पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोहिणी हट्टंगडी (कस्तुरबा) आणि बेन किंग्जले (गांधी) यांच्यासह एका तळ्याकाठी अॅटनबरो रांगत्या अवस्थेतल्या पंतप्रधानांना पाहून! स्वतःच अकारण ओशाळत, अवघडत त्यांनी साहेबांना एक चिठ्ठी दिली. साहेबांनी न उठताच तिच्यावर नजर टाकली आणि 'ठीक आहे, ठीक आहे असं पुटपुटल्यागत म्हणून हातातल्या 'अधिक महत्त्वाच्या' कामाकडे परत लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारे किती वेळ गेला, याचं दोघांनाही भान नव्हतं. अल्बमचं शेवटचं पान उलटल्यावर उठून उभे राहत ते अॅटनबरोंना म्हणाले, "तुम्हांला इथल्या आणखीही काही लोकांना भेटायला हवं, काही अधिकारी, माहितगार अशा खास व्यक्तींची भेट घेतली पाहिजे. आणि अर्थातच माझ्या मुलीचीही तुम्ही भेट घ्यायला हवी. " एवढं बोलूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या निवासस्थानी फोन करून, ब्रिटिश नट आणि निर्माते रिचर्ड अॅटनबरो हे भेटीस येत असल्याचं नि ते बापूंवर फिल्म करत असल्याचं, आपली कन्या इंदिरा गांधी यांना कळवलं. नेहरूंनी दार उघडलं. बाहेर अनेक लोक ताटकळत उभे होते. त्यातच नाराज खन्नाही होते. त्यांच्या नजरेस नजर न देता तोंडातल्या तोंडात आभाराचे शब्द पुटपुटून अॅटनबरो तेथून सटकले. पंतप्रधान कार्यालयातून निघाल्यावर अॅटनबरो इंदिरा गांधींच्या भेटीस गेले. वडलांप्रमाणेच त्यांनीही त्यांचं चांगलं स्वागत केलं. त्या स्वत: चित्रपट रसिक होत्या; चित्रपटसृष्टीविषयी त्यांना आपुलकी होती. त्या वेळी त्यांच्याकडे कोणतंही सरकारी पद नव्हतं. किंबहुना दिल्लीबाहेर त्यांची फारशी कुणाला माहितीही नव्हती. इंदिराजींनी अॅटनबरोंकडून 'गांधी' चित्रपटाविषयीच्या त्यांच्या योजनांची माहिती लक्षपूर्वक, आस्थेवाईकपणे ऐकून घेतली; काही प्रश्न विचारले; बापूंच्या सहवासात आलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेऊन अधिक माहिती घेण्याचं त्यांना सुचवलं. अर्ध्या तासानं इंदिराजींचा निरोप घेताना अॅटनबरोंनी त्यांना ४२४ निवडक अंतर्नाद सांगितलं, की या वर्षअखेर चित्रपटाची पटकथा तयार होईल, तेव्हा ती घेऊन आपण परत भारतात येऊन त्यांची भेट घेऊ. दिग्दर्शनाची कोरी पाटी जेव्हा नडते... भारतातून अॅटनबरो लंडनला परतल्यावर ते आणि कोठारी यांनी थोड्याफार भांडवलाची उभारणी केली. भारतभेट आशादायक झाल्यामुळे दोघांचीही उमेद वाढली होती. त्यातच नेहरूंनी चित्रपट प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिल्याची आनंदवार्ता सांगणारं लॉर्ड माउंटबॅटन यांचं अॅटनबरोंना पत्र आलं. त्यामुळे आता निःशंकपणे कामास सुरुवात करण्यास प्रत्यवाय नव्हता, आणि ही सुरुवात म्हणजे अर्थातच पटकथा, कारण पटकथा तयार नसेल तर पुढच्या गोष्टी पुढे सरकणारच नव्हत्या. अॅटनबरो आणि कोठारी यांनी एकमतानं ती जबाबदारी जेराल्ड हॅन्ली या लेखकावर सोपवली. पुढे 'गांधी' पटकथेचे जे अनेक लेखक झाले त्यांतला हॅन्ली हा पहिला, त्यानंतर चित्रपटाच्या कामानिमित्त अॅटनबरोंच्या भारत वाऱ्या सुरू झाल्या मंत्र्यासंत्र्यांचे अहंकार, लहानसहान बाबतीतही नोकरशह्यंच्या लाल फितीचा अडेलतट्टपणा यांमुळे वेळोवेळी कामांत निर्माण होणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी दर वेळी पंतप्रधानांकडे धाव घेणं उचित नव्हतं. म्हणून माउंटबॅटन यांनी सुचवल्याप्रमाणे नेहरूंनी इंदिराजींना या चित्रपटाच्या कामात लक्ष घालण्यास सांगितलं. इंदिराजींनी आस्थेवाईकपणे आपली जबाबदारी पेलत चित्रपटकार आणि दिल्लीतील विविध केंद्रीय मंत्रालयं यांच्यात वेळोवेळी सुसंवाद घडवून आणला. पुढे एका भेटीत नेहरूंनी अॅटनबरो यांच्याकडून चित्रपटाचं स्क्रिप्ट, पात्रयोजना, कामाची एकूण रूपरेषा यांविषयी माहिती घेतली; चर्चा केली. त्यानंतर त्यांनी लोकसभेत सांगितलं, की रिचर्ड अॅटनबरो नामक एक नामवंत ब्रिटिश नट, निर्माता गांधीजींवर एक चित्रपट करत असून या कामासाठी तो अत्यंत योग्य आहे. सर अॅलेक गिनेस 'गांधी' ? आरंभापासूनच गांधीजींच्या भूमिकेसाठी सर अॅलेक गिनेस यांचंच नाव अॅटनबरो आणि कोठारी यांच्यापुढे होतं. मात्र सर गिनेस यांची कलावंत म्हणून असामान्य प्रतिभा, गुणवत्ता आणि लोकप्रियता एवढीच केवळ यामागची कारणं नव्हती. तर त्या वेळच्या अभिनेत्यांत गांधीजींशी अधिकाधिक शारीरिक साधर्म्य असणारे केवळ तेच एकमेव होते. नेहरूंचीही तीच पसंती होती. याबाबत चर्चा करण्यासाठी अॅटनबरो यांनी लागलीच गिनेस यांची भेट घेतली. परंतु सुरुवातीसच सर अॅलेक यांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. एका महान भारतीयाच्या भूमिकेत आपण लोकांच्या (विशेषत: भारतीय) पसंतीस कितपत उतरू, याविषयी ते कमालीचे साशंक होते. त्याखेरीज आणखीही एक मोठीच व्यावहारिक अडचण होती. ही अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका ताकदीनं पेलण्याच्या दृष्टीनं पूर्वतयारी करण्यास आवश्यक ती सवड त्यांच्यापाशी नव्हती. कारण आधीच करार