पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ वर्षांनंतर त्याच्या अफगाण मुलानेच त्याच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म केली, तासाभराची आपली ही सगळी हकिकत तो सांगतो. आपल्या बायकोला कोणी कोणी चिडवतात, 'तुझा नवरा रशियन!' मोठी मुलगी १७ वर्षांची झाली, तिच्या लग्नाची काळजी, तयारी सुरू आहेच. धाकटी मुलगी 'मोठी' झाली, आता तिच्यासाठी बुरखा घेण्यासाठी तो बाजारात जातो. त्याला बुरखा घालणे आवडत नाही पण इलाज नाही. इस्लामचे कायदे पाळणे भाग आहे. त्याच्या मुलांचे रंगरूप इतर अफगाण मुलांपेक्षा वेगळे याची त्याला जाणीव आहे. त्याबद्दल त्याला खुशी वाटते. अफगाणिस्तानातले २९ वर्षांचे आयुष्य कसे गेले हे त्याला नेमकेपणाने सांगता येत नाही. त्याचा अफगाण मुलगा त्याला त्याच्या मूळच्या गावी घेऊन जातो. घरी जातो तेव्हा त्याची भाऊ, बहिणीशी गळाभेट होते. शेजारी, नातेवाइकांशी भेटीगाठी होतात. त्यांच्याशी तो रशियन भाषेतच बोलतो, तेव्हाचा त्याचा चेहरा प्रफुल्लित दिसतो. आई वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कबरीचं दर्शन घेतो. फुले वाहतो त्यावर पण तो परत आलाय म्हणून काही लोकांना आवडत नाहीच. त्याला ते टाळतातच. काही सैनिक त्याला म्हणतात, 'आम्ही आलो परत. तू राहिलास तिथेच. मुजाहिदींना खरंच सामील झाला होतास ना?' त्याला आपल्या घरी राहायचीच इच्छा आहे पण अफगाणिस्तानला परत जाणे भाग आहे, कारण आपल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. या फिल्मचे नाव आहे 'दि लोन सव्हर', ही फिल्म बरेच काही सांगून जाते. या फिल्मशिवाय इतरही चित्रपट निघालेत युद्धावरचे. काही चित्रपट रशियनांनी बनवलेत, तर काही अमेरिकनांनी बनवले आहेत. 'हेल अॅण्ड कमबॅक', 'लिव्हिंग अफगाणिस्तान, रेट्रोस्पेक्ट, दि बीस्ट ऑफ वॉर', 'काईटरनर' 'अफगाणस्ती', 'ओसामा' हे चित्रपट तर गाजलेले. जसे अफगाण युद्धावरचे चित्रपट निघालेत, तसेच व्हिएटनाम युद्धावरचेही चित्रपट बनलेच आहेत. 'वुई आर सोल्जर्स', 'प्लॅटून', 'गुड मॉर्निंग व्हिएटनाम', 'बॉर्न ऑन दि फोर्थ जुलै', 'अपोकोलिप्स नाऊ', हे चित्रपट तर खूपच गाजलेले. या सगळ्या विचारांचा गुंता सोडवता सोडवता काही धागे हाती आलेत असे वाटू लागले. या दोन्ही देशांमधील युद्धांचा काळ होता तो अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांचाच. या दोन्ही बड्या देशांनी त्या दोन्ही छोट्या देशांना कठपुतळीसारखे नाचवले. त्या देशांवर त्यांना राजकीय सत्ता गाजवायची होती. त्याला छेद देणारी होती आणि आजही आहे ती धर्मसत्ता, अफगाणिस्तानातच मुजाहिदीन धर्मयोद्धा - या शक्तीचा उदय झाला. पुस्तकातील मार्क्सवादाने प्रवास करीत करीत, वास्तवाला जरब बसवणाऱ्या, दरारा, भीती निर्माण करणाऱ्या साम्यवादाचे ४१२ निवडक अंतर्नाद रूप घेतले. मार्क्सने म्हटले होते, 'धर्म ही अफूची गोळी आहे. ' याचा अर्थ धर्माच्या धाग्यांमध्ये गुंतत गेले की अफूची गोळी घेणारा धुंदीत सापडतो, त्याला वास्तवाचे, भान राहात नाही, तो तारतम्य गमावून बसतो. मार्क्सवादाचा प्रवास पाहिला की वाटते की मार्क्सवादाचा साम्यवाद झाला म्हणजे धर्मवादच झाला. मुजाहिदींचा – धर्मयोद्ध्यांचा प्रवास होत होत आज संपूर्ण जगाला भयग्रस्त करणाऱ्या तालीबानी, आय. सी. एस.एस. (इस्लामिक स्टेट ऑफ इराक सिरिया), बोको हराम, लष्करे तोयबा, जैशए मोहम्मद, जमात उद दावा यांसारख्या कितीतरी शाखा निर्माण झाल्या आहेत. त्या मुस्लीम समाजातील शिया, अहमदी, कुर्दी, सुफी यांच्या जिवावरदेखील उठल्या आहेत. वहाबी सुत्री आतंक माजवीत आहेत. शाळकरी मुलांना मारून टाकत आहेत. अगदी कोवळ्या वयाच्या मुलामुलींना पळवून नेऊन त्यांचा बाजार मांडला गेला. मुलींचा तर लिलाव सुरू केला, त्यांना वेश्या व्यवसायाला लावले. इस्लामवाद्यांच्या सेवेसाठी ती मुले मुली इस्लामी पंथातीलच असतात. इस्लामी देशातदेखील. मारून साम्यवादी देशातदेखील हेच दिसते, स्टॅलीन, माओ त्से तुंग सारख्यांनी आपल्याच विचारांची सत्ता कायम राहावी म्हणून स्वकीयांवरच उगारून, लाखो लोकांना धर्मवाद्यांसारखीच दहशत बसवली होती. हीच गोष्ट भांडवलशाही देशातदेखील दिसतेच स्वतःचाच खजिना भरला जावा म्हणून स्वकीयांचीच पिळवणूक करायला त्यांनीही कमी केले नाही, मारून टाकायलाही कमी केले नाही. - सत्ताधीश कोणीही असोत भांडवलशाहीचे, साम्यवादी, कट्टर धर्मवादी असोत - सगळेच आपापल्या राजकीय, आर्थिक सत्तेसाठी बळी देतात तो सर्वसामान्यांनाच मग ते सैनिक असोत वा नागरिक असोत, ही गोष्ट अफगाणिस्तान, व्हिएटनाममध्येच दिसली नाही तर जगभरच दिसते आहे ही शिक्षा त्यांना कायमचीच भोगावी लागते. राजकीय, धार्मिक, आर्थिक सत्तेच्या चक्रव्यूहात अडकून पडण्यापेक्षा, मानवी जीवनाला या चक्रव्यूहातून बाहेर काढणे हेच सर्वाधिक महत्वाचे असते. तेच सत्य असते. हे सत्य खरे करून दाखविण्याचा दावा करणारे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे हा एक समाजातील घटक, पण त्यांच्याही लक्षातच येणार नाही किंवा ते लक्षात घेणे त्यांना जमतच नाही, परवडत नाही; ते म्हणजे सत्तेच्या मागे धावणारे सगळे 'वादी' लोक त्यांचाही वापर करून घेत असतात, तो त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठीच. असफल क्रांत्या, वाऱ्याच्या वेगाने धावणारे तंत्रज्ञान, देवधर्म संकल्पनांचा अतिरेक, थकले भागलेले आदर्शवाद या सगळ्यांची सरमिसळ झालेले, एकमेकांमध्ये अडकून पडलेले भ्रष्ट इतिहास हा आपला भूतकाळ या इतिहासांची वारसदार असलेली आजची आणि उद्याची पिढी यांचे भविष्य काय असेल या विचाराने अस्वस्थपणा येतोच. यातून सुटका नाही हे माहीत असूनही याचीही जाणीव आहेच की जगाच्या आरंभापासून सुरू असेलेले, जगाच्या अंतापर्यंत असेच सुरू राहणार आहे (दिवाळी २०१८)