पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'अंतर्नाद'सारखी मासिके चालावीत नुकतेच तुमचे संपादकीय प्रकट चिंतन वाचले आणि ऊर भरून आला. काय, योगायोग, की मागच्याच आठवड्यात श्री. आनंद अंतरकर यांचे 'रत्नकीळ' पुस्तक वाचले आणि असेच बधिर व्हायला झाले. 'हंस', 'मोहिनी', 'नवल' यांसारखी तुफान लोकप्रिय आणि दर्जेदार मासिके चालवणारे आनंद अंतरकर एका खित्र क्षणी मासिके बंद करून बसले. त्यांनी म्हटलेय पुस्तकात एके ठिकाणी, "मराठी भाषेचे नि साहित्याचे एकंदर व्यवहार, त्यांची रीत, इथले कंपू, अनैतिकता या साऱ्यानं मन विटून गेलं होतं, फुटाफुटावर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला, निलाजरेपणाला, उद्दामपणाला तोंड देताना वेड लागायची पाळी येते. असह्य मनस्ताप होतो, तीन मासिकं, प्रेस, 'विश्वमोहिनी' ची पुस्तकं, यांचा कारभार पेलताना मन आणि शरीर मोडकळीला येतं. कधी कधी वाटतं, एका फुंकरीसरशी या साऱ्यापासून सुटका करून घ्यावी, जळो हे भयंकर उपेक्षित जिणं!" मला या क्षणी माझ्या वडिलांची, के. अनंत भालेराव यांची आठवण प्रकर्षाने होते. सुरुवातीला 'हैद्राबादी मराठवाडा' हे साप्ताहिक होते, नंतर 'औरंगाबादी', प्रथम द्विसाप्ताहिक नि नंतर दैनिक केले. त्या दैनिकाचा खप कमी असूनही त्याचा जनमानसात, सरकारदरबारी आणि राजकारणात खूपच दबदबा होता. ज्या काळात 'सत्यकथा' लोप पावत होती, त्या काळात त्यांच्या दिवाळी अंकाचे व 'प्रतिष्ठान'चे भरघोस स्वागत होत असे. दर्जाही अप्रतिम असे. त्यांना नंतर 'मायेस्थेनिया ग्रॅव्हीस' (अमिताभचा आजार) झाला आणि त्यांनी खूप प्रयत्न करूनही नंतर 'मराठवाडा' बंदच झाला. बाबा दळवी, पत्रालाल सुराणा, निळू दामले इत्यादी व्यावसायिक दृष्टीचे संपादक नेमूनही, ज्या ज्या वेळी त्यांना पैशांची अडचण येई (म्हणजे बऱ्याच वेळा!) तेव्हा ते चक्क चार-पाच जणांना घेऊन देणग्या गोळा करायला निघत, जनाधारावरच असली दैनिके चालतात, असा त्यांचा ठाम समज होता. असल्या जनाधारावरच त्यांनी औरंगाबादी पहिले रोटरी मशिन आणले होते, लॉजिकने हे खरेच पटते, की माणसासारखी माणसे जातात, पण कोणाचे काही अडत नाही. लहानपणी क्षणभरही आई नजरेआड झाली, तर जे मूल आकांत करते, तेच मोठे झाल्यावर, अमेरिकाला वसून झाल्यावर आईची खुशालीही विचारू धजत नाही. 'सत्यकथा' बंद पडली तर काही अडले का? हे तर खरेच पण गेल्या दहा वर्षांत अंतर्नादने ज्या साहित्यराशी रचल्यात त्या अनमोलच नाहीत का? त्रुटींचा शोध घेऊ या. काय काय करता येईल, त्याची यादी करू या. 'प्रतिसाद'मध्ये ज्या तळमळीने वाचक तुम्हांला पावती देतात, त्यावरून पैशाचे आवाहन केलेत, तर ते नक्कीच मदत करतील, तुम्ही ज्या ८३५ जणांना आजीव सभासदत्वाचे दोन-दोन हजार रुपये परत केलेत, त्यांनाच तुम्ही मदतीचे साकडे घातलेत तर? शेवटी 'अंतर्नाद' सारखी मासिकं चालावीत, ही मराठी सारस्वताची नितांत गरज आहेच. आणि ह्या कामी तुमच्या प्रसिद्ध जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, 'नव्या जगाची स्वतःपासून सुरुवात' करण्याकरिता सोबत पाच जणांच्या वर्गणीचा चेक व त्यांचे पत्ते ४९२ निवडक अंतर्नाद पाठवीत आहे स्वीकार असावा. अरुण अनंत भालेराव, मुंबई ४००००७ (दिवाळी २००५) ज्ञानप्रबोधिनी आणि सिंबायोसिस मी हाडाचा (किंवा चरबीचा म्हणा) शिक्षक आहे. १९४८ साली बी.ए.ला पहिला वर्ग मुंबई विद्यापीठात मिळविल्यानंतर दोन वर्षे मी कॉलेजचा फेलो होतो, माझे कॉलेज म्हणजे तीर्थरूप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध सिद्धार्थ कॉलेज - • मुंबईचे, नंतर एम.ए. झाल्यावर मला लेक्चरर नेमण्यात आले. नंतर I.A.S., तिथून I.R.S. १९५७ साली ही नोकरी सोडून फर्ग्युसन कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर, मग १९७५ साली मला नको असताना तेथील प्राचार्यपद गळ्यात पडले. पाच वर्षे त्यानंतर आणखी दोनदा प्रत्येकी तीन तीन वर्षे, म्हणून प्राचार्यपदाचा अनुभव अकरा वर्षे पुढे विद्यापीठात प्रकुलगुरू नंतर सिंबायॉसिस, इथे मी १९९४पासून आहे उपाध्यक्षपदावर, व्यवस्थापन समितीचा सभासद आहेच. तुम्ही मला 'आत्मचरित्र' लिहायला सांगितले नाहीत हे मी विसरलेलो नाही. पण माझ्या दीर्घ अनुभवानंतर मी शिक्षण या विषयावर थोड्याअधिक अधिकाराने बोलण्याचा प्रयत्न करू शकतो हे स्पष्ट व्हावे. श्री. राजीव रानडे यांनी आपल्या दीर्घ लेखात 'ज्ञानप्रबोधिनी'ला 'विलक्षण स्वप्न' वगैरे म्हटले आहे पस्तीस वर्षे या ना त्या प्रकारे ज्ञानप्रबोधिनीशी संबंध ठेवून नंतर ही संस्था त्यांनी सोडली असेही ते सांगतात, ज्याचा आपण जवळजवळ तीन तपे पाठलाग केला, ते केवळ एक स्वप्न होते असे उमजण्यास इतक्या कुशाग्र बुद्धीच्या रानडेसाहेबांना पस्तीस वर्षे लागली याचे खूप नवल वाटते, माझेच उदाहरण घ्यायचे तर माझे मोठे बंधू श्री. अमरेंद्र गाडगीळ यांच्या प्रेरणेने मी संघात (R.S.S.) जायला लागलो, तेव्हा मी सातआठ वर्षांचा असेन, शिवाजी मंदिरात भरणाऱ्या बालशाखेत मी जायचो. तिथला कार्यक्रम म्हणजे खेळ, कवायत, कधीकधी परेड, बौद्धिक वर्ग, ध्वजप्रणाम, प्रार्थना आणि अखेर 'वीकिर' (समाप्त). ध्येय कोणते? हिंदुसंघटन, म्हणजे काय? कशासाठी? कोणीही, कधीही आम्हा 'बालांना' (बाल-शाखेतल्या स्वयंसेवकांना) समजेल अशा शब्दांत ते सांगितले नाही. या तोच- तोपणाला कंटाळून मी स्वतः होऊन संघ सोडला, तेव्हा मी फारतर इंग्लिश दुसरीत असेन, किंवा तिसरीत, मी हे लिहिताना खूप शेखी मिरवतो आहे असे विशेषतः: रानडेसाहेबांना वाटणे शक्य आहे. पण तसे त्यांना वाटले तरी मी समजू शकतो, कारण त्यावेळी आमच्या पिढीला संघाने किती मोहिनी घातली होती, याची कल्पना त्यांना असणार नाही. त्यामुळे मी स्वेच्छेने, काही वर्षांतच संघ सोडला याचे त्यांना महत्त्व वाटणार नाही. श्री. अप्पा (साहेब) पेंडसे यांना मी ओळखत असे. तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते, अमरेंद्र गाडगीळ हे माझे मोठे भाऊ संघातील अधिकारी वर्गात होते. अप्पा पेंडसे किंवा ज्ञानप्रबोधिनी यांनी काही मोलाचे, महत्त्वाचे काम केले हे खरे, पण ते टिकाऊ स्वरूपाचे ठरले नाही. ध्येय पाहिजे हे खरे, पण त्याच्या पूर्तीसाठी प्रेरित असे कार्यकर्तेही पाहिजेत. दुसरे म्हणजे ध्येय हे रेखीव (well-defined) पाहिजे, कार्यकर्त्यांच्या निर्वाहासाठी पैसा हवा, सातत्य आवश्यक