पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिघडणारी मराठी भाषा मे २०१५ अंकात मराठी भाषेच्या संबंधातील विचार व्यक्त करणारे तीन वाचनीय लेख प्रसिद्ध केले आहेत. मराठी भाषेत अनेक अनावश्यक शब्दांचा शिरकाव, सुळसुळाट धुमाकूळ सध्या चालू आहे आणि त्यातच आपण मोठेपणा मिरवत आहोत. असे मानले जाते की एखाद्या भाषेत परभाषेतील शब्द आले, की ती भाषा वाढते, अधिक समृद्ध होण्यास मदत होते. आपल्या मराठीचे पाहता, अगोदर मुस्लिम व नंतर इंग्रजांच्या राजवटीमुळे अनेक उर्दू, हिंदी व इंग्रजी शब्दांची भर पडली. काही हिंदी इंग्रजी शब्द तर आपण रोजच्या जीवनात सरसकट मूळ मराठी शब्दांऐवजी वापरत आहोत. ते आपल्या अंगवळणी पडले आहे. तथापि अलीकडील स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरेकडून सतत होत राहणाऱ्या हिंदी भाषेच्या वर्चस्वामुळे मराठी भाषा आणखीच बिघडून मूळ अर्थ न पाहता चुकीचे शब्द वापरले जात आहेत. असे काही शब्द आणि त्यांचे केले जाणारे दैनंदिन जीवनातले उपयोग खाली देत आहे १) संपत्र: आज कोणताही समारंभ, सोहळा झाला, असे न म्हणता तो समारंभ संपत्र झाला असे म्हणतात. नुसता 'झाला' असे म्हणण्याने कोणता गैर अर्थ व्यक्त होतो? षड्यंत्र कट, कारस्थान या शब्दांऐवजी हा शब्द! निर्धारित: ठरलेली वेळ. ठरलेली रेल्वे/बस गाडीची वेळ असे न म्हणता, निर्धारित गाडी आज उशिरा येत आहे, अशा रेल्वे स्थानकावरील घोषणा आपण रोज ऐकतो. ४) बोजा एखादी सवलत दिली, पगारवाढ मान्य करण्यात आली, तर त्याचा भार पडला असे म्हणायचे नाही. बोजा पडला, असे म्हटले तर कोणता विशेष असा भार पडतो? आणखी कितीतरी अनावश्यक शब्द देता येतील, येथे थांबतो. मंगेश नाबर, परळ, मुंबई (दिवाळी २०१५) २) ३) आठवणी डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या अंतर्नादच्या जानेवारी अंकातील अजित कानिटकरांचा डॉ. वसंत गोवारीकर यांच्यावरील लेख वाचला. त्यांच्या संबंधातील दोन आठवणी येथे नोंदू इच्छितो. गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते त्या काळात मी संख्याशास्त्र विभागाचा प्रमुख होतो. हवामान अंदाज या विषयात माझी थोडी लुडबुड होती, 'गोवारीकर मॉन्सून मॉडेल' या नावाने ओळखली जाणारी पद्धत ही संख्याशास्त्रीय होती. तिचे काही तांत्रिक पैलू मला पटत नसत. म्हणून मी आणि सहकाऱ्यांनी एक अन्य मॉडेल विकसित करून प्रसिद्ध केले. या काळात एके दिवशी मी माझ्या कार्यालयात काम करीत असताना माझा शिपाई धावत आत आला. संध्याकाळचे पाच वाजले होते, तो म्हणाला, की कुलगुरुमहोदय चालत आपल्या विभागाकडे येत आहेत. मी उत्तर दिले, की ते खरेच आले तर चहापानाची व्यवस्था करा. एवढ्यात ते पोचलेदेखील त्यांना माझ्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल आणि हवामानअंदाज या ५०४ निवडक अंतर्नाद विषयातील कामाबद्दल उत्सुकता होती. मी माझा दृष्टिकोन समजावून सांगितला, गोवारीकरांनी काही उपयुक्त सूचना केल्या व मदतीचा हात पुढे केला. त्यांच्यामुळे आम्हाला हवामानखात्यातून आकडेवारी व अन्य माहिती मिळणे सुकर झाले. दुसरी आठवणसुद्धा गोवारीकरांनी विद्यापीठातील उपयोजित संशोधनाला केलेल्या भरघोस मदतीची आहे खरे तर, मी व माझे सहकारी सातत्याने वीस-पंचवीस वर्षे औद्योगिक कंपन्यांसाठी विविध प्रकारचे काम करीत होतो. त्यातून मिळणाऱ्या रकमांचे धनादेश रीतसर विद्यापीठाच्या 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क' या खात्याकडे सुपूर्द करीत होतो. गोवारीकरांचा अपवाद वगळता अन्य कोणी कुलगुरूंनी (मदत देणे फार दूर) उत्तेजनाचा एक शब्दसुद्धा कधी उच्चारला नाही. म्हणून गोवारीकरांचे वेगळेपण आम्हाला फार भावले. माझी एक आठवण संकरित गोपैदास संशोधनाच्या संदर्भात आहे. विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक सीतारामम यांना बैलांच्या शुक्रजंतूंच्या अभ्यासात एक शोध लागला. सीतारामम यांच्या अभ्यासाला संख्याशास्त्रीय पाठबळ देणे हे माझे आवडीचे काम होते. म्हणून माझी त्या विभागात सतत ऊठबस होती. संकर करण्यासाठी देशी गाईच्या शरीरात विलायती बैलाचे वीर्य कृत्रिम रेतन पद्धतीने घालतात. हा खटाटोप ६०-७० टक्के वेळा फसतो व गाय गाभण राहात नाही. यामुळे खर्च वाढतो व अमूल्य वेळ वाया जातो. सीतारामम यांचा शोध असा, की वीर्यावर काही विशिष्ट प्रक्रिया केली तर कृत्रिम रेतन यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच वाढते. हे संशोधन व्यवहारात आणले तर शेतकऱ्यांच्या पदरात भरघोस फायदा पडेल असे डेअरी तज्ज्ञांचे मत होते. अर्थात असे संशोधन वापरात आणण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणे (फील्ड टेस्टिंग) गरजेचे असते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. शिवाय सरकारच्या पशुधन विभागाचे पाठबळ जरुरीचे असते. हा सगळा घाट कसा जुळून येणार? ही आमची चिंता गोवारीकरांच्या कानावर गेली. त्यांनी प्रथम तो विषय नीट समजावून घेतला. नंतर सांगून टाकले, की हा प्रस्ताव सरळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासमोर मांडला पाहिजे. ती जबाबदारी गोवारीकरांनी स्वतःवर घेतली. थोड्याच दिवसांत त्यांनी निरोप पाठवला की आपण आपली योजना सगळ्या मंत्रिमंडळासमोर विस्ताराने सांगायची आहे त्या तयारीला लागू या. कुलगुरूंच्या दालनात बसून सर्वांनी या निवेदनाची आखणी केली. निवेदन प्रभावी होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आम्ही गोवारीकरांकडून शिकलो. ठरल्या दिवशी मंत्रालयात राजमुद्रा नावाच्या दालनात बैठक झाली. मनोहर जोशी, गोपीनाथ मंडे व सर्व मंत्रिगण हे श्रोते गोवारीकर हे वक्ते, सीतारामम व अन्य शास्त्रज्ञ त्यांच्या पाठीशी, व्याख्यान उत्तम झाले. काही चर्चेनंतर मंत्रिमंडळाने आमच्या योजनेस तोंडी संमती दिली. यथावकाश गोवारीकर निवृत्त झाले. प्रत्यक्षात सरकारकडून एक दिडकीसुद्धा पुणे विद्यापीठापर्यंत आली नाही. पशुधन