पान:निवडक अंतर्नाद.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पन्नास हबशी गुलाम भाग्यश्री बारलिंगे “रिचर्ड हसत हसत सांगत होता, की गुलामही एकमेकांमध्ये पंक्तिभेद करत असत - घरात काम करणारे गुलाम (house slaves) शेतातल्या गुलामांपेक्षा (farm slaves) उजळ असत आणि ते शेतगुलामांना कमी लेखत. ('स्मृतिचित्रे' मध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी जी ब्राह्मणेतर समाजाची उतरंड वर्णिली आहे, त्याची आठवण झाली.) " कारुण्याचा झरा माझ्या मनात अनाहत वाहत असावा, अशी लोकांची माझ्याकडून अपेक्षा असते मी स्त्री असल्यामुळे व डॉक्टर असल्यामुळे! माझ्या मनात असे झरे आहेत का, याचा पत्ता मला अजूनतरी लागलेला नाही. पण अमेरिकेत करुणेविषयी फार बोलले जाते. त्यामुळे मी नकळत स्वतःची उलटतपासणी करत असते. 'Compassion burn-out' या विषयावर आमच्या हॉस्पिटलमध्ये भाषणे होतात. याचा अर्थ करुणा ही एक फार काळ न टिकणारी भावना आहे. 'करुणेची शिकवण' येशू ख्रिस्ताने जगाला दिली असे म्हटले जाते. म्हणजे आपण जन्मतःच स्वार्थी आणि क्रूर असतो आणि करुणा हा गुण आपल्याला शिकावा लागतो. करुणा, सहनशक्ती, विनोदबुद्धी हे गुण जर ब्लडप्रेशर, पल्स यांसारखे मोजता आले असते, तर माणसाच्या अस्तित्वाची खोली अधिक कळली असती. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना बुद्धीबरोबर करुणेचीही चाचणी घेता आली असती. माझ्या मध्यमवर्गीय बालपणी भिकाऱ्याला भीक घालणे आणि 'श्यामची आईं' पुस्तक वाचणे यापलीकडे कारुण्य जोखणारे प्रसंग आल्याचे आठवत नाही. आरुणीची गोष्ट, गुरुकुलात झाडपाला खाऊन, गुरूच्या घरी काबाडकष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी वाचून डोळ्यात टिपूसभरही पाणी आल्याचे आठवत नाही. या गोष्टींचा निष्कर्ष म्हणजे 'गुरू किती चांगले' असाच शिकवल्याचे आठवते. सर्वांत आवडते पुस्तक 'अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा' यात एक मनोहर चित्र होते- सुलतानाच्या दरबारात अल्लाउद्दिन 'नजराणे' घेऊन जातो; ते नजराणे म्हणजे हिऱ्यांनी भरलेली ताटे, अनेक स्त्रिया व पन्नास हबशी गुलाम! हबशी हा शब्द मी प्रथम तिथेच (आणि आत्तापर्यंत तरी फक्त तिथेच!) वाचला, तेव्हा हे कुणालाच आक्षेपार्ह वाटले नव्हते. (आत्ता स्वतःचे मानसिक विश्लेषण करताना आपण नकळत 'human trafficking आणि गुलामगिरी यांना मूक संमती दिली होती की काय, असा भयानक विचार मनाला चाटून गेला. अर्थात, ते फक्त गोष्टीचे पुस्तक होते, संदर्भ वेगळे होते, वेगळ्या काळातील ती संस्कृती होती इत्यादी अनेक युक्तिवाद करून मी स्वतःची समजूत घातली. ) त्यामुळे माझ्या मनात करुणेचे झरे काय, साधा पाझरसुद्धा नसावा, असाच माझा समज होता. तो गैरसमज होता हे रिचर्ड बास (Richard Bass ), एका हॉस्पिसचा मालक, मला भेटायला आला तेव्हा कळले. मी 'compassionate physician' आहे असे त्याला कळले ● आणि म्हणून तो मला त्याच्या हॉस्पिसमध्ये काम करशील का, हे विचारायला आला आहे, असे त्याने पहिल्याच भेटीत सांगितले. (हॉस्पिस ही संस्था मृत्यूच्या दारात असणाऱ्या व्यक्तींची मरणाची क्रिया जास्तीत जास्त वेदनारहित कशी होईल याची काळजी घेते.) पन्नास हबशी गुलामांपैकी एक गुलाम चक्क अमेरिकन जीन्स आणि टी-शर्ट घालून माझ्यासमोर उभा राहील, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पहिला हबशी (आफ्रिकन) माणूस मी पाहिला तो अमेरिकेत एअरपोर्टवर आपल्या पुराणांमध्ये वर्णन केलेले राक्षस लोक ते हेच, असे प्रथमदर्शनी वाटले. पुढे निरनिराळ्या पदांवर कृष्णवर्णीय व्यक्ती बघितल्या - अगदी झाडूवाल्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत! सर्वच आफ्रिकन लोक काही पर्वतासारखे धिप्पाड असतात असे नाही. त्यांपैकी काहीतर अगदी भारतीय वायवेत असे मध्यम चणीचे! गोऱ्या लोकांसारखेच हसरे व अमेरिकन शिष्टाचार पाळणारे, अमेरिकेत अनेक वर्षे राहिल्यानंतर मलातरी दैनंदिन जीवनात गोया काळ्यांमध्ये काही फरक आहे असे वाटत नाही. कदाचित माझ्या मर्यादित सामाजिक वर्तुळामुळे अमेरिका मला एकरंगी, एकसंध वाटत असावी. काळे लोक अॅरिझोनात कमी फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क या भागात त्यांची संख्या जास्त रिचर्ड हा एक सामान्य आफ्रिकन अमेरिकन माणूस! मी एक सामान्य एशिअन अमेरिकन स्त्री ! दोघेही गप्पा मारण्यात पटाईत. हॉस्पिसच्या कामामुळे आम्ही भेटतो. एकदा आमचे संभाषण हॉस्पिसमधले पेशंट्स, तिथे काम करणाऱ्या निरनिराळ्या देशांतल्या स्त्रिया, करुणेचे महत्व यावरून भारतीय स्त्रिया आणि नंतर अमेरिकेतील काळ्या लोकांवर घसरले. रिचर्डला अमेरिका एकरंगी, एकसंध वाटत नाही. त्याला वंशभेद निवडक अंतर्नाद ५९