पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातील. अशा पद्धतीची आपली एक रणनीती यापुढे सर्व मराठी भाषकांनी एकत्र येऊन कृतीत आणली पाहिजे. तरच तंत्रज्ञान आपल्या मराठी बाजारपेठेला अनुकूल होईल. त्यासाठी खास 'मराठी' असा ग्राहकवर्ग असलेली बाजारपेठ निर्माण करायला हवी व वाढवायला हवी. परंतु सर्वसामान्य लोक वरती आले तर, आपल्यावर आपत्ती येईल, असं काही अभिजन समजतात. त्यांच्यामुळे आमची 'स्पेस' कमी होईल असं त्या अभिजनांना वाटतं. हा विचार खरं तर ज्यावेळेला समाज हा शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये होता, तेव्हा ठीक होता. याचं कारण, शेती करण्यासाठी असलेली पृथ्वीवरची जमीन ही मर्यादित आहे. तिची वाटणी जर जास्त लोकांमध्ये झाली, तर माझ्या वाट्याला येणारी जमीन कमी आहे. पण हा विचार ज्ञानयुगामध्ये सयुक्तिक ठरत नाही. याचं कारण, प्रत्येक जण नवीन ज्ञाननिर्मिती व त्यातून संपत्तिनिर्मिती व मूल्यनिर्मिती करू शकला, आणि तशा कर्मशील ज्ञानाचं आदानप्रदान जर आम्ही सहजासहजी करू शकलो, तर ज्ञानाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा विस्तार पृथ्वीच्या क्षेत्रफळाशी संबंधित नाही हे लक्षात येईल. त्यामुळे आता सगळ्याच समाजाला वर येण्यासाठी फार मोठा अवसर आहे, अवकाश आहे आणि सगळ्यांच्या उन्नतीसाठी संधी आहे. एकाची उन्नती झाली असता दुसऱ्याची अवनती होते अशी जी स्थिती शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये होती, ती आता बदलते आहे. ज्ञानप्रधान व्यवस्थेमध्ये 'विन- विन' अशी परिस्थिती सहज शक्य आहे आणि त्याच्यामुळे एक नवा जोडलेला समाज निर्माण करून ज्ञानयुगामध्ये आम्ही सगळेच पुढे जाऊ शकतो. कोणालातरी खाली दाबूनच, त्याचं शोषण करूनच मला माझा विकास करता येतो, ही मानसिकतासुद्धा आम्हांला बदलायला पाहिजे. मग आम्हांला अभिजन आणि बहुजन असा वाद निर्माण करण्याची गरज पडणार नाही. खरं म्हणजे, सगळ्यांनाच आम्ही जर बरोबर घेऊन जाऊ शकलो तर एका विषमताविरहित समाजाची आणि राष्ट्राची निर्मिती आम्ही करू शकू. आज आमच्याकडे लांच्छनास्पद परिस्थिती अशी आहे की भारतात कितीही तथाकथित आर्थिक विकास झाला - आर्थिक विकासाचा दर वाढला, तरी ८० कोटी लोक हे प्रचंड दारिद्र्याच्या विळख्यात राहतात, शोषित अवस्थेत राहतात. इतक्या भीषण अशा प्रकारचं जीवन ८० कोटी लोक जगताहेत ३८४ निवडक अंतर्नाद याचं मूळ आमच्या त्या 'विन लूज' मानसिकतेमध्ये आहे नव्या ज्ञानयुगामध्ये आम्ही सगळ्यांना समृद्धीकडे घेऊन जाऊ शकतो. आम्ही जर ज्ञानाधिष्ठित अशी शेती करू लागलो, आम्ही जर ज्ञानाधिष्ठित असे उद्योगधंदे करू लागलो तर त्यांच्यातून निर्माण होणारी संपत्ती सर्वांना पुरेशी असू शकेल. त्यामुळे आमचा सर्वसामान्य विद्यार्थी, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा किंवा मुलगीही ह्या ज्ञानप्रधान संस्कृतीमध्ये किती लवकर सहभागी होईल हे आम्हांला बघावं लागेल. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःही एका नवीन ज्ञानाच्या निर्मितीमध्ये रत होईल आणि एका नवीन दारिद्र्यमुक्त व विषमतामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ती खूप महत्त्वाचं योगदान द्यायला तयार होईल आणि तेही तिच्या स्वभाषेतून. अभिजनांची मानसिकता जी बदलायची आहे ती समतेच्या दिशेने आपल्याला बदलायची आहे. ही आत्ता आपल्या पुढची फार महत्त्वाची प्राथमिकता आहे. भाषेचं त्याला फक्त आवरण आहे, हे आपण कृपा करून नीट लक्षात घ्या. नाहीतर खूप चुकीची रणनीती निर्माण होते. आम्ही 'मराठी पाट्या लावा' असं म्हणायला लागतो, कुणी बेरोजगार अमराठी युवक नोकरीसाठी उमेदवार म्हणून आला, तर त्याच्यावर जाऊन आम्ही हल्ले करतो. मला असं वाटतं, की खरा प्रश्न अगदीच वेगळा आहे आणि आपण जी रणनीती अवलंबतो ती कालबाह्य आहे किंवा एक प्रकारे गैरसमजूत करून देणारी आणि लोकांमध्ये विशिष्ट पद्धतीने फूट पाडणारी आहे. आत्ता अभिजनांची मानसिकता जी बदलायची आहे ती समतेच्या दिशेने आपल्याला बदलायची आहे. ही आपल्या पुढची फार महत्त्वाची प्राथमिकता आहे. भाषेचं त्याला फक्त आवरण आहे, हे आपण कृपा करून नीट लक्षात घ्या. नाहीतर खूप चुकीची रणनीती निर्माण होते. आम्ही मराठी पाट्या लावा' असं म्हणायला लागतो, कुणी बेरोजगार अमराठी युवक नोकरीसाठी उमेदवार म्हणून आला, तर त्याच्यावर जाऊन आम्ही हल्ले करतो. मला असं वाटतं, की खरा प्रश्न अगदीच वेगळा आहे आणि आपण जी रणनीती अवलंबतो ती कालबाह्य आहे किंवा एक प्रकारे गैरसमजूत करून देणारी आणि लोकांमध्ये विशिष्ट पद्धतीने फूट पाडणारी आहे. त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. खरं तर आम्हांला मराठी पाटी लावण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही पाहिजे; कारण सौदी अरेबियात जशी सर्वसामान्यपणे लोकांना अरेबिक भाषेशिवाय दुसरी भाषाच कळत नाही तसंच आपल्याकडेही मराठीचं होऊ शकेल. याचं कारण एकदा याची खात्री पटली, की ती ज्ञानभाषा आहे, ती विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा आहे, तिच्यातून मला इतर सगळ्या जगातल्या लोकांशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोलता येतंय, व्यवहार करता येतायत, मग ते चिनी असोत, नाहीतर जॅपनीज असोत, मग मला इंग्रजीच्या पांगुळगाड्याची गरजच राहणार नाही. ह्या नव्या परिस्थितीकडे आपलं तंत्रज्ञान आपल्याला घेऊन जातंय. ही त्याच्यातली सर्वात आनंदाची बातमी आहे. म्हणजे सहिष्णुतेवर व प्रेमावर आधारलेल्या भाषेच्या दऱ्या बुजवणाऱ्या आणि जगभर शांततामय सहजीवनाची निर्मिती करणाऱ्या दिशेला