पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अलीकडे जगभरच इस्लामचे पुनरुत्थान चालले आहे. त्यामागच्या प्रेरणांचा विचार करताना या मुद्द्याचाही विचार व्हायला हवा. त्यांची निघण्याची वेळ झाली. त्यांनी चहा, फळे, मेवा काहीही खाल्ले नाही. त्यांच्याबरोबर आलेल्यांनी सांगितले, 'बाबा दुसरीकडे कधीच काही खात नाही. स्वतःचा स्वयंपाक, कपडे, भांडी सगळी कामे ते स्वतःच करतात.' निघताना अफगाण पद्धतीप्रमाणे मी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. मी वाघाशी काही कधी हस्तांदोलन केलेले नाही तरी, बादशहाखान यांच्याशी हस्तांदोलन करताना वाटले, वाघाचा ह्यत असाच असावा. वाघासारखे रुंद, मजबूत हात असूनही तळवे अतिशय मऊशार, गुलाबी, आणि हे तर धुण्याभांड्यासह सगळी कामे स्वतः करतात! त्याला २६ वर्षे उलटून गेल्यानंतरची ही एक घटना, त्यावेळी तालीबानींची राजवट संपून लोकशाही सुरू झाली होती, सौमित्रला वाटले, परत एकदा अफगाणिस्तानात जाऊन एक शॉर्ट डॉक्युमेंटरी बनवावी. त्याआधी त्याने दोन-तीन हिंदी चित्रपट बनवलेही होते. मला म्हणाला, 'तू चल माझ्याबरोबर, म्हणजे तिथल्या बायकांच्या मुलाखती घेता येतील.' त्यासाठीचा खर्च आम्हीच करायचा ठरवले. पैशांची जुळवाजुळव, व्हिसा यामध्ये दोन- तीन महिने गेले. थंडी सुरू झाली. युद्धाची दहा वर्षे आणि नंतर तालीबानींची सत्ता यांमुळे चांगली हॉटेल्स उद्ध्वस्त झाली होती. जी होती त्यांमध्ये खोली गरम करण्याच्या सोयी नव्हत्या. वयाच्या सत्तरीत मी तिथली थंडी मला सहन होणे शक्य नव्हते. मी नाही जाऊ शकले. सौमित्र एकाच गेला. काबूलच्या वृत्तवाहिनीवरच्या एका माणसाशी त्याने संपर्क साधला. त्यामुळे भाषेचा प्रश्न सुटला. काबूलमध्ये १०-१५ दिवस राहून त्याने 'खूब अस्ती अफगाणिस्तान - 'ठीक चाललंय ना अफगाणिस्तान?' हा तासाभराचा चित्रपट बनवला, लॉस एंजेलिसमधल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्या चित्रपटाची सर्वोकृष्ट चित्रपट म्हणून निवड होणारच होती. परंतु झाली नाही निवड. कारण चित्रपट उत्तम, पण काही अफगाणांनी त्या चित्रपटात आम्हाला अमेरिका नकोय, असे म्हटले होते. काही रशियाच्या विरोधातही बोलले होतेच, अफगाणांना रशिया, अमेरिका दोघेही नकोसे झालेत. मुलाचा हा चित्रपट अनेक ठिकाणी दाखवला मात्र गेला. शाह मोहम्मद रईस आणि कित्येक अफगाणांनी तो पाहिला, रईस यांनी सौमित्रला फोन केला. सौमित्राने त्यांना सांगितले, की त्या काळात तो शाळकरी मुलगा होता. आईनं पुस्तक लिहिलंय, 'अफगाण डायरी', त्याचं इंग्रजी भाषांतर झालंय, 'माय अफगाण डायरी', ते तुम्ही वाचा,' त्यांनी ते पुस्तक वाचले. मला फोन केला. बोलणी झाली. त्यांनी 'माय अफगाण डायरी' च्या शंभर प्रती विकत घेतल्या, कुणाकुणाला देण्यासाठी मी त्यांना सांगितले, 'तुम्हाला हवं तर त्याचं फारसी भाषेत भाषांतर प्रसिद्ध करा. मला त्याचा एक पैसाही रॉयल्टी नको, इंग्रजी वाचता न येणाऱ्यापर्यंत माझे अनुभव पोचतील.' 'तहशक्कूर' ('धन्यवाद' ) – ते म्हणाले, रईस यांनी नंतर सांगितले की, एक अमेरिकन, हेन्री ब्रॅन्डन यांनाही माझ्याशी बोलायचे आहे. तालीबानी सरकारने अफगाणिस्तानात चालवलेला विध्वंस लोकांचा छळ थांबवण्यासाठी अमेरिकेने २००१ साली अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवले होते. त्यामध्ये त्यावेळेचे अगदीच तरुण ब्रॅन्डन तिथे गेले होते. म्हणून त्यांनी रईस यांच्याशी बोलणे केले. माझ्या पुस्तकाबद्दल कळल्यावर त्यांना माझे पुस्तक हवे होते, माझ्याशी बोलायचे होतेच. मी अर्थातच होकार दिला. रईस यांच्याशी बोलणे झाले आणि माझ्या अफगाणिस्तानमधल्या आठवणी उफाळून आल्या. त्या आठवणींनी अस्वस्थ केले. सौर (जेव्हा मार्क्सवादी दाऊद सत्तेवर आला) राज्यक्रांती, त्या पाठोपाठची रशियन सैन्याची घुसखोरी यांचे अनुभव आठवू लागले. काबूल दूरचित्रवाणी इमारतीवर टाकलेल्या बॉम्बमुळे आभाळाला भिडणाऱ्या धुराचे लोट, रात्रभर चाललेला फायरिंगचा दणदणाट, विमानांचा घरघराट जे काय घडलेय ते बघायला म्हणून दुसऱ्या दिवशी शहरात पायीपायी हिंडत राहिलो, एका चौकातल्या एका रशियन सैनिकाचा फोटो काढावसा वाटला, जेमतेम मिसरूड फुटलेला तो सैनिक तर माझ्या मोठ्या मुलाच्या वयाचाच दिसत होता. इतिहासाचा साक्षीदार म्हणून फोटो काढ़ावासा वाटला तेव्हा एक अफगाण आमच्यावर संतापला होता. ओरडलाच 'फूटू? ची फुटू? इमरोज अफगाणी मुर्दा शुद!' – फोटो ? फोटो कसला? आज अफगाणिस्तान मेलंय! - त्याचे हे वाक्य कसे विसरेन मी? रशियाच्या घुसखोरीनंतरचा सहा महिन्यांचा अनुभव, कितीतरी अफगाणांशी झालेल्या चर्चा आठवीत बसले मनात आले, आपण तर फक्त साच महिन्यांचा अनुभव घेतलाय. रशियन सैन्य तर तिथे तब्बल फक्त दहा वर्षे होते. काय काय घडले होते त्या दहा वर्षात? मी विचार करीत बसले, तेवढ्यात सौमित्रचा फोन आला, त्याने मला सांगितले ते अतिशयच महत्त्वाचे. 'एका रशियन लेखिकेचं त्याबद्दल पुस्तक आहे, ते वाच!' स्वेटलाना अलेक्झांड्रीया यांच्या त्या पुस्तकाचे नावच आहे, 'झिंकी बॉईज' म्हणजे शवपेट्यातील मुलं स्वेटलाना यांचे हे पुस्तक वाचत गेले आणि युद्ध म्हणजे काय, 'डावे-उजवे' म्हणजे काय, यांचे विश्वदर्शन झाले आणि त्याच वेळी मानवतावादी, लोकशाहीवादी यांचे केविलवाणेपणदेखील दिसले. • रशियन सैन्याच्या घुसखोरीनंतर सहा साडेसहा वर्षांनंतर, १९८६ साली स्वेटलाना काबूलला भेट द्यायला गेल्या होत्या, त्या आधी त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील रशियन स्त्रियांच्या सहभागाबद्दल पुस्तक लिहिले होते. त्या वस्तुस्थितीमुळे त्यांना अतिशय मनस्ताप झाला तेव्हाच त्यांनी ठरवले, की यापुढे युद्धाबद्दल कधीच लिहायचे नाही. त्यानंतर एकदा त्यांना अफगाणिस्तानातील युद्धातून परत आलेले दोन सैनिक भेटले. बोलणी झाली. त्यांच्याकडून त्यांचे एक एक अनुभव ऐकून त्या काबूलला गेल्या. त्यावेळी काबूल शहरात जागोजागी मोठमोठे फलक झळकत होते – 'कम्युनिझमच आपले उज्ज्वल भविष्य !' निवडक अंतर्नाद ४०५