पान:निवडक अंतर्नाद.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्र हेमलता अंतरकर त्यांची भेट घेण्यात यशस्वी झाल्या होत्या. नंतरच्या काळात त्यांच्याशी जीएंची स्नेहमय जवळीकही निर्माण झाली होती. अशा जीएंच्या व्यक्तिमत्त्वावरचे पापुद्रे अलवारपणे दूर सारणारी पत्रं आणि त्या पत्रांवरचं अंतरकर यांचं अंतर्वेधी भाष्य हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. पुस्तकाच्या आशयाला साजेल असं मुखपृष्ठ अभिराम अंतरकर यांनी तयार केलं आहे. जीएंच्या चिरेबंदी व्यक्तिमत्त्वाला साजेशा दगडी वाड्याच्या एका खिडकीत जीए बसलेले दिसताहेत. मात्र तेसुद्धा समीप नाही, तर दूरदर्शनच आहे. शिवाय जीएंनी इथंही, म्हणजे घरातही, काळ्या काचांचा गॉगल लावलेलाच आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला अंदाजच करावा लागतो. गूढरम्य पुस्तकातली जीएंची पत्रं आणि त्यावरचं आनंद अंतरकरांचं भाष्य वाचल्यानंतरही आपल्या मनातलं जीए नावाचं कोडं सुटत नाही. मात्र त्याची उकल करण्याचा एक मार्ग या पुस्तकामुळं आपल्या हाती येतो! पुस्तकातली आनंद अंतरकरांच्या सखोल लेखणीतून उतरलेली काही वाक्यं मनाचा ठाव घेणारी आहेत. उदाहरणार्थ, जीएंबद्दल ते लिहितात, '... अशा माणसाच्या अभियुक्त स्वभावधर्माची कल्पना करता येते. मनाची अव्यक्तता हेच त्यांचं निजरूप असतं.' आणखी एके ठिकाणी जीएंच्या गाठीच्या म्हणजे एक आकड्यासारखी (पान ३०४ वरून) रामदासांनी याबाबतही अत्यंत थंड प्रतिसाद दिला. या पुस्तकाला नवलेखक योजनेअंतर्गत अनुदान मिळाल्याचं आणि हे पुस्तक श्रीविद्या प्रकाशनाला दिलं असल्याचं पत्र मला जेव्हा आलं, त्यादिवशी मी मोठ्या आनंदानं ते रामदासांना दाखवलं. ते म्हणाले, "प्रकाशक आधीच नेमतात वाटतं?" मी सांगितलं, "असं दिसतंय खरं! मलाही हे ठाऊक नव्हतं." रामदास पुढे म्हणाले, "निदान प्रकाशक तरी चांगला दिला. " बस! त्यानंतर चकार शब्द नाही. तरीही मी त्यांना माझ्या कथा वाचायला दिल्या. मी वा. ल., धोंड यांच्या तालमीत वाढलेली! त्यामुळे आपले दोष दाखविणारी, वेळप्रसंगी प्रखर टीका करणारी व्यक्ती ही आपली खरी हितचिंतक असते, हे मी अनुभवातून जाणत होते. मला रामदासांचं स्पष्ट मत हवं होतं. मी स्पष्टतेचा आदर करते, हे त्यांना ठाऊक होतं. तरीही त्यांनी एकेक कथा वाचून, न बोलता परत केली. भलाबुरा शब्द नाही! मला नवल वाटलं. खरं तर असा एक प्रसंग खुद्द रामदासांच्या बाबतीतच घडला होता. तो त्यांनीच मला सांगितला होता. विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र पॉप्युलरकडे आलं. त्यानंतर कधीतरी रामदासांची आणि मौज प्रकाशनाच्या श्री. पु. भागवतांची भेट झाली. रामदासांनी त्यांना उत्साहानं ही बातमी सांगितली. श्री. पुं.नी फक्त एक वाक्य उच्चारलं, "हो, आलंय ३१० निवडक अंतर्नाद मात्रा काढण्याच्या सवयीचा उल्लेख करून अंतरकर म्हणतात, 'गाठीची मात्रा लिहिणारी माणसं आतल्या गाठीची असतात का ? पण असा प्रश्न त्यांना विचारण्याचं धाडस मला कधीच झालं नाही. तो प्रश्न आतल्या आत नुसता कुढत राहिला. आतली गाठ आतल्या आत नुसती घट्ट होत राहिली.' अशी आशयगर्भ वाक्यं वारंवार आपल्याला भेटतात आणि अतीव आनंद देतात. जीएंच्या लेखणीचा आदर करणाऱ्या आनंदरावांनी त्यांची 'रत्न' नावाची कथा परत पाठवली होती, कारण त्यांना ती कथा 'का कुणास ठाऊक, उगीचच लांबण आणि पिंजण लावल्यासारखी वाटली, कुठेकुठे तिची काही टोकं भरकटत गेल्यासारखी झाली होती. ती थोडी आटोपशीर असती आणि फोकस्ड असती तर बरं झालं असतं,' असं आनंदराव म्हणतात. मात्र त्यामुळे जीए आणि हंस मासिक यांच्या नात्यात उणेपणा आला नाही. त्या नात्याचे अनेक गहिरे रंग या पुस्तकात आपल्याला ठायीठायी दिसत राहतात. (एक धारवाडी कहाणी, आनंद अंतरकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे १७५ किंमत २०० रुपये ) (मार्च २०१६) परीक्षण: श्रीराम शिथये माझ्या कानावर!” आपल्या आनंदात श्री. पुं. सारख्या ज्येष्ठ प्रकाशकानं सामील होऊ नये, याचं रामदासांना वाईट वाटलं. मात्र खुद्द रामदास माझ्या आनंदाच्या क्षणी श्री. पुं. सारखंच वागले होते. हे साम्य मला जाणवलं. रामदासांकडून माझी ही अपेक्षा नव्हती. असमाधानाचे असे थरावर थर जमा झाले काम करण्यातला आनंद विझला पॉप्युलरचा निरोप घ्यायची वेळ येऊन ठेपली आहे, हे मी ओळखलं. आज मागे वळून पाहताना वाटतं, की पाच वर्षं पॉप्युलरमध्ये काम करणं आणि नंतर नोकरी सोडणं हे दोन्ही निर्णय एकमेकांना पूरक होते. पाच वर्षांत मला ग्रंथव्यवहाराचा जवळून परिचय झाला. पुस्तकांचं नवं भान आलं. माझ्यावर अन्याय झाला, तेही एका अर्थी बरंच झालं. त्यामुळेच तर मी आत्मशोधाला प्रवृत्त झाले. मला माझी स्वप्नं पूर्ण करण्याची वाट दिसली. माझा लेखनमार्ग मला सापडला. पुढे त्यातून लघुपट निर्मितीची दिशाही गवसली. त्यामुळेच असेल कदाचित; पण रामदासांबद्दल मनात कटुता राहिली नाही. कालौघात मोठी दुःखंडी छोटी बनून गेली. कधीतरी मीही पॉप्युलर प्रकाशनाचा एक घटक होते, याचं समाधान मनाच्या तळाशी शिल्लक राहिलं. (दिवाळी २०१४)