पान:निवडक अंतर्नाद.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक सूक्ष्म असमाधान व अस्वस्थता माझ्या मनात हळूहळू वाढत होती. रामदासांना माझं काम आवडलेलं होतं. बाहेरच्या लोकांजवळही ते तोंडभरून कौतुक करत. मात्र या कौतुकाला व्यावहारिक दाद वा उत्तेजन मिळत नव्हतं. मी रुजू झाले तेव्हा माझा पूर्ण वेळचा पगार रु. ७५० होता. मी प्रथम अर्धवेळ येत असे. त्यामुळे पगार अर्धा मिळणं योग्यच होतं. दोन वर्षांत मला एक इन्क्रिमेंट मिळालं, मात्र मी जेव्हा पूर्ण वेळ येऊ लागले, तेव्हा मॅनेजरची पोस्ट देऊनही पगार फक्त सातशे पन्नासच! मग आधीच्या इन्क्रिमेंटचं काय झालं? आता तर कामाची जबाबदारी कितीतरी वाढली होती, पण पगार मात्र कारकुनाचा! मॅनेजर हे पद आनंददायक असलं, तरी आर्थिक लाभ काही नाही. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा ! हा सरळ सरळ अन्याय होता. राबवून घेणं होतं, मी याबाबत रामदासांशी स्पष्टपणे बोलले, नोकरी सांभाळून मी पीएच. डी. चा अभ्यासही पूर्ण केला होता. माधव मनोहरांसारख्या अत्यंत परखड समीक्षकाला माझ्या थीसीसची परीक्षा करायला मुंबई विद्यापीठात नेमलं होतं. वा. ल. कुलकर्णी माझे गाईड होते. त्यांच्यापाशी माधव मनोहरांनी मुक्त कंठानं माझ्या थीसीसची वाखाणणी केली होती. इथे ऑफिसात मात्र माझी मेहनत, अभ्यास, पदवी, सर्जनशीलता यांची काहीच किंमत नाही, हे मला जाणवू लागलं होतं. रामदासांशी मी बोलल्यानंतर थोडीशी वाढ झाली. मात्र शेवटपर्यंत माझा पगार तीन आकडीच राहिला. माझ्यानंतर एक साहित्यप्रेमी मुलगी पॉप्युलरमध्ये रूजू होण्याचा विचार करत होती. ती मला घरी भेटायला आली. पॉप्युलरमधलं मला स्वतःला लेखिका व्हायचंय वाल-धोंडांच्या पावलावर पाऊल टाकून संशोधन करायचंय. हे माझे बहराचे दिवस आहेत. ते निघून गेले तर परत येणार नाहीत. मी इथे सतत दुसऱ्यांच्या पुस्तकांचा विचार करते. पण माझ्या स्वप्नांचं काय? इथंच राहिले, तर ती विरून जातील. पॉप्युलर या संस्थेवाचून मला स्वतंत्र अस्तित्व आहे. मला माझी वाट बदलायलाच हवी तसं जर मी केलं नाही, तर रामदासांनी माझ्यावर जो अन्याय केला, त्यापेक्षा मोठा अन्याय मी माझ्यावर करीन. माझा आतला आवाज मला हे सांगतोय. " आपल्या आनंदात श्री. पुं. सारख्या ज्येष्ठ प्रकाशकानं सामील होऊ नये, याचं रामदासांना वाईट वाटलं. मात्र खुद वातावरण कसं आहे, माणसं कशी आहेत हे तिला जाणून घ्यायचं होतं. बोलता बोलता तिनं मला माझा पगार विचारला. मी संकोचत सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती म्हणाली, "इतका कमी? मी नाही इतक्या कमी पगारात काम णार! किमान दोन हजार तरी पगार हवाच!” ती मुलगी पॉप्युलरमध्ये गेली नाही. मी पॉप्युलर सोडलं. रामदास म्हणत होते, "मी तुला तीन महिने रजा देतो. तू शांतपणे विचार कर.” माझं मन आता शांतच होतं. मी विश्राम बेडेकरांना पत्र लिहून माझा निर्णय कळवला. त्यांचं सुंदर उत्तर आलं. "तुम्हांला स्थित्यंतराचा जबर मोह पडतो आहे, असे दिसते. स्वातंत्र्याच्या या ओढीबद्दल तुमचे अभिनंदन! स्वातंत्र्याची किंमत Eternal Vigilance! ते तुम्हांला साधो अशी शुभेच्छा! एक उर्दू शेर आठवतो. समुद्राकाठच्या एका घराच्या सज्जात शहाणपण आणि (तरुणपणचे) वेडेपण समोरची शोभा बघत बसले होते. पाहता पाहता तुफान आले. लाटा उसळल्या. घराला भिडल्या. काही विचार करण्यापूर्वीच तरुणपण त्यात उडी घेऊन निघून गेले. शहाणपण, अंगावर पाणी येऊ नये म्हणून ओव्हरकोट पांघरून काकडत बसले, निरर्थक जीवनाला जपणे हा वेडेपणा, हे ज्या शहाणपणाला कळत नाही, त्याने उसळत्या जीवनाला काय उपदेश करावा?” बेडेकरांच्या पत्रानं मला नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. मी हे सारं बेडेकरांना सांगितलं, याला कारण बेडेकरांबद्दल आणि बाळूताईंबद्दल मला वाटणारा आदर आणि जिव्हाळा, त्यांच्या माझ्यात निर्माण झालेलं नातं! रामदास माझ्या आनंदाच्या क्षणी श्री. पुं. सारखंच वागले होते. हे साम्य मला जाणवलं. रामदासांकडून माझी ही अपेक्षा नव्हती. ज्या दिवशी एका कारकुनाचा पगारही माझ्यापेक्षा जास्त झाला आणि माझा आहे तेवढाच राहिला, त्या दिवशी मी ठरवलं, आता पुरे झालं! बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. मला आता स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा उरली नव्हती. तसं करणं अपमानास्पद वाटत होतं. मनात खळबळ माजली होती. माझा नवरा सतीश म्हणाला, "हवं तर तू परत रामदासांशी बोलून बघ.” मी दोन्ही बाजूंवर खूप विचार केला. एकदा मध्यरात्री मला जाग आली. वातावरण शांत होतं, मनदेखील शांत होतं. मनानं निर्णय घेतला होता. मार्ग सापडला होता. मी सतीशला जागं केलं. "सतीश, मी निर्णय घेतलाय. मी पॉप्युलर सोडणार, केवळ पगारवाढीसाठी नाही. मी रामदासांशी बोलले, तर ते माझा पगार वाढवतीलही; पण माझ्यापुढे आता वेगळाच प्रश्न आहे मी जन्मभर पॉप्युलर प्रकाशनाची संपादिका या भूमिकेत वावरू शकेन का? ३०४ निवडक अंतर्नाद मी पॉप्युलरमध्ये असतानाच 'पॅशनफ्लॉवर' हे माझं पहिलं पुस्तक (कथासंग्रह) प्रसिद्ध झालं होतं. त्याची प्रत मी बेडेकर दंपतीला भेट दिली होती. बेडेकरांसारख्या दिग्गज लेखकाचं मत मला मार्गदर्शक ठरलं असतं. त्या दोघांनीही आस्थेनं ते पुस्तक वाचलं. एकदा संध्याकाळी काही कामानिमित्त मी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांचा मनमोकळा अभिप्राय दिला. या पुस्तकातील कोणत्या कथा आवडल्या, त्या का आवडल्या; त्रुटी काय वाटल्या, यांचं त्यांनी सविस्तर विश्लेषण केलं आणि शेवटी ते म्हणाले, “Your stories are wet with emotions! आम्हा दोघांना तुमच्याविषयी खूप hopes आहेत." बक्षीस म्हणून त्यांनी मला गी द मोपासाचा एक कथासंग्रह दिला. कोणत्याही क्षेत्रात नव्यानं पावलं टाकत असताना परखड अभिप्राय आणि मनःपूर्वक जिव्हाळा या दोन्हीची नितांत गरज असते. (उर्वरित मजकूर पान ३१० वर)