पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टर्निंग द सर्च लाईट इनवर्ड! एका महत्त्वाच्या निवडणुकीत पराभूत झालेला एक नेता नंतर म्हणाला, "माझे मतदार माझ्यावर एवढे नाराज आहेत हे मला कोणी सांगितलंच नाही." कोण आणि कसं सांगणार? राजकारणात 'चमचा संस्कृती' चा दबदबा वाटू लागल्यापासून स्तुतिपाठकांचीच सद्दी सुरू झाली आहे. जिथे संस्था-संघटनांचे 'मठ' झाले, तिथेही थोड्याफार फरकाने हाच प्रकार आहे. निदान राजकारणातल्यांना निवडणुकींच्या माध्यमातून त वास्तवाचे भान करून देता येते. पण निवडणुका न लढवताच सत्तापदांवर गेलेल्यांचे काय? शिवाय, अनेक संस्था-संघटनांमध्ये ज्यांच्याकडे औपचारिक पद आणि अधिकार आहेत, त्यांनी अनेकदा नैतिक अधिकार गमावले आहेत. उलट, ज्यांच्याकडे नैतिक अधिकार आहे, त्यांनी काल्पनिक वा वास्तविक असुरक्षिततेपोटी खरे बोलण्याचे धाडस दाखविणे नाकारले आहे. अशा स्थितीत, उच्चपदस्थांनी ठरविले तरच 'टर्निंग द सर्च लाईट इनवर्ड घडण्याची शक्यता अनेकदा हे इतक्या उशिरा घडते, की तोपर्यंत दृष्टी अधू झाल्याने सर्च लाईट अपुरा पडतो. आणि स्वयंसेवी संस्था या सर्वच ठिकाणी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची मानसिकता बाळगणारी कार्यकर्ते मंडळी पूर्वपक्षा खूपच दुर्मिळ झाली आहेत. आपल्या सार्वजनिक जीवनातल्या कार्यकर्तेपणाला अशी कर लागण्यामागे बदलत्या आणि विलक्षण गतिमान जीवनशैलीशी संबंधित असेही काही मुद्दे आहेत. रा. स्व. संघाचे प्रचारक पूर्वी शाळकरी किंवा तरुण मुलांना "संध्याकाळी काय करतोयस?” असा प्रश्न विचारत आणि बहुतेक वेळा त्याचे उत्तर "खास असं काही नाही..." असेच येई. आज कदाचित प्रश्न तोच असला तरी उत्तर तेच राहिलेले नाही. ट्यूशन क्लासेस, टीव्हीवरचे कार्यक्रम, मित्रांबरोबर फिरायला जाणे असे अनेक कार्यक्रम आज मुलांच्या अजेंड्यावर अगदी स्वाभाविकपणे असतात, जे पाल्यांचे, त्याहीपेक्षा कठीण पालकांचे. शहरात, व निमशहरात राहणाऱ्यांनाही आता 'फावला वेळ' असा फारसा राहिलेलाच नाही. साहजिकच, रिकाम्या वा फावल्या वेळेत समाजासाठी काही काम, ही संकल्पनाच आता नाहीशी होत चालली आहे. विशेषतः तरुणांच्या बाबतीत, आज आजूबाजूला स्पर्धेचे वातावरण इतके विलक्षण गडद होत असताना, समाजासाठी नियमितपणे आणि आवर्जून वेळ देण्याची मानसिकता, आणि व्यावहारिक शक्यताही, कमी होत चालली आहे अर्थात, विचारसरणी कोणतीही असो, कामाचे क्षेत्र कोणतेही असो, सार्वजनिक जीवनातले 'कार्यकर्ता जीवन' असे कोमेजण्यामागे असणारी कारणे केवळ व्यावहारिक नाहीत. समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीतले बदलही खूप परिणाम करणारे आहेत. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आदर्शवाद कमी होत चालला आहे आणि आदर्शवादी जीवन जगल्याची उदाहरणेही आसमंतातून नाहीशी होत चालली आहेत. "आम्ही नेमकं कोणाकडे बघून जीवन जगायचं?" असा अंतरीच्या कळवळ्याचा प्रश्न एखाद्या संस्था-संघटनेतला कार्यकर्ता करतो, तेव्हा नेहमीच तो बेगडी आणि आव आणणारा नसतो. चहूबाजूचे वातावरण, नेत्यांच्या आणि संस्थाधुरीणांच्या विचार वर्तनातील अंतर, त्यांच्यातला खोटेपणा, त्यांची स्वतःची अकर्मण्यता, त्यांचा निरुत्साह, त्यांचा अहंकार, त्यांचे 'मूडस्' या सर्वांना साक्षी असणारा कार्यकर्ता अशा वातावरणात अंगीकृत कामाची उमेदच हरवून बसतो. अशी उदाहरणे जेव्हा एखाददुसरीच असतात, तेव्हा कार्यकर्ते स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत घालतात आणि स्वतः पुरती ऊर्जा मिळवून पुन्हा कामाला लागतात. पण आपण ज्यांना नेता मानले त्यांचेही पाय मातीचेच आहेत, तेही समर्थ आणि विवेकशील नेतृत्व करण्यास अपात्रच आहेत असे जेव्हा त्याला वारंवार दिसू लागते, तेव्हा तो मूळचा संवेदनशील, ऊर्जावान कार्यकर्ता सिनिक किंवा अश्रद्ध बनतो. अशा कार्यकर्त्याचे प्रवाह पतित बनणे ही मग या प्रवासाची फक्त तार्किक परिणतीच उरते. सामाजिक, राजकीय आणि खरे म्हणजे एकूणच सार्वजनिक जीवनात नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारणारे आपल्या दांभिक वर्तनातून सर्वसामान्यांच्या विश्वासाशी वा श्रद्धेशी खेळ खेळतातच, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे नेता आणि पर्यायाने कार्यकर्ता नावाच्या संस्थेचीही ते विलक्षण हानी घडवून आणतात! महाराष्ट्राच्या एका महानेत्याने अलीकडेच दोन वेगवेगळ्या भाषणांमधून कार्यकर्ते आणि चळवळी याविषयी मतप्रदर्शन केले आहे. शिवसेनेचे थेट नाव न घेता हा नेता म्हणाला, "लोकांमध्ये जाऊन राजकीय काम करायचं तर लवकर उठून कामाला लागावं लागतं; आणि संध्याकाळी सातनंतरही लोकांशी भेटण्या- बोलण्याच्या स्थितीत असावं लागतं.” या प्रतिपादनाशी कोणीच असहमत होणार नाही. पण खुद्द या नेत्याने आपल्या आजच्या व पूर्वीच्या पक्षांची बांधणी करताना कार्यकर्त्यांसाठी अशी काही वर्तनसूत्रे घालून दिल्याचे ऐकिवात नाही, आजही, खुद्द या महानेत्याच्या पक्षातही विचारांची पक्की बैठक असलेले, सद्वर्तनी, आणि 'संघटने' शी निष्ठावान असलेले कार्यकर्ते, एखादे 'केडर' बांधण्याच्या पद्धतीने; जोपासले जात आहेत, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. शिवाय, राजकीय कार्यकर्त्यांच्या वागणुकीतले हे अपेक्षित बदल जाहीर आवाहनातून वा अन्य पक्षांची उणीदुणी काढून साधत नाहीत, त्यासाठी तळातल्या कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद असावा लागतो. असा संवाद आणि त्यातून जोपासले जाणारे 'नाते' च नसल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही आज कोणी कोणाला सुधारायला धजत नाही. एखादा गुणी, सद्वर्तनी आणि परिश्रमी कार्यकर्ता पाय घसरून पडू लागला तर त्याबद्दलची 'कुजबुज' वाढते आणि अखेर झालीच तर त्यावर कारवाई होते. पण चुकांचा असा कडेलोट होण्यापूर्वीच त्या संबंधिताला समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे फारसे कोणी मनावर घेत नाहीत. बरेचदा तर असेही मनात येऊन निवडक अंतर्नाद ३४९