पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेच, अप्पा हे सज्जन होते, विद्वान होते, त्यांचे हेतू उत्तम होते; पण प्रत्यक्षात ते काही मोठे, टिकाऊ कार्य निर्माण करू शकले नाहीत. पुण्यातही ज्ञानप्रबोधिनी म्हणजे काय याची सदाशिव पेठेच्या पलीकडे फारशा मंडळींना कल्पनाही नसावी. श्री. अशोक निरफराके एस.एस.सी. बोर्डात पहिले आले होते हे मी पेपरात वाचले होते. पण तेव्हापासून पुढे त्यांची काहीच माहिती मला नव्हती. अर्थात माझ्या त्यांच्याबद्दलच्या अज्ञानाला मीच जबाबदार आहे हे नि:संशय, त्यांनी 'ज्ञानप्रबोधिनी' आणि ती. अप्पांसंबंधी श्री. रानडे यांच्या लेखाची दुसरी बाजू मांडणारे बरेच काही अंतर्नादमध्ये लिहिले आहे. त्यांनी ज्ञानप्रबोधिनीबाबत जी काही भूमिका अखेरीस घेतली, ती मला समाधानकारक वाटत नाही. अर्थात ते असे म्हणू शकतात, की 'Who is this Bal Gadgil? What does he lanow about अप्पा आणि ज्ञानप्रबोधिनी?' तर त्यांच्याइतकी मला 'ज्ञानप्रबोधिनी' परिचित नाही हे मान्य केलेच पाहिजे. आता थोडे डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या सिंबायॉसिस या शिक्षणसंस्थेविषयी, समयसूचकता आणि दूरदृष्टी हे गुण डॉ. मुजुमदारांच्यामध्ये असल्यामुळेच त्यांनी दृष्ट लागेल असे कार्य केले. सुरुवात तशी साधी. परदेशी विद्यार्थ्यांसाठी आईच्या घरापासून दूर असे 'माहेर' निर्माण करायचे. पुढे ते इतके वाढले. आता पहा, की डॉ. मुजुमदार हेही सुरुवातीला आर्थिकदृष्टीने कफल्लकच होते. बोलूनचालून आमच्या फर्ग्युसन कॉलेजातील असिस्टंट प्रोफेसर, शून्य भांडवलातून त्यांनी कोट्यवधीची निर्मिती केली. सगळी पुन्हा संस्थेसाठी वापरली, विद्यार्थ्यांची आणि पालकांची गरज, शिवाय व्यवसाय- उद्योगांची गरज यांतून मग एकापाठोपाठ एक अशा अनेक शिक्षणसंस्था मुजुमदारांनी स्थापन केल्या. संगणक, इंटरनॅशनल बिझिनेस, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट (H.R.D.), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (I.T.), टेलेकम्युनिकेशन, जिओइन्फर्मेटिक्स, तुम्ही म्हणाल ते सर्व विषय, सिंबायॉसिसमधल्या या सर्वच प्रकारच्या शिक्षितांना इतकी मागणी आहे, की तेथील असंख्य विद्यार्थ्यांना Hundred percent placement मिळेल याची शाश्वती वाटते. विद्यार्थी आणि पालक यांना दुसरे काय हवे असते? शिवाय सरासरी वार्षिक वेतन तीन ते पाच लक्ष रुपये. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, फॅशन गुणवत्ता व उत्कृष्टता (quality and excellence) हे दोन शब्द म्हणजे डॉ. मुजुमदारांचे watch-words. सांगायला आनंद वाटतो, की SIBM (Symbiosis Institute of Business Management) या संस्थेला हिंदुस्थानातील उत्तम व्यवस्थापन शिक्षण संस्थांत नुकताच चौथा क्रमांक मिळाला. गुणवत्तेकरिता मशहूर असलेल्या दोनतीन I.I.M.s देखील S.I.B.M. च्या खाली आहेत, अर्थात तसे पाहिले तर ज्ञानप्रबोधिनीदेखील आता काही बंद पडलेली नाही, तिचे कार्य चालूच आहे. कदाचित असे असेल, की त्या संस्थेचा जीवच लहान, म्हणून तिची मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. शेवटी असे म्हणावेसे वाटते, की जो तो आपल्या शक्तीप्रमाणे आपले काम करीत राहतो. असे विधायक कार्य करणारे अनेक असतील तर समाजाचे भलेच होईल. डॉ. मुजुमदार, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. पतंगराव कदम या सर्वच मंडळींनी केलेले कार्य महत्त्वाचे व मोलाचे आहे उगाच 'तथाकथित शिक्षणमहर्षी' असे म्हणून त्यांची हेटाळणी करण्यात मतलब नाही, प्रा. बाळ गाडगीळ, एरंडवन, पुणे ४११००४. (दिवाळी २००६) आत्मीयतेपोटी देणगी माझ्या 'जाय काय जूय?' ह्या कोंकणी पुस्तकाला २००६ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबरोबर मला रु. ५०,००० चा धनादेश मिळाला. हल्लीच गोवा शासनाने सगळ्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या गोमंतकीय लेखकांचा सन्मान केला. त्यावेळी गोवा शासनातर्फेही मला रु.५०,००० मिळाले, या दोन्ही रकमांत माझी स्वत:ची थोडी रक्कम घालून मी मला आदरणीय असलेल्या तीन प्रकाशनसंस्थांना प्रत्येकी रु. १,००,००० ची देणगी देण्याचे ठरवले आहे. ज्येष्ठ कोंकणी लेखक व गांधीवादी विचारवंत रवींद्र केळेकर 'जाग' ह्या मासिकाचे संपादन करतात व 'जाग' नावाची त्यांची प्रकाशनसंस्था आहे त्या 'जाग' प्रकाशनाला, तसेच पुण्याच्या 'साधना प्रकाशन'ला व 'अंतर्नाद' ला ही देणगी द्यावी असे मला वाटले. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या वृद्धीसाठी अंतर्नादच्या माध्यमातून आपण करत असलेल्या अथक प्रयत्नांबद्दल माझ्या मनात अतीव आदराची भावना आहे. या भावनेपोटी आणि अंतर्नादविषयी वाटत असलेल्या आत्मीयतेच्या नात्यापोटी ही छोटीशी देणगी पाठवतो, तिचा स्वीकार करावा. दत्ता दामोदर नायक, मडगाव, गोवा (दिवाळी २००७) एक बाब खटकली 'अंतर्नाद'चा जुलैचा अंक परवा मिळाला, सहज चाळतानाच पूर्ण वाचल्याशिवाय राहवले नाही. श्रीमती माणिक खेर यांचे अभिनंदन करावयास हवे. आपला उद्देश साध्य करताना आलेल्या अडचणींतून त्यांनी कल्पकतेने मार्ग काढल्याचे त्यांच्या जुलै अंकातील लिखाणातून लक्षात आले. श्रीमती कविता महाजन यांची त्या अंकातील स्नेहा अवसरीकर यांनी घेतलेली मुलाखत उद्बोधक आहे. त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या शब्दांतून व्यक्त होतो. कृष्णात खोत यांचा 'गोंडोलीकर' चटका लावतो, तर रामदास भटकळांचे आजारपणातील अनुभव ('ते नऊ दिवस') आशेची उभारी देतात. 'अंतर्नाद'च्या विद्यमाने पुण्यात पार पडलेल्या 'कथामंथन' या कथालेखन शिबिराच्या वृत्तांताने ऑगस्ट अंकाची बरीच पाने व्यापली आहेत, ते योग्यच आहे. एक गोष्ट मात्र ती पाने चाळताना खटकली, हे 'कथामंथन' फक्त पुणे-मुंबई शहरातील कथालेखक व समीक्षकांना संधी देणारे होते, असे जाणवले. ग्रामीण महाराष्ट्रातील काही अप्रसिद्ध लेखकांना प्रसिद्धीच्या झोतात निवडक अंतर्नाद ४९३