पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अखेरच्या श्वासाचा एकमेव साक्षीदार सांस्कृतिक समृद्धीसाठी आपण खूप दक्ष आहात याची साक्षच 'वेलु तयाचा गेला गगनावरी' हा आप्पासाहेब ऊर्फ सा, रे, पाटील यांच्यावरील फेब्रुवारी अंकातील लेख पटवतो. त्यातील विविधता व आधुनिक दृष्टिकोन आपल्या प्रज्ञेची झळाळी सिद्ध करणारा आहे 'साधना' शी जवळीक असल्यामुळे मी सा. रे. पाटील यांच्याकडे आदरभावनेनेच पाहत होतो, पण त्यांच्या कामाचा इतका सखोल आवाका मला पूर्वी आला नव्हता. त्यामुळेच मी तुमचा आभारी आहे, साधनेचा दिवाळी अंक व त्यातील आर्टपेपरवरील बहुरंगी विविध जाहिरातींची पाने पाहता, आप्पासाहेब हे साधनेचे वटवृक्षासारखे आधार आहेत व या सामाजिक योगदानात आपल्या सहकाऱ्यांनाही ते प्रवृत्त करीत आहेत, हे जाणवते व त्यामुळे त्यांच्याबद्दलची आदराची भावना दृढ होते. संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी व्यवहाराला बदलत्या काळात भ्रष्टाचाराच्या कर्करोगाने ग्रासलेले आढळते. त्याच्या प्रतिबंधाकडे राजसत्तेने डोळेझाक करून तो रोग वाढू दिलेला दिसतो, हे बदलत्या काळातील भान ठेवूनच कदाचित 'श्रीवर्धन बायोटेक' हा संपूर्ण आधुनिक शास्त्रीय हरितगृहातील शेतीचा एक खूप मोठा टप्पा गाठताना त्याची रचना आप्पासाहेबांनी भागीदारी तत्त्वावर ठेवलेली असावी. श्रीवर्धन बायोटेकचे वैश्विक दर्जाचे उत्पादन व निर्यातीतील घवघवीत यश पाहून डोळस, प्रगतिशील व कष्टाळू शेतकऱ्यांचे ते एक तीर्थक्षेत्र झालेले दिसते, आप्पासाहेब व मी समवयस्क तर आहोतच, पण तसेच समधर्मीही आहोत. श्री. एस. एम. जोशी व अच्युतराव पटवर्धन हे त्यांचे राजकीय गुरू व साने गुरुजी हे प्रेरणास्थान, अच्युतराव यांचा मी सर्वांत धाकटा भाऊ ही माझी ओळख पुरेशी व्हावी, साने गुरुजींच्या बरोबर मुंबईतील पार्शी कॉलनीमधल्या 'मेघाभुवन' येथे मी एकत्र राहिलेलो आहे. नैराश्य व निद्रानाश यांनी गुरुजींना पूर्णपणे घेरलेले असताना आई मुलाला जशी कुशीत घेते तसे गुरुजींना कुशीत घेऊन बगाराम तुळपुळे झोपत असत. एक अत्यंत लबाड मुलगा गुरुजी एकटे असताना त्यांना भेटून, खोटेनाटे रडून, गयावया करून त्यांच्याकडचे पैसे उकळीत असे. गुरुजींच्या खिशात पुरेसे पैसे असावेत ही जबाबदारी बगाराम सांभाळत होता. एकदा तसे पैसे ठेवलेले असताना काही तासांतच त्यात पन्नास रुपयाची घट बगारामच्या लक्षात आली. बगारामने ओळखले, की तो भामटा गुरुजींना भेटायला आला असावा. म्हणून बगाराम थोडेसे रागावून गुरुजींना म्हणाला, "तो मुलगा भामटा आहे, ते तुमच्या कसे लक्षात येत नाही?" गुरुजी शांतपणे म्हणाले, "अरे, ते न समजण्याइतका का मी मूर्ख आहे? मला स्पष्ट दिसते आहे, की त्याचे पुढचे पाऊल तुरुंगातच पडणार आहे. तुरुंग म्हणजे गुन्हेगारीची पाठशाळा, तो जर तुरुंगात गेला तर, त्यातच त्याचा अंत होईल, तो होऊ नये, त्याचे प्राण वाचावेत इतकाच माझा हेतू." ओघाने आले म्हणूनच सांगतो, के. ई. एम. हॉस्पिटल, परळ, येथे गुरुजींच्या अखेरच्या श्वासाचा मी एकमेव साक्षीदार आहे. माझे स्नेही श्री. हरिभाऊ लिमये (कॅपिटल बॉम्ब केस) यांनी 'आम्ही जातो आमच्या गावा' असे छोटे पुस्तक संपादित केलेले आहे. त्यात गुरुजींनी मृत्यूबद्दल जे जे लिहिले आहे ते नोंदवून, त्याचा मागोवा घेत, 'प्रचलित कायद्याच्या जंजाळात न अडकता ४९८ निवडक अंतर्नाद गुरूजींनी निद्रासमाधी घेतली' असे प्रांजळ मत नमूद केले आहे कोणत्याही दृष्टीने ती आत्महत्या नव्हती, मधू पटवर्धन, पुणे (मे २०१० ) आरोग्य आणि समाज' संग्राह्य अंक 'अंतर्नाद'चे अंक मी नियमित वाचतो. म्हणूनच 'आरोग्य आणि समाज' विशेषांकाची आवर्जून वाट पाहत होतो, अंक मिळाल्याबरोबर जवळ जवळ एकहाती वाचून काढला. नंतर काही लेख पुन्हा वाचले. एकूण अंक केवळ वाचनीय नव्हे, संग्राह्य, आवर्जून प्रसार करण्यायोग्य आहे. सर्वांचे अभिनंदन, मी गेली ४०-५० वर्षे रुग्णालयकामात गुंतलेला असल्याने त्यासंबंधी सर्व व्यवहारांचा साक्षी, नव्हे प्रत्यक्ष अनुभवी आहे. अंकातील सर्व विषयांना लेखकांनी योग्य तो न्याय दिला आहे परखडपणे व कळकळीने सत्याची मांडणी केल्याचे जाणवते. शब्दरचना, प्रस्तुती विधायक भावनेने केलेली आहे. खिल्ली उडवणे, सनसनाटी लिहिणे किंवा अतिरंजित लिखाण अनुभवास आले नाही. काही विषयांत लेखकांचे दृष्टिकोन टोकाचे आहेत, त्यामुळे बाह्यत: विरोधाभासही जाणवतो. परंतु विषयच तसा असल्याने अशा भूमिकाही सयुक्तिक असू शकतात. संबंधित अनेक प्रश्नांवर व्यक्तिगत, संस्थात्मक पातळीवर उपायाचे प्रयत्न होताहेत. त्याचीही प्रसिद्धी व्हावी, काही विश्वस्त रुग्णालये, सरकारी रुग्णालये उत्तम काम करीत आहेत. उदा. शुश्रूषा - दादर, डॉ. हेडगेवार रुग्णालय - औरंगाबाद, त्या त्या ठिकाणी सेवाभावी (ध्येयवादी म्हणावे का?) डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. सर्व व्यवहार खुले, पारदर्शी असणे हे पहिले महत्त्वाचे लक्षण आहे. प्रशिक्षित, तज्ज्ञ डॉक्टर्स असूनही •व्यक्तिगत उत्पन्नावर तिथे घातलेल्या स्वेच्छाबंधनामुळे वेगळी विश्वसनीयता अनुभवाला येते. अशा रुग्णालयांनी आपापल्या क्षेत्रात 'रोल मॉडेल' संस्था उभ्या केल्या आहेत. महाराष्ट्रात अशा २०-२५ संस्था तरी निश्चित असतील, अर्थात त्याने सर्व प्रश्न सुटणार नाहीत, कारण अर्थकारण हा खरेच अवघड विषय आहे. विवेकानंद रुग्णालयात आम्ही 'वैद्यकीय व्यवस्थापन' या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एक Dissertation 'ICU अर्थकारण या विषयावर केले. डॉक्टरांचे शुल्क व औषधांचा खर्च हे मुख्य खर्चाचे विषय आहेत आणि त्यांत २० ते २५% घट करणे शक्य आहे, असा निष्कर्ष काढता आला. तरीही अनेक आजार असे असू शकतात, की ज्यांच्या उपचाराचा खर्च, उच्च मध्यमवर्गीयांनाही झेपणारा नाही. यासाठी वेगळे संचित किंवा विमा योजना हाच मार्ग असू शकतो, वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तीबद्दल बोलले- लिहिले जात आहे, ते योग्यच आहे पण वाढत्या सामाजिक अपप्रवृत्तीबद्दलही मांडले गेले पाहिजे, ती प्रवृत्ती अधिक धोक्याची आहे. अगदी आताच घडलेले याविषयीचे एक उदाहरण लिहून थांबतो. जवळच्या एक मोठ्या गावातून अडलेली बाळंतीण म्हणून एक तरुण महिला (प्रथम प्रसूती) आणली गेली. बाळाच्या हृदयाचे ठोके