पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचार असतो. शहाणपणाचे वर्तन व्यक्तीच्या नैसर्गिक प्रेरणासाफल्याच्या संदर्भात ठरत असते. नैतिक वर्तनात व्यक्तीच्या प्रेरणांचे नियंत्रण करणारी मूल्ये वर्तनप्रेरक असतात. म्हणून प्रत्येक शहाणपणाचे वर्तन नैतिक असेलच असे मानता येत नाही. या संदर्भात पाडगावकरांची 'शहाणपणाचं गाणं' ही मिस्किल कविता विचारात घेता येईल. येथे व्यावहारिक शहाणपणा मिस्किलपणे सांगितला आहे. या कवितेत दोन प्रसंग आहेत. एक व्हिस्की पिऊन घरी जाताना आता घरी तोंड कसे देणार, असा प्रश्न पडणाऱ्या तरुणाचा आहे. त्यावर कथनकर्ता शहाणपणाचा सल्ला देतो की घरी जाताना गजरा घेऊन जावे, तिने दार उघडले की न बोलता तिच्याकडे 'भारावून बघत राहावे आणि याप्रकारे येणारे संकट टाळावे! हा शहाणपणाचा सल्ला देताना नैतिकदृष्ट्या आक्षेपार्ह मानल्या जाणाऱ्या मद्यपानाला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली गेली आहे. दुसरा प्रसंग, रस्त्याने चालत असताना अचानक एक स्त्री मोटारीतून उतरते आणि आपल्याकडे भारावून पाहत राहते. ती एकेकाळी आपल्या वर्गातली सुंदर मुलगी असते. कथनकर्ता म्हणतो की – 'ती खाली उतरणार! । आपण कसे (अंतर्बाह्य) फुलून येणार !! '... अशावेळी मुळीच नाही दाखवायचं । आपण आहोत आतून पेटलो!!' मग तिला महागड्या हॉटेलात चहाला घेऊन जायचे, शामी कबाब मागवायचा, चहा प्यायचा बाहेर पडताना ती म्हणणार 'बिल मी देणार'. अशावेळी जगावे की मरावे असे वाटत असणार, या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे; बिल तिला भरू द्यावे! या कवितेच्या शेवटी कथनकर्ता म्हणतो की – माणसानं शहाण्यासारखं वागावं आणि मग या जगात आनंदानं जगावं ।' या मिस्किलपणे सांगितलेल्या घटनांत मध्यमवर्गाचा व्यावहारिक शहाणपणा प्रकट झाला आहे नैतिकदृष्ट्या असे वागणे स्वार्थीपणाचे म्हणून अयोग्य ठरू शकेल. थोडक्यात, नैतिकता आणि शहाणपणा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असे असले तरी अनेकदा नैतिकतेने वागणे शहाणपणाचे ठरू शकत असते. - आता आपण आनंदमय जगण्यासाठी योजलेल्या 'गाणे' या सूत्रप्रतिमेचा विचार करू. जगणे आनंदमय बनवण्यासाठी जगण्याला आवश्यक शहाणपणा प्राप्त झाला पाहिजे, जीवन सुरक्षित आणि आनंददायक करून जगण्याचा मंत्र देणारे शहाणपण हेच मुळात 'गाणे' आहे. हे शहाणपण दुसऱ्याने सांगणे आणि केवळ ऐकणे पुरेसे नसते. ते आपण स्वतः आत्मसात करायचे असते. हे सांगताना कोऱ्या कोऱ्या कागदावर | असलं जरी छापलं, । ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ॥' असे 'गाणं कागदावरचं आणि आपलं' या कवितेचा कथनकर्ता म्हणतो. येथे कागदावरचं गाणं म्हणजे वाचले जाणारे किंवा इतरांनी सांगितलेले शहाणपण म्हणून शहाणपण स्वतः आत्मसात केले आणि आचरणात आणले की त्यातून घडणारे जीवन 'गाणे' बनून जाते. ' हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो' ही कविता या संदर्भात पाहता येईल. या कवितेत 'गाणे' ही प्रतिमा शहाणपणासाठी आणि शहाणपणामुळे घडणाऱ्या जीवनासाठी योजिली गेली आहे. यातला कथनकर्ता आपल्या प्रेयसीला उद्देशून बोलत आहे विरोधी परिस्थितीत सुखाने जगायचे कसे, याचे शहाणपण या प्रेयसीला ३१६ • निवडक अंतर्नाद प्राप्त झालेले आहे जगत असताना ती या शहाणपणाचा अवलंब करते आणि तिच्या जगण्याच्या पद्धतीतून यातला नायक जगण्याचे 'गाणे' शिकतो. 'जे आपलं असतं ते आपलं असतं । जे आपलं नसतं । ते आपलं नसतं ।' हे तिच्या जगण्याचे एक सूत्र आहे त्यामुळे जे आपले नाही ते प्रयत्नपूर्वक आपले करण्याचा प्रयत्नच ती करत नाही आणि जे आपले आहे ते ती दूरही लोटत नाही, त्यामुळे तिचा कधी अपेक्षाभंग होत नाही आणि आपल्यांचा तिला सतत आधार मिळत राहतो. त्यामुळे जगण्यातले आपोआप सुख तिच्या पदरात पडते. हे सर्व या कवितेत अध्याहृत ठेवून ते सूचित केले गेले आहे. या संदर्भात हसत डोळे पुसून आतून फळासारखा पिकलो ।' एवढेच कथनकर्ता स्वतःबद्दल म्हणतो, जे आपले नाहीत त्यांना कथनकर्त्याने आपले मानले आणि आपला दुःखदायक अपेक्षाभंग करून घेतला, हे डोळे पुसण्याच्या उल्लेखातून सुचवले गेले आहे अशा प्रसंगी तिच्याकडून 'जे आपलं नसतं । ते आपलं नसतं ।' हे शहाणपण प्राप्त होते आणि तो 'हसत डोळे पुसून आतून फळासारखा पिकतो.' 'फळासारखा पिकणे' ही शहाणपण स्वीकारून सुखी, आनंददायक जगण्याची प्रतिमा आहे. या जगात असह्य 'गोंगाट' आहे; बाळांना चिरडून टाकणारे पुस्तकांचे ओझे त्यांच्या पाठीवर आहे; कटुतेचा पाऊस आहे; अनेक घरे पेटवणाऱ्या दंगली आहेत आणि गावे बेचिराख करणारे द्वेषांचे बाँब आहेत. तरीही माणसे 'गाण्याला ताल अजून देऊ शकतात'. अजून मुले 'फुगे घेऊन बागेत अजून धावू शकतात!' तसेच '... माणसं मायेने बाळाचा पापा अजून घेऊ शकतात ।' आणि 'कुंडीमधे फुलं अजून लावू शकतात!' माणसाने आपल्याभोवती जरी जीवनविरोधी वातावरण निर्माण केलेले असले तरी त्याच्या ठिकाणी असणाऱ्या जीवनानुकूल, जीवनपोषक नैसर्गिक प्रवृत्ती त्याला मारून टाकता आल्या नाहीत. शेवटी 'माणसं अजून गाऊ शकतात या कवितेचा कथनकर्ता, 'गाणे' बनलेल्या जीवनाबद्दल आणि असे जीवन ज्यामुळे मिळते त्या स्त्रीपुरुषांच्या प्रेमाबद्दल म्हणतो: 'शीळ घालीत माणसं अजून गाऊ शकतात हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात ।' माणसाचे जीवन, त्याचे जगणे 'गाणे' बनवणारा निसर्ग हाही एक घटक आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील संवादी असणाऱ्या रक्ताच्या नात्याची जाणीव हा रोमँटिक जाणीवव्यूह्यचा एक घटक आहे. रोमँटिक प्रवृत्तीच्या पाडगावकरांच्या या कवितेतही हा घटक व्यक्त झाला आहे. एकीकडे मानवाला त्याच्या सहोदर असलेल्या निसर्गापासून तोडणारे आणि मानवी जीवनात दुःख निर्माण करणारे मानवनिर्मित जग आहे आणि दुसरीकडे मानवाशी संवाद साधून त्याचे जीवन अर्थपूर्ण बनवणारा निसर्ग आहे हा निसर्ग मानवी जीवनाचे 'गाणे' बनवून यकतो ही जाणीव पाडगावकरांनी 'अजून एक सूर आहे या कवितेत व्यक्त केली आहे. कारखान्यांचा 'कुंद काळा धूर' पिऊन पावसासाठी तरसणारी घरे जेव्हा पावसाच्या सरी कोसळू लागतात तेव्हा या कवितेच्या कथनकर्त्यांची 'तडकलेली कौले' सांधली जातात. येथे 'घरे' ही माणसांची आणि 'कौले' ही घराला संरक्षण देणाऱ्या मनाची प्रतिमा आहे. 'तडकलेली कौले' सांधली गेली की मग