पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'हंस'च्या कामगिरीची दखल 'अंतर्नाद' दिवाळी अंक वाचला, माझे वडील, अनंत अंतरकर, ह्यांच्यावर प्रा. बाळ गाडगीळ यांनी लेख लिहिला याचं अप्रूप वाटलं, कारण अंतरकरांच्या 'हंस'ची दखल सहसा घेतली जात नाही. त्यांच्या संपादकीय कार्याची व वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची ओळखही करून दिली जात नाही. यामुळे प्रा. गाडगीळ यांनी लिहिलेला लेख आणि त्याला आपण दिलेली सुरेख फोटोसह प्रसिद्धी याचं कौतुक वाटलं, अनंत अंतरकरांवर मी प्रबंध लिहिला आहे. त्यावर मला पीएच. डी. मिळाली आहे माझे मार्गदर्शक डॉ. हे. वि. इनामदार यांनी माझ्या प्रयत्नांना सतत प्रोत्साहन दिल्यामुळे हे घडून आलं. हे सांगायचं कारण असं की, प्रा. गाडगीळ यांनी अंतरकरांच्या 'सत्यकथे' च्या कामगिरीबद्दल उल्लेख नसल्याची एक खंत, एक पोकळी म्हणा, व्यक्त केली आहे. मला जे सांगायचं आहे ते प्रा. गाडगीळ ह्यांना दिलासा देणारं आहे. प्रा. श्री. पु. भागवत ह्यांचं आमच्याकडे एक पत्र आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, "सुजाण साहित्याचा स्पर्श 'सत्यकथे'ला अनंत अंतरकर यांनी दिला." हा श्री. पु.नी अंतरकरांचा केलेला गौरवच नाही का? 'हंस' च्या कामगिरीची दखल घेणारा एक लेखकवर्ग आहेच. तो 'सत्यकथे' च्या लेखकवर्गातलाही आहे. कारण 'सत्यकथे' तले जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले हे लेखक अंतरकरांनी त्यांच्या काळात प्रकाशात आणलेले आहेत. 'सत्यकथे'च्या मुखपृष्ठावर विनोदी चित्र अंतरकरांनी त्या काळात प्रसिद्ध केलेलं होतं. 'हंस'च्या चाहत्या लेखकवर्गाला, रसिक वाचकांना 'हंस'चं एवढं कौतुक होत नाही आणि 'सत्यकथे' चं होतं याची एक हळहळ वाटते, हे प्रबंधलेखनाच्या वेळी माझ्या हाती आलेलं एक सत्य आहे. याचंही कारण मी माझ्यापुरतं मान्य केलेलं आहे, ते उघड करून सांगणं म्हणजे पुन्हा 'सत्यकथे'च्या प्रेमींना, 'सत्यकथा' वादी लेखकांना दुखावणं आहे. कदाचित त्यांच्या 'इगो'ला धक्का लावणारं आहे; पण 'सत्यकथे' बद्दल बोलताना, माझ्या वडिलांचा संबंध आल्यामुळे, माझ्यापुरतं जाणवलेलं 'सत्य' मी सांगायलाच हवं. 'सत्यकथे' एवढा 'हंस' गाजला नाही. कारण त्याकाळी अंतरकरांची 'मौज'सारखी प्रकाशनसंस्था नव्हती. आपलं पुस्तक निघणं हा लेखकांना सन्मान वाटत असतो. हा सन्मान 'सत्यकथे' च्या लेखकांना 'मौज प्रकाशन' मिळवून देत होतं. 'सत्यकथे' विषयी ममत्व वाटायला हेही एक महत्त्वाचं कारण आहे. अनुराधा औरंगाबादकर, पारिजात नगर, नाशिक (जानेवारी १९९९ ) हेवा वाटावा असे यश कालचा कालिदास विशेषांकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम फार उत्तम प्रकारे पार पडला. कालिदास विशेषांकाची मूळ कल्पनाच अभिनव होती आणि त्याला साजेशीच कार्यक्रमाची आखणी होती. मी संगीतप्रिय असल्याने श्री. गजेंद्रगडकरांच्या बासरीवादनाची योजना मला विशेष भावली. तुम्ही केलेली वक्त्यांची निवड 'अंतर्नाद'च्या चोखंदळ वाचकांच्या १००% पसंतीस उतरेल अशीच होती. ४८८ निवडक अंतर्नाद श्रोत्यांच्या पसंतीस ही निवड पूर्णतः उतरली होती याची उत्तम साक्ष म्हणजे प्रचंड संख्येने त्यांनी केलेली उपस्थिती, फुले सभागृहातील अनेक साहित्यविषयक कार्यक्रमांना मी हजर राहिलेलो आहे, पण कालच्या वाचकांची जातकुळीच काही वेगळी होती, मला वाटते, 'अंतर्नाद'ने चार वर्षांतच मिळवलेली वाचकमान्यता व मराठी साहित्यक्षेत्रात मिळवलेले स्थान, यांसाठी वेगळ्या पुराव्याची आता आवश्यकता उरलेली नाही. अत्यंत अपुरी साधने व पुरेसा संपादकीय अनुभव हाताशी नसतानाही तुम्ही केवळ साहित्यप्रेमापोटी 'अंतर्नाद' सुरू केलेत, पण अल्पावधीत 'अंतर्नाद'ने मिळवलेले यश कोणाही संपादकाला हेवा वाटावा असे आहे. कालिदास प्रत्यक्ष उपस्थित असता तर १९९१ सालातही आपल्या निर्मितीवर प्रेम करणारा एवढा मोठा वर्ग आहे हे पाहून त्याला आनंदाश्चर्याचा धक्का बसला असता, कार्यक्रमाच्या दरम्यान दिवे गेले असताना व मायक्रोफोन चालू नसताना शेकडो श्रोते पिनड्रॉप सायलेन्समध्ये दाद देत होते, हीदेखील तेवढीच आनंदाश्चर्याची गोष्ट होती, मुकुंदराव किर्लोस्कर, संपादन, एरंडवन, पुणे (सप्टेंबर १९९९) शरद जोशींचे शेरे कंबरडे मोडणारे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे व मालेगावसारख्या 'विसंगत' वातावरणात गेली ४१ वर्ष निरनिराळ्या संस्थांत काम करीत आहे. समाजकार्याची आवश्यकता, त्याची लोकांकडून होणारी उपेक्षा हा माझ्या सततच्या चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे अंतर्नाद दिवाळी अंकातील 'स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान' या विशेष विभागाचं वाचन सहजतेनं झालं. सर्वांत धक्कादायक विचार वाटले ते शरद जोशी ह्यांचे, शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांचं दारिद्र्य हा त्यांचा सतत चिंतनाचा विषय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांनी वृत्ती. त्याचा सामाजिक परिणाम त्यांच्या प्रदीर्घ लेखातून दिसतो. लेखाचं शीर्षकच पहा, 'बस करा हे समाजसेवेचे ढोंग!' कुणालाही न पटणारं असं आणखी एक विधान ते करतात : "शेतकरी आंदोलनात जितकी माणसं तुरुंगात गेली, तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनातही गेली नव्हती, 23 "अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही असे माझे स्पष्ट मत आहे" हा शरद जोशींचा समाजकार्याबद्दलचा शेरा समाजकार्यकर्त्यांच्या आशेचं कंबरडं मोडणाराच ठरावा, समाजकार्य हे माणसाला झिंग आणणारं असतं, हे खरं आहे सुरुवातीला ते काम केवळ 'हॉबी' म्हणून, आवड म्हणून तो करतो व नंतर त्या कामाचं जबरदस्त व्यसन लागतं हे खरं आहे. त्यातील काही कार्यकर्ते भ्रष्टाचारी, स्वार्थी वृत्तीचे निघतात, हेही खरं आहे. पण हे काही सरांस नियम म्हणून सांगता येणार नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर स्थापन होणाऱ्या गणपती मंडळांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून सर्रास सर्व सामाजिक संस्थांचं मूल्यमापन करणं योग्य होणार नाही. ते पॅच वर्कही असेल कदाचित, पण त्यात निदान समाजाच्या एखाद्या भागाला दिलासा निश्चित मिळतो व काम करणाऱ्याला समाधान