पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागे वळून परत जात ते म्हणतात. निदान घरात बोलावलंय. तोंडावर दार बंद केलं नाही. एक लढाई जिंकली. आत जाऊन मी नुसतीच त्यांच्याकडे पाहत उभी राहते. साधी खोली. मोजकं फर्निचर, पुस्तकांची सलग कपाटं भोवतालाच्याबरोबर त्यांचा आवाज मनात नोंदवला जातो. एकविसाव्या शतकात असून फोनची सुविधा नसल्यानं साधं फोनवरून बोलणंही आजवर साधलेलं नसतं. "लक्षात नाही आलं कोण ते.” त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणखी वाढलेला. "मी... मी मीना प्रभु, इथं बडोद्याला आले होते. पाचच मिनिटं भेटायची इच्छा होती म्हणून अचानक आले, क्षमा करा, आधी न कळवता आले.” मी भडाभडा बोलून मोकळी होते. माझा बसका आवाज मलाही न ओळखू येणारा. फार न थांबण्याचा इरादा प्रथम स्पष्ट करते. मग मनापासून करावसा वाटला म्हणून पटकन वाकून नमस्कारही करते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या गोंधळाची जागा आता आश्चर्यानं आणि आनंदानं घेतली आहे. मनापासूनचं हसू तोंडावर पसरतं. डोळे लुकलुकतात. "तुम्ही मीना प्रभु ? न पाहूनही तुम्हाला ओळखीनसं नक्की वाटायचं मला. पण ओळखलं नाही. आम्ही तुमची किती वाट पाहत होतो. येऊन भेटालसं वाटलं होतं. पण हल्ली तर पत्रंही आली नाहीत. मग वाटलं, आता येणार नाहीत. अहो, अशा उभ्या का ? बसा ना या इथं आरामात टेकून बसा. कशा आलात? घर कसं सापडलं?" "रिक्षानं आले. रिक्षावाल्यानं हिंडवलं आसपास, अखेरीस सापडलं घर." साफ बनवून सांगत होते. कन्नलनी स्वतःचं नाव सांगू नका म्हणून बजावलेलं. हे 'गोरं असत्य' क्षम्य ठरावं. पण मन सैरभैर होतच राहतं. पण “अहो, जरा आधी तरी यायचंत." आतून पदराला हात पुसत गोल, प्रेमळ चेहऱ्याच्या ठेंगण्या, ठुसक्या बाई पुढे येतात. “आत्ताच जेवणं आटोपली आमची. खरं तर उतरायलाच इकडे यायचंत. कुठे उतरला आात तुम्ही?" मी एकीकडे प्रश्नांची उत्तरं देते, एकीकडून आश्चर्यचकित होते आणि एकीकडून आनंदानं गदगदूनही येते. पटकन वाकून त्यांनाही एक नमस्कार घडतो. किती मोकळं, किती बरं वाटत होतं मला त्या घरात. या दोघांच्या सहवासात. खरंच यांनी कुणाला आणू नका म्हणून निरोप दिले असतील का? की हे केवळ माझंच सौभाग्य? पत्रांमधून कल्पिलेले चेहरे नसतील, पण मनं मात्र नेमकी तीच हाती आली आहेत. आम्हाला नकळत, क्षणभरात अगदी जवळ आली आहेत. किती बोलू नि किती नकोसं वाटतंय. जणू आज आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पाहत नव्हतोच, पहिल्यांदा भेटत नव्हतोच. पहिल्यांदा एकमेकांशी बोलत नव्हतोच. ही गोष्ट ३० निवडक अंतर्नाद उभा जन्म घडत आली आहे. घडत राहणार आहे पण मी हे अगत्य ताणावं का? आणखी थांबू का? की निघू आता? "ही छोटीशी भेट, " हातातल्या किरकोळ गोष्टी पुढे करत मी म्हणते. “आणि हे माझं नवं पुस्तक, हेच देण्यासाठी मी आले आहे.” "तुम्ही कशाला आणलंत? मी विकत घेणार होतो. " मागे पत्रातून 'दक्षिणरंग' न पाठविण्याची अशीच आज्ञा झालेली होती. "ते मला माहीत आहे, म्हणूनच घेऊन आले.” पुस्तकावर नाव घालण्यासाठी पेन हाती घेते, पण नेमकं काय लिहावं सुचत नाही. किती वेडपट चुका करते लिहिण्यात फार थोड्यांच्या हाती पुस्तक देताना इतकं भरून यायला होतं. माझ्या लिखाणाबद्दल इतका जिव्हाळा आणि जवळीक फार थोड्या जाणकारांच्या मनात आहे, या जाणिवेनं पुन्हा एकदा पायाशी विनम्र व्हावंसं वाटतं. "हे पाहा, आता जेवूनच जा. घरात फारसं काही केलेलं नाही. पण चटकन पिठलं-भात टाकते. तो खायचा आमची जेवणं नुकतीच आटोपलीत. नाहीतर बरंसं जेवायला मिळालं असतं. " बिंबाताई काळजापासून आग्रह करतात. त्यांच्या गोऱ्या घवघवीत कपाळावरचं पावलीएवढं किरमिजी कुंकू पाहत मी मनातल्या मनात आवंढा गिळते. हकालपट्टीच्या जागी एवढी आपुलकी? "मी रिक्षावाल्याला जायला सांगून येते. " बाहेर थांबून राहिलेल्या कन्नलची मला सुटका करायची असते. गाडीशी क्षणमात्र थांबून मी झटकन परतते. "टॅक्सी करून आला होता का?" मी घरात आल्यावर श्री. बा. विचारतात. त्यांनी खिडकीतून मोटार बघितलेली असते. एक खोटं झाकायला दहा खोटी जन्म घेतात. थाप निष्पाप असली तरी. "हो. हॉटेलनं करून दिली होती." दामटून सांगताना मी आता शरमते. मघाशी रिक्षा म्हणाले होते ते त्यांच्या लक्षात असेल तर? चटकन मी विषय बदलते. आता नाना विषय येतात. प्रामुख्याने साहित्यातले, नाना भाषांतल्या उत्तम साहित्याचा साहित्यिकांचा खल होतो, मराठीच्या थिटेपणावर एकमत होतं. प्रवासवर्णनं कशी असावीत? “आपल्याकडे प्रवासाच्या अनुभवापेक्षा प्रवासातला लेखकच त्यात अधिक डोकावत असतो. लिहावं उमाप्रसाद मुखर्जीसारखं. वर्षानुवर्षं हिमालयात भ्रमंती करून त्याची रेघघ न्याहाळणारा. ती तळहातावरच्या रेषांइतकी ओळखणारा आणि गेलं पाव शतक त्यातून पाव शतक पुस्तकं लिहिणारा, भाषा कशी रेशमासारखी मृदू-झळझळीत. तिचं सामर्थ्य वाचताना जाणवतंच, पण त्यांच्या