पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्माण होतात याचा पुरेसा अभ्यास ते का करीत नाहीत? तसे पाहायला गेले, तर या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ गरिबीत आहे व गरिबीचे मूळ, हिंदुस्थानातील सद्य:स्थितीत तरी, शेतीच्या दुर्दशेत आहे. जगातील पहिला व्यवसाय शेती हा आहे. प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा, एका दाण्याचे हजार दाणे करणारा, हा एकमेव व्यवसाय व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात हे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाणघेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची ( Exchange Value) वृद्धी होते. समाजाचा इतिहास हा या शेतीतील गुणाकाराच्या वाटपाचा बहुतेकदा लुटीचा इतिहास आहे. शेतीमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आपल्यापुढचे कुठलेही प्रश्न सुटणे शक्य नाही अशी माझी धारणा आहे - उदाहरणार्थ, आपल्या शहरांतील भीषण बकालपणा, झोपडपट्टी, प्रदूषण, गलिच्छपणा हे प्रश्न घ्या शहरांची इतकी अफाट वाढ का होते? फुटपाथवरसुद्धा पथारी पसरायला जागा नाही, अपुरा वीजपुरवठा, पाण्याचे हाल, सगळीकडे पसरलेली घाण असे सगळे वास्तव असूनसुद्धा लाखो माणसे शहरांमध्ये एक- एक दिवस रेटत राहतात; एवढेच नव्हे तर दररोज त्यांत हजारोंची भर पडत असते. असे का? याचे एकमेव कारण म्हणजे शहरांतले हे गलिच्छ जीवन कितीही हालांचे असले, तरी शेतीवरच्या उपासमारीपेक्षा ते परवडले, असा शास्त्रशुद्ध विचार करूनच रोज नवे लोक ते शहरी जिणे पत्करतात. शेतीतील उत्पन्न वाढवल्याशिवाय शहरांकडे येणारा त्यांचा लोंढा थांबवताच येणार नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय नागरी जीवनाचे कुठलेच प्रश्न सुटणे शक्य नाही. स्वयंस्फूर्त कार्य करणाऱ्यांमध्ये ही व्यापक जाणीव मला कधीच आढळलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या वीतभर क्षितिजात बुडलेला. बरेचसे स्वयंस्फूर्त कार्य हे राष्ट्रावर कारगिलसारखी एखादी आपत्ती ओढवली की सुरू होते. परंतु, अशा कार्यातला उत्साह व त्यातील पावित्र्य हे अल्पजीवी असते हे इतिहासाची पाने चाळली की लक्षात येते. किल्लारी भूकंप झाला. मृत्यूच्या तांडवाने थैमान घातले. साया देशातून आणि जगभरातून मदतीचे पूर लोटले. साय लोकांनी ज्या तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली आणि जिवाची बाजी लावली त्याचे सर्वत्र मोठे कौतुक होऊ लागले. पण, कौतुकाच्या शब्दांचे ध्वनिप्रतिध्वनी विरतात न विरतात, तोच दगडामातीच्या ढिगाऱ्यात पडलेल्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने काढून नेण्यासाठी भुरटे चोरटे हल्ले करू लागल्याच्या आणि त्यांत पोलीसही सामील झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. परदेशांतून मदतीच्या रूपाने आलेले कपडे, अन्नधान्याचे डबे मान्यवर पुढाऱ्यांच्या कुटुंबीयांची आणि दोस्त मंडळींची शरीरे आणि घरे सजवू लागले. नेते मंडळींनी कोट्यवधींची माया जमा केल्याची ३६२ निवडक अंतर्नाद खुलेआम चर्चा होऊ लागली. अलीकडे येऊन गेलेल्या सुनामीच्या लाटेने सर्वदूर विध्वंस झाला. स्वयंसेवी संघटनांचे आयतेच फावले. मुंबईत आलेल्या अलीकडच्या पुरातही हाच अनुभव प्रत्येक मृतामागे काही ठोक रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते म्हटल्यावर आपत्तीच्या आधी मृत झालेल्यांचीही नावे नुकसानभरपाईच्या यादीत घातली गेली. सुनामीच्या बाबतीत तर एक प्रकरण सांगण्यासारखे आहे. सुनामीची लाट आली त्याआधी तमीळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांची हालत मोठी दयनीय झाली होती. मच्छीमारीच्या यांत्रिक बोटींशी स्पर्धा करता येत नसल्याने छोट्या होड्यांचे कोळी मच्छीमारीच्या धंद्यातून दूर कसे होता येईल याची चिंता करीत होते. त्यांना सुनामी ही इष्टापत्तीच वाटली. आता नवीन व्यवसाय करता येईल, नुकसानभरपाईदाखल काही रक्कम मिळाली तर त्याचा नवीन व्यवसायात प्राथमिक भांडवल म्हणून उपयोग होईल, असा विचार ते करीत होते. पण, सुनामीनंतर प्रेतांची वासलात लावल्यावर, हवा श्वसनीय झाल्यावर स्वयंसेवी संघटनांची लाट येऊन आदळली. जी ती संघटना कोळ्यांना मच्छीमारीच्या नव्या बोटी देण्याच्या धांदलीत, परदेशातील नावा बांधणाऱ्यांचा धंदा बुडीत आला होता, त्यांचा जुना साठा साफ झाला आणि तामीळनाडू व केरळ येथील मच्छीमार पुन्हा एकदा बोटी आहेत पण पकडायला मासे नाहीत, म्हणून समुद्रात खोलवर जाऊन शेजारी राष्ट्रांचे कैदी बनू लागले. स्वयंसेवी संस्थांचे सुनामी- पूर्व आणि सुनामी उत्तर ताळेबंद पाहिले तर स्वयंसेवी संघटनांच्या उदात्त आणि निःस्वार्थ कार्याचा बुरखा टरटरा फाटून जातो. मी काही केवळ शेतकरी नेता नाही. किंबहुना, मी खरा शेतकरी नाहीच. मी नेहमीच सांगत असतो, की मी जोशी आडनावाचा म्हणजे माझा जन्म ब्राह्मणघरचा आहे पण शेतकरी भावांनी आणि शेतकरी मायबहिणींनी आतापर्यंत मला जितके प्रेम दिले, तितके ते कुणालाही दिलेले नसेल. मी जरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीचा प्रश्न मांडत आलो असलो, तरी शेतीचा प्रश्न मी एका दरवाज्याची किल्ली म्हणून वापरला आहे; शेतीमालाच्या भावाचे तत्त्वज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र करण्याची गुरुकिल्ली म्हणून मी वापरले आहे मी मुळात स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. गरिबीचे नाव घ्यायचे, गरिबी हटवायची म्हणायचे आणि गरिबी निर्मूलनाचे वेगवेगळे कार्यक्रम काढून आपलेच खिसे भरून घ्यायचे, हे मी केले नाही, मी माझा विचार मांडत असताना माझी निळी जीन सोडायला तयार नाही. सुरुवातीच्या काळात शेतकरी संघटनेच्या सभेत प्रास्ताविक करणारे सांगत, "शरद जोशी परदेशात होते. इतका इतका पगार मिळत होता. ते सगळं सोडून शेतकऱ्यांची कीव आली म्हणून ते हिंदुस्थानात परत आले.” पहिल्या सभेपासून मी भाषणाच्या आरंभीच सांगत होतो की, "मी करुणेच्या पोटी आलेलो नाही. मी सत्यशोधनाकरिता आलेलो आहे आणि या