पान:निवडक अंतर्नाद.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अजूनही जाणवतो. त्याची आई म्हणते, की मिसिसिपी भागात जो वंशद्वेष आहे तो उघडपणे दिसतो, पण ॲरिझोना, कॅलिफोर्निया या भागात वंशद्वेष छुपा आहे. माझ्या मते वंशभेदाचा विखार, वणवा विझून गेल्यानंतर निखारे उरावेत एवढाच उरला आहे. इतर कुठल्याही अमेरिकन माणसाला जेवढ्या संधी असतील तेवढ्या आफ्रिकन अमेरिकन माणसालापण आहेत. असे असूनही काळ्या माणसाची ओळख ( identity) ही मुख्यत्वेकरून खेळाडू आणि गायक (Rap singers) अशीच आहे याचा रिचर्डला अभिमान नाही तर खंत आहे. कारण या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्तींचा मादक द्रव्ये व विध्वंस यांच्याशी संबंध जोडला जातो. रिचर्ड स्वत: शाळा कॉलेजात बास्केटबॉल खेळाडू होता, पण पुढे त्याने इंग्लिशमध्ये बीए करून स्वतः चा बिझिनेस काढला. याचे कारण कदाचित त्याच्या पूर्वायुष्यातील घटनांवरही अवलंबून असेल. तो पाच वर्षांचा असताना त्याचे वडील ओकलँड, कॅलिफोर्निया येथे त्याच्यासमोर एका बंदूकधारी घरफोड्या चोराकडून मारले गेले. हा गुन्हा वंशद्वेषामुळे घडलेला नव्हता. "It was a random act of violence," तो म्हणतो. तेव्हा त्याची आई, मिनी बास, पंचवीस वर्षांची होती. तिने परत कधीच लग्न केले नाही, इतकेच नव्हे, तर डेटिंगसुद्धा केले नाही. रिचर्डची आई त्याच्यासाठी आदर्श (role model) आहे, त्याची हिरो आहे, त्याची गुरू आहे. पण तिच्या प्रेमात बंधन नाही – रिचर्डची बायको, मेरी ग्रिफिन, गोरी म्हणजे व्हाइट अमेरिकन आहे त्यांच्या मुली – बर्कली आणि या गोऱ्या आहेत; माया मेरी सारख्या, त्याच्या आंतरवंशीय लग्नाविषयी त्याला बरेचदा विचारण्यात आले असावे, कारण त्याचे उत्तर तयार होते - त्याच्या आईत असलेले गुण त्याला या गोऱ्या मुलीत दिसले. अर्थात लग्न झाल्यावर त्याला त्याच्या सासरी मोकळे (comfortable) वाटत नसे; त्याला सारखा असा संशय यायचा, की ग्रिफिन मंडळी त्याच्या कुटुंबाविषयी आडून आडून बोलताहेत. पण त्याला थोड्यात दिवसांत लक्षात आले की मेरीच्या आईवडिलांनी त्याचा जावई म्हणून पूर्णपणे स्वीकार केला आहे. रिचर्ड दर उन्हाळ्यात केप कॉडला त्याच्या सासरी बीच हाऊसवर राहायला जातो, यावरूनच ते त्याला अतिशय प्रेमाने व आदराने वागवतात हे दिसून येते. दिसायला चांगला आहे, हेही पहिल्यांदाच मला लक्षात आले. अर्थात, त्याच्या आईचे सौंदर्य आणि त्याचे देखणेपण जगाच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसेलच असे नाही, कारण आपल्या सगळ्यांना युरोपिअन सौंदर्य हेच खरे सौंदर्य आहे असे शिकवले गेले आहे. कृष्णवर्णीयांची त्वचा (complexion ) अतिशय सुंदर असते, त्यांच्यात असणारा गोडवा, त्यांचा बांधा इतर वंशांत दिसत नाही. म्हणूनच की काय, अमेरिकेच्या सुपरमॉडेल्स नेओमी कॅम्पबेल, टायरा बँक्स वगैरे आफ्रिकन अमेरिकनच आहेत. दास्यातून मुक्त झाल्यानंतर अनेक दशकांनी, सुमारे १९२०च्या दरम्यान, मार्कस गा (Marcus Garvey) या काळ्या नेत्याने ठरवले, की अमेरिकेत आणलेल्या सर्व आफ्रिकन लोकांना परत आफ्रिकेत न्यायचे. तशी जहाजे भरून तयारीपण झाली. पण रिचर्डने सांगितले, की आफ्रिकेतील लायबेरिया या देशात पोचल्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला. कारण अमेरिकेत ज्या सोयी सामान्य माणसालासुद्धा उपलब्ध आहेत, त्या तिथे नव्हत्या; त्यामुळे त्यांचे देशभक्तीचे रोमँटिक स्वप्न तिथेच धुळीस मिळाले आणि बहुतांशी लोक अमेरिकेत परत आले. "आम्ही उन्हाळ्यात फिनिक्सहून केप कॉडला जातो, " (म्हणजे नागपूरहून नाशिक) हे सांगताना रिचर्डचा चेहरा फुलला. त्याच्या चॉकलेट ब्राऊन चेहऱ्याला खळ्या पडतात आणि तो ६० • निवडक अंतर्नाद अमेरिकेत civil rights movement १९६०च्या दशकात झाली. तेव्हापासून कृष्णवर्णीयांनी केवढेतरी सामाजिक अंतर पार केले आहे. काळ्या लोकांनी धर्म आणि भाषा गोऱ्यांचीच ठेवली; त्या भिंती कृष्णवर्णीय नेत्यांना पाडाव्या लागल्या नाहीत! रिचर्डला इंग्लिश भाषा प्रिय आहे. "भाषेला वंश नसतो, " अमेरिकेतला ह्य साधासुधा माणूस म्हणाला! रिचर्डला फक्त काळा म्हणून कुठलीही खास सोय, कुबडी किंवा पाठीवर थाप नको आहे. त्याची मुलेपण इतर अमेरिकन मुलांबरोबर स्पर्धा करून शाळा-कॉलेजात प्रवेश मिळवतील. अमेरिकेतील आफ्रिकन लोकांच्या सामाजिक जीवनाचा चढता आलेख रिचर्डच्या आयुष्यावरून दिसतो. दास्याच्या गुलामगिरीच्या गोष्टी आता इतिहासकालीन झाल्या आहेत. युद्धस्य वार्ता रम्या! रिचर्ड हसत हसत सांगत होता, की गुलामही एकमेकांमध्ये पंक्तिभेद करत असत घरात काम करणारे गुलाम (house slaves ) शेतातल्या गुलामांपेक्षा (farm slaves) उजळ असत आणि ते शेतगुलामांना कमी लेखत. ('स्मृतिचित्रे' मध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी जी ब्राह्मणेतर समाजाची उतरंड वर्णिली आहे, त्याची आठवण झाली.) कृष्णवर्णीयांच्या जखमांवर खरेच खपल्या धरल्या गेल्या आहेत का? की रिचर्ड फक्त माझ्यासारख्या 'निमगोय' लोकांनाच अशा गोष्टी सांगू शकतो? दायातून मुक्त झाल्यानंतर अनेक दशकांनी सुमारे १९२० च्या दरम्यान, मार्कस गाह (Marcus Garvey) या काळ्या नेत्याने ठरवले, की अमेरिकेत आणलेल्या सर्व आफ्रिकन लोकांना परत आफ्रिकेत न्यायचे. तशी जहाजे भरून तयारीपण झाली. पण रिचर्डने सांगितले, की आफ्रिकेतील लायबेरिया या देशात पोचल्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला. कारण अमेरिकेत ज्या सोयी सामान्य माणसालासुद्धा उपलब्ध आहेत, त्या तिथे नव्हत्या, त्यामुळे त्यांचे देशभक्तीचे रोमँटिक स्वप्न तिथेच धुळीस मिळाले आणि बहुतांशी लोक अमेरिकेत परत आले. रिचर्डला