पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्या तरी माहितीत मराठी नियतकालिकांत एवढे यश मिळवलेले दुसरे उदाहरण नाही. तुमच्याइतक्या कल्पकतेने, योजनापूर्वक, एक प्रकारच्या व्यावसायिक कार्यक्षमतेने व सातत्याने या बाबतीत प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या संपादक- प्रकाशकाचेही नाही. खरे तर इंग्रजी साहित्याविश्वातही गंभीर साहित्यिक नियतकालिक केवळ वर्गणीदारांच्या आधारावर फार काळ तरी चालत नाही असे दिसते. जाहिरातींची वा विश्वस्तनिधींच्या प्रतिष्ठानांच्या अनुदानांची मदत घ्यावी लागते. हा सारा विचार करता तुमचे मर्यादित यशही कौतुकास्पद आहे. तुम्हांला व तुमच्या सहकाऱ्यांना उत्साहवर्धक वाटावे असेच ते आहे. त्याचबरोबर संपादकीय जबाबदारीचे भान वाढवणारे आहे. अर्थात तुम्हांला ते प्रथमपासून आहे. अधूनमधून एखाददुसऱ्या अंकातील साहित्याचा कस उतरल्याची शंका आली तरी ते भान उणावल्याची नाही. ते वाढते राहो व तुम्हांला त्यात अधिकाधिक यश मिळो, श्री. पु. भागवत, सायन (पूर्व), मुंबई (मार्च २००१) श्रवणबेळगोळ : जैन संस्कृतीचे योगदान अंतर्नाद दिवसेंदिवस अधिक चोखंदळ अभिरुचीचे नि अर्थघन शैलीचे होत चालले आहे. अभिनंदन! या वर्षीच्या पहिल्या तीनही अंकांच्या मुखपृष्ठाची 'म' ही थीम खूपच आवडली. संपादकीयामध्ये आपण मराठी भाषेच्या आजवरच्या वाटचालीत अमराठी घटकांकडून झालेल्या योगदानाचा उल्लेख केला आहे नि कृतज्ञताही व्यक्त केली आहे. मूळ गुजराती असलेल्या चक्रधर स्वामींनी लिहिलेले 'लीळाचरित्र', पहिले मुद्रण तंजावर व नंतर प. बंगालमध्ये छापखाना केरळमधून आलेला. तोही पोर्तुगीजांनी आणलेला पहिला मराठी शब्दकोश मोल्सवर्थ या इंग्रज गृहस्थाचा नि पहिली मराठी शाळा काढली ती इंग्रज सरकारच्या विलायती गव्हर्नरने! हा सारा महाराष्ट्राबाहेरच्या प्रदेशाकडून नि अमराठी घटकांकडून घडलेला इतिहास माझ्यासारख्या आजच्या मराठी वाचकाला अचंबित करतो, डॉ. महावीर अक्कोळे, जयसिंगपूर, कोल्हापूर (मे २००३) वास्को द गामा आणि आपण भारतीय 'अंतर्नाद'च्या जुलैच्या अंकातील 'वास्को द गामा आणि गॉड्स ओन कंट्री' हा आपला लेख वाचनीय व माहितीपूर्ण झाला आहे. त्या लेखात केरळमधील देवळे व इतर नेहमीची प्रेक्षणीय स्थळे यांचा उल्लेख आपण कटाक्षाने टाळला, हे उत्तम, कारण ही माहिती प्रवासवर्णनात्मक पुस्तकांतून मिळू शकते. ४९० निवडक अंतर्नाद भारतीयांचा पिंड परदेशीयांच्याकडून काही शिकावे, असा नव्हता (अजूनही नाही). तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वास्को द गामाप्रमाणे धाडस करून, गलबताचे तंत्रज्ञान हस्तगत करून युरोपात जावे असे त्यांच्या मनात येणे शक्य नव्हते, यामागे आपला जात्याच अल्पसंतुष्टपणा व त्यावेळचा चौकसपणाचा व उत्सुकतेचा अभाव ही कारणे असावीत. देशाटन करणे हे धार्मिकदृष्ट्या निषिदच नव्हे, तर पापही मानले जात होते, वास्को द गामाबद्दल आश्चर्य होते, पण कुतूहल वा जिज्ञासा नव्हती. औद्योगिक क्रांती युरोपात घडण्याअगोदर त्या खंडाला अनेक सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अडथळ्यांतून व स्थित्यंतरांना तोंड देत पुढे जावे लागले. ही जडणघडण दोन शतके चालू होती. याउलट भारतात 'ठेविले अनंते तैसेची राहावे' अशी अल्पसंतुष्ट वृत्ती होती, देव व दैव यांचा पगडा होता. अजूनही हा स्थायिभाव बदललेला नाही. यातून कुठली औद्योगिक क्रांती या देशात होणार? व कशी? तशी औद्योगिक क्रांती घडण्यास ज्या वैचारिक बैठकीची व परिस्थितीची पार्श्वभूमी हवी असते, त्या वैचारिक बैठकीचा व परिस्थितीचा पूर्ण अभाव या देशात होता. माय-मराठीचे आणखी एक तीर्थस्थान म्हणजे कर्नाटकातले 'श्रवणबेळगोळ' हे ठिकाण! आजच्या मराठीच्या मुख्य म्हणवून घेणाऱ्या प्रवाहाला या जन्मस्थानाचा विसर पडलेला असला, तरी श्रवणबेळगोळच्या ५७ फूट उंचीच्या ग्रॅनाईटच्या अखंड कातळातल्या गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीच्या पायाशी मराठी भाषेतला पहिला शिलालेख खोदलेला आहे, हे कसे विसरता येईल? त्याला एक हजाराहून जास्त वर्षे होऊन गेली. या मूर्तीच्या 'आपल्या भारतात असे व्हावयास हवे होते,' या आपल्या पायाशी दोन मराठी वाक्ये आहेत. पहिले 'श्री चावुण्डराजें हुरहुरीमागे एक प्रकारचे सुप्त देशप्रेम असावे. पण असे वाटणे व प्रत्यक्ष घडणे, यांतील जमीन-आसमानाची तफावत भारतात औद्योगिक क्रांती घडवून आणत नाही. करवियलें' व दुसरे 'श्री गंगराजे सुत्ताले करवियले' असे आहे. श्री चावण्डराजें करवियों" हे मराठीतले पहिलेच लिखित वाक्य आहे. मायमराठीच्या आजवरच्या वाटचालीतली, जैन संस्कृतीने प्रदान केलेली ही अजोड आद्यनिर्मिती मराठी लिहायला, बोलायला व वाचायलाही प्रवृत्त करते, यात शंका नाही. एकदा माझा एक ऑस्ट्रियन मित्र मला म्हणाला होता, "आमच्याकडे खार, मारमोट यांच्यासारखे प्राणी जंगलात असतात, उन्हाळ्यात हे प्राणी आपल्याला हिवाळ्यात लागणाऱ्या फळांची बेगमी करून ठेवतात. हिवाळ्यात एकदा बर्फ पडू लागल्यावर काहीही हाती लागणार नाही, याची त्यांना कल्पना असते. याउलट तुमच्या उष्णकटिबंधातील ती स्वच्छंद संचार करणारी माकडे, वानरे पाहा. त्यांना भविष्यासाठी काही तरतूद करावी, असे वाटत नाही. जसा या प्राण्यांचा स्वभावगुण, तसाच तुमच्या आमच्या माणसांतही तो मला दिसतो!" मला त्याचे विचार हसण्यावारी नेता आले नाहीत. सांगण्याचे तात्पर्य, भवितव्याचा विचार न करता बेपवाईने वागणाऱ्या देशात कुठली आली औद्योगिक क्रांती? प्रगत, साक्षर व सर्वधर्मसमानता मानणाऱ्या व भारतीय मूल्यांची जपणूक करणाऱ्या सर्व भारताला ललामभूत ठरलेल्या अशा केरळाची आपण ओळख करून दिली, याबद्दल आभार, डॉ. अविनाश बा. जगताप, बिनिंगेन, स्वित्झर्लंड (सप्टेंबर २००४)