पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रशियाने ते ओझे खांद्यावरून उतरविले, तर चीनने त्याचे लेबलच केवळ शिल्लक ठेवले. मुक्त अर्थव्यवस्था (भांडवलशाही हे तिचे जुने व बदनाम नाव) या साऱ्यांनी स्वीकारली. अमेरिकेचा म्हणून २. मध्यमवर्गाचा उदय मध्यमवर्गाचा उदय ही गेल्या २५ वर्षांत झालेली देशातील सर्वात मोठी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्रांती आहे. १९९१ नंतर बदललेले देशाचे अर्थकारण व त्याने समाजात आणलेली वार्षिक ५ ते ९ टक्क्यांची सुबत्ता, यामुळे सारा देश दारिद्र्याच्या सीमारेषेच्या वर उठण्याची शक्यता प्रथमच निर्माण झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली, तर २०२१ पर्यंत भारत हा जगातली महासत्ताच नव्हे तर साऱ्यांना गंभीरपणे दखल घ्यावी लागेल अशी अर्थसत्ताही होणार आहे. एका जागतिक पाहणीनुसार (गोल्डन सॅक्स ब्रिक) २०३२पर्यंत भारत जपानहून मोठी अर्थसत्ता बनला असेल. दुसऱ्या पाहणीनुसार २०२१पर्यंत ३.५ लाखांपासून १७ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या दीड लाखांचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांहून अधिक झाली असेल. २०२५ पर्यंत कमी उत्पन्न (दीड ते अडीच लाख) असणाऱ्या कुटुंबांची संख्या देशाच्या एकूण कुटुंबसंख्येच्या १५ टक्क्यांहून कमी होईल. त्याच वेळी वरिष्ठ मध्यमवर्गातील कुटुंबांची संख्या ४० टक्क्यांवर गेली असेल. हिणविला गेलेला हा विचार त्या देशाशी वैर कायम ठेवूनही त्यांनी घेतला. या वैरालाही आता स्पर्धेचे व प्रसंगी सहकार्याचे वळण मिळत असल्याचे जगाला दिसले आहे. याच वेळी घडून येणारी आणखी महत्त्वाची बाब ही की आज ३५ टक्क्यांएवढ्या राष्ट्रीय मिळकतीचा स्वामी असलेला मध्यमवर्ग २०२५ पर्यंत ४७ टक्के मिळकतीचा मालक बनला असेल व त्याची संयुक्त मिळकत देशाच्या धनिक वर्गाच्या एकूण उत्पन्नाहून मोठी असेल. ३७ टक्क्यांहून मोठा झालेला मध्यमवर्ग आणि १५ टक्क्यांएव उरलेला कनिष्ठ वर्ग यातूनच उद्याच्या राज्यकर्त्यांना त्यांचा मतदारसंघ निश्चित करावा लागेल. येत्या २० वर्षांत घडणारी एक आणखी महत्त्वाची बाब ही, की ग्रामीण भागातील २६ ते २८ कोटी लोक तोवर शहरात येतील. गेल्या ६० वर्षांत झालेल्या शहरीकरणाहून हे शहरीकरण मोठे असेल. (गेल्या दहा वर्षांत शहरी नागरिकांची संख्या २८.६० कोटींवरून ३७.७ कोटींवर गेली, ह्य हीच वस्तुस्थिती सांगणारा प्रकार आहे. ) आर्थिकदृष्ट्या मध्यम असलेला कोणताही वर्ग स्थितिवाद्यांचा असणार नाही, तो क्रांतिकारकांचीही पैदास करणारा नसेल. ॲरिस्टॉटल म्हणाला तसे, तो 'सर्वोत्कृष्ट राजकारण करणारा व एकाच वेळी प्रगतिशील व स्थितिशील असेल. अॅरिस्टॉटलच्या मते खरी लोकशाही हे त्याचेच राज्य आहे. १९९१ पर्यंत टेलिफोनधारकांची देशातील संख्या १ कोटीहून कमी होती. आजच्या मोबाइलधारकांची संख्या ८० कोटींहून अधिक आहे व तीत दरमहा १० ते १५ लाखांची भर पडत आहे. आजच्या मोबाइलधारकांपैकी सुमारे एक कोटी लोक वर्षाकाठी मोबाइल बदलतात. एका मोबाइलची किंमत १ हजार रुपये धरली तर हा बाजार १ हजार कोटींचा होतो. अडीच लक्ष रुपयांच्या लहान मोटारींच्या संदर्भात ही किंमत थेट ४ लक्ष मोटारींच्या किमतीएवढी होते. तेवढ्या रकमेत मोटारींचा कारखानाही उभारता येतो. प्रत्येक मोबाइलधारक दरमहा १०० रुपयांचे बिल भरणारा असेल, तर ती रक्कमही ८ हजार कोटींएवढी भरते. भारताची पहिली पंचवार्षिक योजना फक्त २ हजार कोटींची आणि दुसरी २.५ हजार कोटींची होती हे लक्षात घेतले, की मोबाइलधारकांच्या एका महिन्याच्या खर्चात तशा चार योजना बसू शकतात, हेही ध्यानात येते. अर्थव्यवस्थेची ही वाढ व तीत येणाऱ्या समाजाच्या एका मोठ्या वर्गाची भागीदारी यातून ठळकपणे जाणवणारी आहे. या धारणेबाहेर असणाऱ्यांचा वर्ग अर्थातच आहे आणि तो या धारणेचा भाग बनवणे हे देशासमोरचे आताचे आव्हान आहे अडचण एवढीच, की या व्यवस्थेचा भाग बनलेली लाभधारक माणसे तिच्या अपुरेपणाविषयी जेवढी संघटितपणे बोलतात, तेवढी या व्यवस्थेबाहेरची माणसे बोलत नाहीत. त्यांच्या असंघटित असण्याचा जसा तो परिणाम आहे, तसा त्यांच्या आवाजाहून संघटितांचा स्वर उंचीचा असण्याचाही तो भाग आहे. या स्थितीत आपला सामाजिक वाद- विचार जातीपातीचा न राहता समाजाच्या नव्या संरचनेचा, रस्ते, पाणी, वाहतूक, मेट्रो व निवासव्यवस्था इत्यादीसंबंधीचा असेल व तो सध्याच्या विचारांच्या क्षेत्राहून वेगळा असेल. वाढलेला मध्यमवर्ग, लोकसंख्येचे होणारे शहरीकरण, कृषिप्रधान देशाचे होत असलेले औद्योगिकीकरण या बाबी समाजाचे पूर्वीचे व आताचेही अनेक प्रश्न निकालात काढणाऱ्या वा विस्मृतीत टाकणाऱ्या आहेत. लोकसंख्येचे स्थलांतर, राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ आणि आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गातील लोकांचा मध्यमवर्गात झपाट्याने होत असलेला प्रवेश या बाबी प्रस्थापित विचारांच्या कक्षांनाही धक्का देणाऱ्या आहेत. राजकीय पक्ष, विचारवंतांचे वर्ग, माध्यमांवरील चर्चक या साऱ्यांच्या विचारातून गरिबी, बेकारी, दारिद्र्यरेषेखालची माणसे इत्यादींची चर्चा कमी होताना दिसते. निवडणुकीतील प्रचाराचा भर त्या वर्गाला भेडसावणाऱ्या निवडक अंतर्नाद ३७५