पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिल्लीकरांनी जमावामध्ये सामील व्हावं म्हणून आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून आवाहनं करण्यात आली होती. या सर्वांना पैसे नाही, तरी लंच पॅक्स देण्यात आले. आणखी एक महत्त्वाचं दृश्य चित्रित झालं, ते मुंबईच्या गोद्यांत, दक्षिण आफ्रिकेतील नागरी हक्कांसाठीच्या मोहिमेवरून वीस वर्षांनी गांधीजी मायभूमीस १९१५ मध्ये परततात, ते दृश्य. त्याकरिता त्या जमान्यातली एक आगबोट आणि भारतीय तसेच ब्रिटिश यांचा फार मोठा जनसमुदाय यांची गरज होती, जमावासाठी मुंबईत पुरेसे इंग्लिश वा अमेरिकन्स मिळू शकत नसल्यानं गोव्यात वास्तव्य करून असलेल्या हिप्पींना मुद्दाम आमंत्रून आणवण्यात आलं; त्यांचे लांब केस पुरेसे छाटून त्यांच्या अंगावर खाकी चढवण्यात आल्या. त्या काळातील लोकांचे पेहराव नि लष्करी गणवेश यांचा संशोधनात्मक अभ्यास करून वेशभूषाकार जॉन मोलो नि भानू अथय्या यांनी या दृश्याचा खास कपडेपट तयार केला होता. हे दृश्य कॅमेराबद्ध झालं आणि दिल्ली परिसरातील चित्रीकरण आटोपलं. अॅटनबरो नेहमी कार्यव्याप्त असले तरी विशेषतः 'गांधी' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळातील त्यांचा दिनक्रम पाहण्यासारखा आहे. सकाळी पाच ते सायंकाळी सात वा आठ वाजेपर्यंत त्यांचं दिग्दर्शनकार्य चाले. त्यानंतर हॉटेलवर परतल्यावर प्रॉडक्शन टीमबरोबर दोनदोन चारचार तास बैठका चालत. आठवड्यात अनेकदा लंडनहून टेक्निकल लॅबमधून येणारे रशेस पाहण्यास त्यांचा जागेपणाचा अवधी आणखी वाढे. चित्रीकरणादरम्यान अॅटनबरो अगदी मिनिटामिनिटाला महत्त्व देत. प्रत्येक कलावंताला रात्री दुसऱ्या दिवशीचं त्याचं वेळापत्रक (कॉल शीट) दिलं जाई. त्यावर काटेकोर नोंदी असत, उदा, सकाळी ५-३० वा. उठवलं जाईल, ६-०० वा खोलीत नाश्ता दिला जाईल; ६-३० वा. हॉटेलमधील ठरलेल्या ठिकाणी मेकअप केला जाईल; ७०० वा. चित्रीकरण स्थळी नेण्यासाठी गाडी येईल... पदमसींना त्यांच्यावरील चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी गाडीसाठी लॉबीत येण्यास फक्त दोनच मिनिटं उशीर झाला. गाडी त्यांच्यासाठी न थांबता निघून गेली होती. त्यांना धडा मिळाला. त्यांचा हा पहिलाच दिवस असल्यानं अॅटनबरोंनी त्यांची गय केली, पण सुनावलंही, "आम्हांला या चित्रपटाचा खर्च मिनिटाला एक हजार पौंड इतका येतो. दोन मिनिटं म्हणजे दोन हजार पौंड नाहक वाया गेले. " भरतवाक्य 'गांधी' चं भारतातलं सर्व चित्रीकरण आटोपलं पूर्वनियोजित कालावधीहून तीनच दिवस ते ओव्हर शेड्यूल झालं. सर्व ब्रिटिश मंडळी आपल्या भारतीय सहकाऱ्यांचा निरोप घेऊन मायदेशी परतली आणि लागलीच तिथल्या कामाला लागली. तिथं आता फक्त दोनच आठवड्यांचं चित्रीकरण बाकी उरलं होतं. त्यात ४३४ निवडक अंतर्नाद पाहुणे कलाकार सर जॉन गिलगुड आणि ट्रेव्होर हॉवर्ड यांनी भाग घेतला. रविवार दि. १० मे १९८१. 'गांधी' चित्रपटाच्या एकूण चित्रीकरणाचा १२६वा दिवस. लंडनच्या शेड्यूलमधल्या शेवटच्या दृश्याचं चित्रीकरण, नं. १० डाउनिंग स्ट्रीटच्या बाह्यभागात योजिलेलं. गांधीजी पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनल्ड यांचा निरोप घेतात, असं साधारणत: दिवसाला किमान १ मिनिट २९ सेकंद स्क्रीन टाइम अशा गतीनं चित्रीकरण होत गेलं. संकल्पित साध्य गाठण्यासाठी युनिटला एकूण ५,२५,१५० फूट इतकी फिल्म (रॉ स्टॉक) एक्स्पोज करावी लागली. (प्राथमिक संकलनात चित्रपट सव्वा तीन तासांचा झाला. पुढे कुशल संकलक जॉन ब्लूमनं तो तीन तास सात मिनिटांवर आणला.) चित्रीकरण हे जरी मुख्य काम आटोपलं असलं तरी बाकी लहानमोठी नि वेळखाऊ बरीच कामं शिल्लक होतीच. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे संगीत. त्यासाठी अॅटनबरोंनी जागतिक कीर्तीचे कलावंत रवी शंकर यांचं नाव मनाशी केव्हाच निश्चित करून ठेवलं ह्येतं आणि त्याबद्दल खूप आधीच बोलणं केलं होतं. रवीजींनीही या प्रकल्पात कमालीचं स्वारस्य दाखवलं. ऑक्टोबरमध्ये अॅटनबरो मुंबईस आले. तिथं त्यांनी रवी शंकर यांना एका मिनी थिएटरात प्राथमिक संकलन झालेला संपूर्ण चित्रपट दाखवला. तो पाहून ते इतके प्रभावित झाले, की अशा प्रकल्पात सहभागी होणं, ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं ते अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले. त्याच मुक्कामात 'गांधी' च्या संगीताच्या बाबतीत दोघांनी आपापल्या विचाराचं आदानप्रदान केलं. अॅटनबरो यांनी आपलं वेळापत्रक सांगितलं नि रवी शंकर आपल्या कामाला लागले. जानेवारी १९८२च्या दुसऱ्या आठवड्यात रवी शंकर आणि त्यांचे गायक-वादक यांचं इंग्लंडमध्ये आगमन झालं, तेव्हा तिथं हिमवर्षा अगदी भरात होती. त्यामुळे पुढील समस्या लगेच लक्षात आली. भारतीय वादकांकरिता त्यांना सोयीचं असं तापमान रेकॉर्डिंग स्टुडिओत उपलब्ध करून देणं आवश्यक होतं. एक तर ते त्यांच्या हस्तकौशल्याकरिता उपकारक होतं आणि दुसरं म्हणजे त्यांच्या वाद्यांच्या नैसर्गिक ध्वनीवर होऊ शकणाऱ्या विकृत परिणामास प्रतिबंधक ठरणारं होतं. रवी शंकरांचा संगीतवृंद चांगलाच कसलेला, वेचक आणि नामवंत होता. सतारीवर स्वतः रवी शंकरच होते. त्याखेरीज विजय राघव राव (बासरी), सुलतान खान (सारंगी), शरद कुमार (शहनाई), टी. के. रामकृष्णन (मृदंगम) ही मंडळी होती. स्वर लक्ष्मी शंकर यांचे होते. काही भारतीय वाद्यांचे स्वर त्या पाश्चिमात्य ध्वनिमुद्रणालयात प्रथमच घुमले होते. रेकॉर्डिंग पुरं होण्यास सात दिवस लागले. परंतु ज्यांनी ज्यांनी ते संगीत ऐकण्यासाठी स्टुडिओला भेट दिली, त्या सर्वांनी त्याची मुक्त कंठानं प्रशंसा केली. कोणत्याही बाबतीत तडजोड न करता केलेल्या त्या भारतीय कलावंतांच्या श्रमांचं सार्थक झालं. संकलन, डबिंग, ध्वनिमिश्रण, स्पेशल इफेक्ट्स वगैरे उरलेले