पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदू आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि मी गंगाधर गाडगीळ मराठी साहित्यातील नवतेच्या पर्वाचे एक प्रवर्तक आणि श्रेष्ठ विचारवंत गंगाधर गाडगीळ आपले परंपरेशी असलेले नाते या खास अंतर्नादसाठी लिहिलेल्या लेखात उलगडून दाखवत आहेत. या परंपरेतील आजच्या काळाशी सुसंगत नसलेल्या गोष्टींचा त्याग करायला हवा पण अनेक गोष्टी जतन करणेही का आवश्यक आहे हे सांगणारा लेख. परवाच एका चर्चासत्रात मला एक सिंधी प्राध्यापक भेटले. तेथल्या चर्चेत सिंधी भाषेची भारतात कशी दुर्दशा झाली आहे, ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलं. ते म्हणाले, "ह्या भारतात आम्हाला स्वतःचा असा प्रदेश नाही. त्यामुळे सिंधीला नित्याच्या व्यवहारात कुठेच स्थान नाही. साहजिकच महाराष्ट्रातले सिंधी मराठी भाषिक होत आहेत. गुजराथेतले गुजराथी भाषिक होत आहेत. आता सिंधी भाषा फक्त सिंधीचे शिक्षक आणि प्राध्यापक बोलतात आणि सिंधी साहित्य तेच फक्त एकमेकांसाठी लिहितात आणि वाचतात. उलट पाकिस्तानात सिंधमधले मुसलमान सिंधी भाषा बोलतात आणि लिहितात, तिथलं सिंधी साहित्य तिथल्या भूमीत रुजलेलं आहे आणि म्हणूनच सकस आहे " चर्चासत्राच्या मध्यंतरात मी त्यांना भेटलो आणि सिंधी भाषेच्या दुरावस्थेविषयी सहानुभूती व्यक्त केली. मग मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला अवमानित करण्यासाठी अगर हिणविण्यासाठी मी तो विचारीत नाही, तर खऱ्याखुऱ्या बौद्धिक कुतूहलातून तो माझ्या मनात उभा राहिला आहे. तो असा की, फाळणीच्या वेळी तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारला असता तर तुम्हाला सिंधमध्ये रहाता आलं असतं आणि मग सिंधी भाषा नित्याच्या जीवनात बोलण्याची आणि त्या जीवनातून निर्माण होणारं सिंधी साहित्य वाचण्याची आणि लिहिण्याची संधी तुम्हाला मिळाली असती. पण तुम्ही तिथे राहिला नाहीत, ते का?” ते प्राध्यापक आश्चर्याने माझ्याकडे पाहात म्हणाले, "असं काही करावं हा विचार माझ्या मनातही आला नाही.” मी पुढे म्हटलं, "तेव्हाची गोष्ट सोडून द्या. समजा आता तुम्हाला कोणी सांगितलं की मुसलमान हो आणि सिंधमध्ये येऊन रहा, तर तुम्ही तसं कराल का?” यावर ते काहीच बोलले नाहीत. नुसते माझ्याकडे बघत राहिले. मग बऱ्याच वेळानं ते म्हणाले, "नाही! आजही मी जाणार नाही.” मी म्हटलं, "का?" ते म्हणाले, "या प्रश्नाचं उत्तर असं चटकन मला देता येणार नाही.” हे प्राध्यापक काही कडवे हिंदुत्वनिष्ठ नव्हते. महाराष्ट्रातली पुरोगामी मंडळी जशी चवताळून हिंदू धर्मावर आग पाखडतात • तशीच टीका कदाचित त्यांनीही केली असती. पण आपला धर्म सोडून मुसलमान व्हावं, हे त्यांना पटत नव्हतं. त्यांची गोष्ट मी बाजूला ठेवली आणि स्वतःला असा प्रश्न केला की, 'समजा, तुझ्यावर असा प्रसंग आला असता आणि मुसलमान ह्येण्याऐवजी निधर्मी होण्याचा पर्याय तुझ्यापुढे ठेवला तर तो तू स्वीकारशील का ? या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कारण आजही मी एकप्रकारे निधर्मीच आहे एक तर मी नास्तिक आहे. मी पूजा-अर्चा करीत नाही. गोव्यात जाऊन मंगेशाच्या पाया पडायचं आणि मुंबईत येऊन हिंदू धर्मावर टीका करून पुरोगामी म्हणून मिरवायचं असा प्रकार मी करीत नाही. मी खरोखरच नास्तिक आहे. मी जसे धार्मिक विधी करत नाही, तशीच जातपातही मानत नाही. मी आणि माझ्या मुलांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीयदेखील विवाह केले आहेत. ब्राह्मण असूनही मी मासे-मटण खातो. हिंदू आध्यात्मिक-सांस्कृतिक परंपरेत अनेक दोष आहेत, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. अस्पृश्यता ही फारच भयंकर गोष्ट आहे, हे काही कोणी सांगायला नको. समाजाची अनेक जातींत झालेली विभागणी, त्यात उच्च-नीच असा केलेला भेदभाव ह्या गोष्टीदेखील तितक्याच भयंकर स्त्रियांना आणि त्यातल्या त्यात विधवांना या समाजात मिळणारी वागणूक आणि इतर अनेक चालीरिती व रुही शरम वाटावी अशाच आहेत, हेदेखील उघडच आहे. अशा परिस्थितीत मी माझं हिंदुत्व नाकारावं हे तर्कसंगत वाटतं, पुन्हा आज अशी परिस्थिती आहे की माझं हिंदुत्व नाकारलं तर त्यापासून मला काहीही तोशीस पडणार नाही. मला कोणी निवडक अंतर्नाद ३३५