाईवानी नुस्तीच ढिम्म बसून हानार हाय बगा उद्यापास्नऽऽ बगशीलाच तुमी! (दिवाळी १९९९) संजय कृष्णाजी पाटील रेखाटन : धनंजय सस्तकर निवडक अंतर्नाद ७७