पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपण आजवर मिरविलेला शाहिरी समाजवाद टाकून दिल्याचे सांगणे वा जाहीर करणे हे त्यांना पराभव पत्करण्याहून मोठे अपयश वाटते. देशाचा वार्षिक साडेतीन टक्क्यांचा विकासदर या काळात ६, ७, ८ व ९ टक्क्यांपर्यंत वर गेला. मध्यमवर्गाची संख्या ६ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर गेली. पायी चालणारा देश सायकलवर, सायकलीवरून जाणारा देश मोटारसायकलीवर आणि मोटारसायकलीवरचा देश चार चाकी गाड्यांवर आला. ही वाट खुल्या अर्थकारणाची, स्पर्धेच्या अर्थव्यवहाराची, विदेशी गुंतवणुकीची आणि स्पष्ट शब्दांत सांगायचे तर, भांडवलशाहीच्या दिशेने जाणारी होती. या वाटेवर एकदा पाऊल टाकले, की मग ते मागे घेता येत नाही आणि त्या वाटचालीची गती कमीही करता येत नाही. २००९ नंतर सरकारने ही वाट सोडली नसली, तरी तिच्यावरची त्याची गती मात्र मंदावली. जगाच्या अर्थकारणाला देशाची दारे मोकळी करून देणे, विदेशी उद्योगांचे स्वागत करणे आणि तोट्यात चालणारे सरकारी उद्योग खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्याचे १९९१ ते २००४ पर्यंतचे धोरण या काळात रखडत व प्रसंगी थांबत असल्याचे देशाला दिसले. त्याचे कारण आर्थिक नव्हते. १९३० ते १९८४ या काळात डोक्यावर वाहिलेल्या समाजवादी समाजरचनेच्या राजकीय व सामाजिक मनोधारणेचे ते फळ होते, एवढी वर्षे खांद्यावर घेतलेली विचारांची ही चौकट उतरून ठेवणे आपल्या राजकीय मानसिकतेला न जमणे हे त्याचे मुख्य कारण होते. ज्या काँग्रेस पक्षाने ही मानसिकता टाकायची, त्याच्या नेतृत्वावर त्या जुन्याच विचारांचे जोखड खांद्यावर असणाऱ्या पक्षांसोबत राहण्याची व त्यांच्याबरोबर केलेल्या आघाडीचा धर्म पुढे नेण्याची जास्तीची जोखीमही होती. मनमोहन सिंग यांच्या सत्तारूढ आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व त्यांचे १९ खासदार यांना बदलात 'भांडवली' आक्रमण दिसत होते. त्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या आणि स्वत:ला अजून समाजवादी समजणाऱ्या मुलायम, लालू आणि पासवान यांनाही त्यांची जुनी वस्त्रे एकाएकी बदलणे अवघड होते. डावे पक्ष तर या बदलावर अमेरिकेचा ग्रांथिक शिवका उमटवायला तयार होते. विनोद हा, की याच वाटेवरून चालत आलेला व ती वाट आवडत असलेला भारतीय जनता पक्षही केवळ राजकीय लाभावर नजर ठेवून या बदलाला विरोध करीत होता. कारण कोणतेही असो, मनमोहन सिंग सरकार अल्पमतात येत असेल तर त्यासाठी वाटेल ते करण्याची, डाव्यांपासून बहुजन समाज पार्टीवाल्यांपर्यंत कोणाही बरोबर जाण्याची त्याची तयारी होती. ती त्याने १९६७ पासून देशाला दाखविलीही होती. कोणत्याही सरकारची, मग ते मनमोहन सिंगांचे असो वा वाजपेयींचे, पहिली जबाबदारी देशात राजकीय स्थैर्य राखण्यासाठी सरकार टिकविणे ही आहे ज्या वाटेवरून सरकार घसरणार असेल तिच्यावरून चालत जाण्यापेक्षा थांबणे व ती प्रशस्त होण्याची वाट पाहणे एवढाच पर्याय मग त्याच्याजवळ शिल्लक राहतो. 'सत्ता गेली तरी चालेल..', हे वीरश्रीपूर्ण विधान सत्तेत नसलेली माणसे ३७४ निवडक अंतर्नाद करतात. सत्तेतली माणसे ते उच्चारत वा मनात आणत नाहीत. सत्तेला चिकटून राहण्याचा मोहच तसे करायला त्याला कारणीभूत असतो असे नाही, सत्ता सोडल्याने निर्माण होणारी अस्थिर पोकळी भरून काढणारे दुसरे कोणी दिसत नसणे हेही त्याचे कारण असते, भाजपा पर्याय होत नाही, तिसरी आघाडी अस्तित्वात नाही आणि प्रादेशिक पक्ष केंद्राच्या रिंगणाजवळ अजून पोहचायचे आहेत हे वास्तवही अशा वेळी महत्वाचे ठरते. हे सारे जाणकारांना आणि राजकारणी माणसांना कळत नाही काय? कळते. पण बदलत्या राजकारणाचे वास्तव लक्षात आल्यानंतरही ते स्वीकारण्यातली अपरिहार्यता मान्य करणे यात त्या साऱ्यांना त्यांचे दुबळेपण दिसते. आपण आजवर मिरविलेला शाहिरी समाजवाद यकून दिल्याचे सांगणे वा जाहीर करणे हे त्यांना पराभव पत्करण्याहून मोठे अपयश वाटते. आपण समाजवादाचा मार्ग सोडला आहे, हे काँग्रेसला व त्या पक्षाच्या नेत्यांना ठाऊक नाही असे नाही. पण तसे सांगून जनतेला विश्वासात घेण्याचे धाडस त्या पक्षातल्या कोणालाही अजून जमले नाही. भाजपला व त्याच्या पूर्वीच्या जनसंघावताराला समाजवादाशी अगोदरही फारसे घेणे-देणे नव्हते व आताही ते नाही. पण आपण खुल्या म्हणजे भांडवली अर्थव्यवस्थेचे तरफदार आहोत, असे जनतेला सांगणे त्यांच्याही कोणा पुऱ्याला जमले नाही. समाजवाद आणि गांधीप्रणीत समाजवाद ही नावे त्यांचे नेमके स्वरूप स्पष्ट न करता घेत राहायची आणि मनात भांडवली व्यवस्था आळवायची, हे ढोंग टाकणे त्यांच्याही मनोधारणेला जमणारे नाही. मुलायमसिंगांच्या पक्षाचे नावच तेवढे समाजवादी आहे प्रत्यक्षात त्यांचा व त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम समाजवादापासून दूर जाऊन अनेक दशके लोटली आहेत. लालूप्रसाद व पासवान यांचे पक्ष, दक्षिणेतले द्रमुक व अण्णा द्रमुक, महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, टीडीपी, जेडियू, जेडीएस यांच्यातल्या कोणालाही समाजवादाशी देणेघेणे राहिले नाही. शिवसेना किंवा मनसेसारखे स्थानिक भावनांवर उभे असणारे पक्ष तो शब्दही उच्चारताना कधी दिसत नाहीत. मात्र गेली साठ वर्षे समाजाला समाजवाद ऐकविल्याने घडलेली या साऱ्यांची मानसिकता यांच्यातल्या कुणाला टाकवत नाही आणि त्या प्रचाराने घडविलेली समाजाची मनोधारणा त्याला टाकायला सांगणे यांना भयावहही वाटते. मन भांडवलशाही आणि मनोधारणा समाजवादी असा हा विसंवाद आहे तो आहे तोवर आपले राजकीय ढोंगही शाबूत राहणार आहे. समाजवाद हा अनेकांच्या भजनाचा पण जगाने टाकलेला विचार आहे. त्यातल्या वाटपाच्या प्रक्रियेविषयी अनेकांना आस्था असली तरी त्याच्या उत्पादकतेचे अपयश साऱ्यांच्या कधीचेच ध्यानात आले आहे. ज्या देशांनी त्या विचारासाठी आपली माणसे मारली व जगावर युद्धे लादली त्यांनीही आता तो सोडला आहे