पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यावरचे संस्कार अक्षर जुळणी, मुद्रितशोधन, मथळे, छायाचित्रांची जोड पृष्ठनियोजन, स्कॅनिंग. सगळ्याची छापखान्यात रवानगी तिथली प्रचंड अशी अमेरिकन जर्मन यंत्रे. कागदाची रिळे जी कॅनडा- फिनलंड- इंडोनेशिया वा अशीच लांबून कुठूनतरी आलेली. मग रातोरात होणारी छपाई, रंगीबेरंगी पुरवण्यांची जोड भल्या पहाटे टेम्पोंमधून होणारे वृत्तपत्रांचे विभागशः वितरण, तिथे खूपदा स्थानिक पातळीवर होणारे हँडबिले भरण्याचे काम. गाइकाच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी वृत्तपत्रांचे एकत्रीकरण, गठ्ठे बांधणी आणि मग शेवटी केव्हातरी आपल्या दारात येऊन पडणारा तो पेपर्सचा गठ्ठा, हे तीन 'वाले' म्हणजे केवढ्या महाकाय शृंखलांची आपल्याला दिसणारी टोके आहेत! या सगळ्यामागे काय काय असते! प्रचंड अशी यंत्रसामग्री असते, रस्ते असतात, वाहने असतात, वीज भांडवल मनुष्यबळ असते. आणि हे सगळे खूप मोठ्या प्रमाणावर असते. वेगवेगळ्या यंत्रणांची ही एक शृंखलाच असते (चेन ऑफ सिस्टिम्स) आणि यातला कुठलाही दुवा खूप कच्चा असून चालत नाही. यातही काही कामचुकार मंडळी नक्कीच असतात, पण आपल्या कामाविषयी आवश्यक ती कार्यनिष्ठा असणारे अनाम वीरही बरेच असतात व अशा अनेक अनाम वीरांमुळेच या सर्व यंत्रणा बऱ्यापैकी सुरळीत अखंड चालू असतात. आपल्या दैनंदिन व्यवहारांमागेही केवढी गुंतागुंत असते! 'साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळें हे फक्त साहित्यापुरतेच खरे नसते! सामाजिक योगदान बहुतेकदा तुमच्या नियत कार्यक्षेत्रातच दिले जाते. विख्यात अमेरिकन प्रशिक्षक आणि 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल'चे लेखक स्टीफन कोवी म्हणतात त्याप्रमाणे, तुमचे 'सर्कल ऑफ कन्सर्न (आस्थावर्तुळ) खूप विशाल असू शकते, पण तुमचे 'सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स' ( प्रभाववर्तुळ) हे मुख्यत: तुमचे कार्यक्षेत्र हेच असते. या तीन 'वाल्यां' पुढे असंख्य अनपेक्षित अडचणीही असू शकतात. उदाहरणार्थ, भटके कुत्रे मागे लागले, तर सायकलस्वाराला किती भीती वाटू शकते याची कल्पना, ज्यांना स्वतःला कधी तसा अनुभव आला आहे त्यांनाच येऊ शकेल. पण अशा अनेक अडचणींवर मार्ग काढत, कंटाळा न करता हे 'वाले' त्यांचे काम रोज पार पाडत असतात. एकीकडे त्यांच्यापैकी खूप जणांचे शिक्षणही चालू असते, इतरही काही कामधंदा चालू असतो. पण त्यापायी आपल्या रोज सकाळच्या कामाकडे हे 'वाले' दुर्लक्ष करत नाहीत. घरात लग्न वा मयत वा अन्य असला काही प्रकार घडला, तर आपल्या वाटच्या कामासाठी ते एखादा बदली मुलगा देतात, पण आपल्या कामात सहसा कधी खंड पडू देत नाहीत. हे 'वाले' काही कोणावर मेहेरबानी करत नसतात, पैशासाठीच काम करतात हे खरे आहे; पण तसे करता करता त्यांच्या कार्यनिष्ठेमुळे ते काही महत्त्वाच्या सामाजिक गरजाही उत्तम प्रकारे भागवत असतात आणि आपले ठरलेले काम जास्तीत जास्त निष्ठापूर्वक व उत्तम प्रकारे करणे हेच समाजसेवेचे सर्वोत्तम रूप आहे कारण शेवटी तुमचे सर्वांत महत्त्वाचे कुठलाही झेंडा खांद्यावर न घेता, कुठलाही गाजावाजा न करता, आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रातच एखादा कार्यनिष्ठ व कर्तव्यतत्पर माणूस किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो व ते काम किती समाजोपयोगी ठरू शकते याची भारतीय विदेश सेवेतील ज्ञानेश्वर मुळे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रभाकर देवघर आणि संगणक क्षेत्रातील विवेक सावंत ही तीन उत्तम उदाहरणे या दिवाळी अंकातही सापडतात. साहित्यक्षेत्राचा विचार करतानाही याच कार्यनिष्ठेची गरज खूप जाणवते. बाकी कामे आपापल्या आवडीनुसार करायला काहीच हरकत नाही, पण आपले नियत काम जास्तीत जास्त चांगले पार पाडणे सर्वाधिक महत्वाचे आहे. लेखकाने, अनुवादकाने, संपादकाने, मुद्रितशोधकाने, समीक्षकाने, पुरस्कारविजेती पुस्तके ठरवणाऱ्या परीक्षकाने, विक्रेत्याने, पुस्तक प्रदर्शन भरवणाऱ्याने ग्रंथपालाने वा साहित्यसंस्थेच्या पदाधिकाऱ्याने आपले स्वत:चेच काम जर पूर्ण निष्ठेने, कौशल्याने व पुरेसा वेळ देऊन केले तर कुठल्याही लाख लाख रुपयांच्या पारितोषिकांशिवाय, कोटी कोटीच्या सरकारी अनुदानाशिवाय वा अन्य कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय मराठी साहित्य नक्कीच खूप अधिक समृद्ध होईल. हे तीन 'वाले' म्हणजे केवढ्या महाकाय शृंखलांची आपल्याला दिसणारी टोके आहेत! या सगळ्यामागे काय काय असते ! प्रचंड अशी यंत्रसामग्री असते, रस्ते असतात, वाहने असतात. वीज- भांडवल मनुष्यबळ असते. आणि हे सगळे खूप मोठ्या प्रमाणावर असते. वेगवेगळ्या यंत्रणांची ही एक शृंखलाच असते. माझे काही मित्र अलीकडच्या काळात पुष्कळसे निराशावादी बनले आहेत. सध्या सगळीकडे सुमारांची सद्दी सुरू आहे, सगळा समाज आळशी, कामचुकार आणि भ्रष्ट झाला आहे, देशातील सर्व यंत्रणा (सिस्टिम्स) सडलेल्या किडलेल्या आहेत आणि त्या कुठल्याही क्षणी कोसळून पडण्याच्या मार्गावर आहेत, आणि एकूणच आता पर्व सुरू झाले आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. आपल्या देशात अनेक गोष्टी आज बदलायला हव्या आहेत यात काही शंकाच नाही, आपण जगाच्या खूप मागे पडलो आहोत यातही काही शंका नाही; पण रोज सकाळी न चुकता, एका अघोषित व मूक कार्यनिष्ठेने माझ्या दारात येणारा दूधवाला, कचरेवाला आणि पेपरवाला आणि त्यांच्यामागे कार्यरत असलेल्या महाकाय यंत्रणा याची ग्वाही देत असतात, की अजूनतरी त्यांना वाटते तसले हासपर्व काही सुरू झालेले नाही! ही ग्वाही हेदेखील माझ्या सकाळच्या प्रसन्नतेचे एक कारण शकेल. असू (दिवाळी २०१३) निवडक अंतर्नाद ४८३