पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आज २००१ साली जयप्रकाश नारायण निळू दामले संपूर्ण क्रांती हे एक भव्य स्वप्न जेपींनी तरुणांना दिले. पण जुने आदर्श कायम उपयोगी ठरत नाहीत; प्रत्येक पिढीला स्वतःसाठी वेगवेगळे जेपी शोधावे लागतात. माझा मोठा मुलगा १९७७ साली जन्मला. आज तो २३ वर्षांचा आहे. चित्रकार आहे. समाजातली विविध प्रकारची माणसं चित्राकडे कशी पाहतात याचा अभ्यास तो करतो. त्यामध्ये त्यानं गुन्हेगार, लहान मुलं, दहशतवादी, रा. स्व. संघ, कम्युनिस्ट अशा वर्गातली माणसंही धरली आहेत. सांगण्याचा मतलब असा की तो आजच्या जगाकडे काळजीपूर्वक, गंभीरपणानं बघणारा, विचार करणारा आहे. सध्या तो परदेशात शिकतो आहे त्याला जेपी, जयप्रकाश नारायण माहीत नाहीत. माझा धाकटा मुलगा १९८५ साली जन्मला. आज तो शालांत परीक्षा पास झाला आहे. त्याला जेपी माहीत नाहीत. गांधी, नेहरू वगैरे माणसं त्यानं त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचली आहत, मार्क मिळवण्यासाठी, त्यापलीकडे त्याला त्या माणसांबद्दल जाणून घ्यायची इच्छा नाही. मी व्यक्तिशः राजकारणात गुरफटलेला होतो, असतो, आहे. माझं कल्पनाविश्व राजकारणाभोवतीच गुंफलेलं आहे. माझी इडियम राजकारणाची आहे माझ्या उपमा राजकारणातल्या असतात. मोठा मुलगा परदेशात गेल्यावर तिकडल्या जीवघेण्या थंडीनं, बर्फानं आणि अमेरिकन वातावरणानं गांजला होता. निराश झाल्यावर तो पत्र लिही. माझ्या पत्रांमध्ये चांगलं जगणं म्हणजे काय हे सांगताना मी गांधी, पटेल आणि आंबेडकरांची उदाहरणं दिली. साधनांची टंचाई असताना, वाईट अनुभव येत असताना, प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता या माणसांनी कसा नेटानं अभ्यास केला, व्यासंग केला, ज्ञान मिळवलं याच्या गोष्टी ती त्याला लिहिल्या सांगण्याचा मतलब असा की माझ्यावर कोणते प्रभाव आहेत ते लक्षात यावं. त्यांना आपलेपणा, जवळीक वाटत नाही. ती माणसं त्यांना दूरची वाटतात. माझ्या मोठ्या मुलाला मी राजकीय घालमेल कशी असते ते दाखवण्यासाठी सत्ताबदलाच्या काळात सत्तेच्या अंतः पुरात हिंडवलं. विलासराव देशमुख, छगन भुजबळ, रामदास आठवले इत्यादी माणसं जवळून दाखवली. माझ्या मुलाला त्यांच्यात काही विशेष आहे असं वाटलं नाही. त्याला ती माणसं जराशी बेकार आणि डब्बू वाटली. तो मला म्हणाला, "तुम्ही लोक कशाला यांच्या नादी लागता? - ही अगदीच सामान्य माणसं आहेत.” छान माणूस होता. आठवण झाली की बरं वाटतं. पण आजचा काळ, आजचे प्रश्न, भविष्य यांचा विचार करायला बसलं की त्यांची आठवण होत नाही. तर मी माझ्या मोठ्या मुलाला आणि धाकट्या मुलाला जेव्हा गांधी, जेपी वगैरेंबद्दल आग्रहानं सांगतो तेव्हा त्यात त्यांना फारसा रस वाटत नाही. म्हणजे ते विरोधी असतात असं नाही. पण त्यात ३४० निवडक अंतर्नाद मोठा निदान माझ्याबरोबर राजकारणाच्या अड्डयावर फिरला तरी, धाकटा मुलगा तिकडे वळायलाही तयार नाही. त्याच्यावर जास्तीत जास्त प्रभाव आहे तो हृतिक रोशनचा, अनेक निमित्तानं मी तरुण मुलांना जवळून पाहत असतो. माझ्या मोठ्या व मुलांसारख्या मुलांचीच धाकट्या बहुसंख्या दिसते. अपवाद जरूर आहेत. माझा भाचा माझ्या मुलाच्याच वयाचा कायद्याची पदवी घेऊन तो वकिली करतो. त्याला राजकारणात जबरदस्त रस तो गांधी वाचतो, जगभरच्या राजकीय विषयांवर गंभीरपणे चर्चा करतो. माझी दोन्ही मुलं सिनेमे पाहतात, मराठी, हिंदी, इंग्रजी, देशी, परदेशी, टीव्हीवर, थेटरात चिक्कार एक दृश्य दिसलं की त्यावरून लगेच तो कुठला सिनेमा आहे ते सांगतात, अगदी ताजे सिनेमे, नटनट्या त्यांना माहीत आहेत. पण जुने नटही त्यांना माहीत आहेत. त्यांच्या आठवणीत आहेत. देवानंद त्यांची चांगलीच करमणूक करतो, शम्मी कपूर त्यांना आवडतो. जुनी हिंदी गाणी त्यांना आवडतात, पाठ आहेत. त्यांना गझलाही आवडतात. जेपी आणि गांधी त्यांच्या कपाटात नाहीत, पण जेपी- गांधींचे समकालीन गायक, गाणी, नट, सिनेमे त्यांच्या साठवणीत आहेत.