पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिसाद या सदराविषयी अंकात वारंवार छापलेले निवेदन "We write to be read, we write to have responses. " ("वाचलं जावं म्हणून आम्ही लिहितो. प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो.) • जाँ ल क्लेझिओ (Jean Le Clezio) २००८ सालचे नोबेल पुरस्कार विजेते फ्रेंच लेखक प्रतिसाद हे प्रथमपासूनच 'अंतर्नाद' चे एक आगळेवेगळे व वैशिष्ट्यपूर्ण सदर आहे. अशा पत्रांतून साधला जाणारा संवाद व सहभाग वाङ्मयीन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. दूरचित्रवाणीवरच्या रंगीबेरंगी भूलभुलैयात हरवून गेलेल्या आणि जादा-सोच-मत ही भूमिका स्वीकारणाऱ्या आपल्या आजच्या समाजात तर हे विचारमंथन अत्यावश्यक आहे. नवा - जुना कुठलाही लेखक असला आणि केवळ 'स्वान्तसुखाय' लेखनाचा कोणी कितीही दावा केला, तरी प्रत्येक लेखकाच्या मनाचा एक कोपरातरी वाचकांच्या प्रतिक्रियांचा निश्चितपणे कानोसा घेत असतो. हे अगदी स्वाभाविकही असते. रसिकाची दाद मिळाल्याशिवाय निर्मितीला पूर्णत्व लाभत नाही, असे म्हणतात. तेव्हा प्रतिक्रिया कळवण्याबाबत वाचकांमध्ये अनास्था नसावी. वाचकांनी थेट लेखकाकडेही आपली प्रतिक्रिया नोंदवायला हरकत नाही. किंबहुना त्यासाठीच लेखकपत्ते अंतर्नादमधे छापले जातात; लेखकाचा विरोध असेल, तर मात्र त्याचा फोन-पत्ता छापला जात नाही. प्रतिसाद प्रतिक्रिया कळवणे हा वेळेचा अपव्यय नसून, वाङ्मयीन संस्कृती जोपासण्यासाठी एक सहजशक्य, पण महत्त्वाचे असे योगदान आहे. आपली ही भूमिका प्रथमपासून अंतर्नादने मांडलेली आहे आणि म्हणूनच अंतर्नादच्या प्रत्येक अंकात वाचकांच्या पत्रांना इतकी जागा दिली जाते. दिलासा देणारी घटना नवीन मासिक काढता आहात, तेही संपूर्ण विचार करून, ही मोठीच दिलासा देणारी घटना आहे. प्रायोगिक लघुलेखन (कविता नव्हेत) करणाऱ्या, नवी क्षितिजे शोधू पाहणाऱ्या संवेदनाक्षम नवलेखकांना अशा एका माध्यमाची नितांत आवश्यकता आहे. (विशेषत: कथा हा फॉर्म हाताळणाऱ्या लेखकांना) हा प्रयत्न दीर्घकाल सुरू ठेवण्यासाठी काही 'जादूची कांडी' तुमच्याकडे असेलच. तुमच्या संपादनकौशल्याची कसोटीही लागेल आणि यश मिळाल्यास एक भरघोस माप तुमच्या पदरात पडेल असा हा प्रकल्प आहे. मला सहभागी व्हायला आवडेलच. शुभेच्छा! प्रकाश नारायण सन्त, कऱ्हाड (ऑगस्ट १९९५) पण अजून विचार करा तुमचा अंतर्नाद मासिकाचा विचार कदाचित नव्हे, नक्कीच धाडसी आहे. मनःपूर्वकता आणि कष्ट घेण्याची तयारी एवढ्यानी आता धंदा उभा राहू शकत नाही आणि मासिक हो हौस म्हटल्यास ती फार महाग हौस ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही मनाशी घेतले ४८४ निवडक अंतर्नाद आहे त्या प्रकारच्या मासिकाची गरज लेखकांना वाटते; पण ती गरज वाटणारे वाचक किती आहेत ते तपासून पहा. तुम्ही लेखक आहात म्हणून काळजी वाटते. संपादनापायी तुमचे लेखन मागे पडू नये, माझ्याकडे तुम्ही लेखनसहाय्य मागत आहात. पण मी ओसरणारा लेखक आहे नवे उत्साही लेखक शोधून घडवा. तेच तुमच्या मासिकाला दर्जा आणतील, स्फूर्ती आली तर अधूनमधून मीही लिहीन, पण मासिक चालवण्याला नियमितपणे लिहिणारे नवे लेखक हाताशी लागतात, शुभेच्छा आहेत. पण अजून विचार करा अशी प्रेमाची सूचना, विजय तेंडुलकर, विलेपार्ले, मुंबई (ऑगस्ट १९९५) तारेवरची कसरत मराठी मासिकांची सध्या काय दयनीय अवस्था आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगायची गरज नाही. या दिवसात नवं मराठी मासिक सुरू करण्याचं धाडस करत आहात, अशा परिस्थितीत नवं मासिक काढताना दीड-दोन वर्ष तोटा सहन करावा लागेल याची जाणीव ठेवा. तेवढी तयारी असेल तरच हे पाऊल उचला. प्रारंभी अपेक्षित प्रतिसाद